ध्वनी स्वाध्याय इयत्ता सहावी
ध्वनी स्वाध्याय इयत्ता सहावी सामान्य विज्ञान

1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
अ. ध्वनीचे प्रसारण …………….. मधून होत नाही.
उत्तर :
ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळी मधून होत नाही.
आ. ध्वनी प्रदुषण ही एक ……………. आहे.
उत्तर :
ध्वनी प्रदुषण ही एक सामाजिक आहे.
इ. कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला …………….. म्हणतात.
उत्तर :
कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला गोंगाट म्हणतात.
ई. गोंगाटाचा ………….. वर वाईट परिणाम होतो.
उत्तर :
गोंगाटाचा स्वास्था वर वाईट परिणाम होतो.
2. काय करावे बरे ?
अ. मोटारसायकलचा सायलेन्सर बिघडला असेल, तर ……………….
उत्तर :
मोटारसायकलचा सायलेन्सर बिघडला असेल, तर ते दुरुस्त करून घ्यावा.
आ. परिसरातील कारखान्याचा मोठ्याने आवाज येत असेल, तर ……………
उत्तर :
परिसरातील कारखान्याचा मोठ्याने आवाज येत असेल, तर त्या कारखान्याच्या मालकाला त्याबद्दल सांगू. त्याने त्याविषयी उपाययोजना केली नाही तर त्याविषयी पोलिसात तक्रार करू.
3. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. कंपन म्हणजे काय ?
उत्तर :
ध्वनी निर्माण करणाऱ्या वस्तूंचे जलद गतीने आंदोलन होत असते तेव्हा त्याला कंपन असे म्हणतात. या वस्तूंमध्ये एक प्रकारची गती असते.
आ. ध्वनीचे प्रसारण स्थायूंतून कसे होते, हे व्यवहारातील उदाहरणे देऊन स्पष्ट करा.
उत्तर :
ध्वनी स्त्रोतापासून ध्वनीलहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजे ध्वनी प्रसारण. ध्वनीचे प्रसारण स्थायूंतून सर्वात वेगाने होते. उदा. एका मोठ्या टेबलाच्या एका टोकाशी तुम्ही उभे राहा व दुसऱ्या टोकाशी मित्राला उभे करा. मित्राला हळूच टेबलावर टिचकी मारायला सांगा, तेव्हा पुसटसे ऐकू येईल आता तुमच्या कान टेबलाशी धरा आणि मित्राला तशीच टिचकी पुन्हा मारायला सांगा. आता आवाज स्पष्ट ऐकू येईल.
इ. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय ?
उत्तर :
ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी होय. काही आवजांमुळे आपल्याला आनंद वाटत असला तरी त्याचा इतरांना त्रास होतो. नकोशा वाटणाऱ्या अनियमित व मोठ्या आवाजाला गोंगाट म्हणतात. सततच्या गोंगाटामुळे ध्वनी प्रदूषण होते.
ई. ध्वनी प्रदूषण रोखण्यावर कोणती उपाययोजना कराल ?
उत्तर :
i) गाड्यांचे हॉर्न शक्यतोतर वाजवू नयेत.
ii) घरातील टी.व्ही., रेडिओचे आवाज आपल्यापुरतेच मर्यादित ठेवावेत.
iii) वाहनांचे अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी त्यांची नियमित देखभाल करावी.
iv) कारखाने, विमानतळे, रेल्वे व बसस्थानके ही मानवी वस्तीपासून योग्य अंतरावर दूर असावीत.
4. तक्ता पूर्ण करा.
ध्वनीचे स्वरूप | त्रासदायक असणारे | त्रासदायक नसणारे |
---|---|---|
बोलणे | ||
कुजबुजणे | ||
विमानाचा आवाज | ||
गाड्यांचे हॉर्न | ||
रेल्वे इंजिन | ||
पानांची सळसळ | ||
घोड्याचे खिंकाळणे | ||
घड्याळाची टिकटिक |
उत्तर :
ध्वनीचे स्वरूप | त्रासदायक असणारे | त्रासदायक नसणारे |
---|---|---|
बोलणे | ✓ | |
कुजबुजणे | ✓ | |
विमानाचा आवाज | ✓ | |
गाड्यांचे हॉर्न | ✓ | |
रेल्वे इंजिन | ✓ | |
पानांची सळसळ | ✓ | |
घोड्याचे खिंकाळणे | ✓ | |
घड्याळाची टिकटिक | ✓ |