वाट पाहताना स्वाध्याय

वाट पाहताना स्वाध्याय

वाट पाहताना स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी

1) आकृत्या पूर्ण करा.

अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

इ)

उत्तर :

ई)

उत्तर :

2) कारणे शोधा.

अ) आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं, कारण …………………

उत्तर :

कारण – पहाटेचा कोकिळेचा आवाज कानावर यायचा.

आ) म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं, कारण ………………..

उत्तर :

कारण – म्हातारीचा मुलगा परत येणार असं पोस्टमन तिला वाचून दाखवायचा.

इ) पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण …………………

उत्तर :

कारण – पुस्तकांमुळे तिला वेगळेच जग भेटणार असत.

ई) पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो, कारण ………………

उत्तर :

कारण – त्यामुळे म्हातारीचे शेवटचे दिवस समाधानात चाललेले असतात.

3) तुलना करा.

व्यक्तीशी मैत्रीकवितेशी मैत्री

उत्तर :

व्यक्तीशी मैत्रीकवितेशी मैत्री
1) व्यक्तीला केव्हाही हाक मारतो. 1) कवितेलासुद्धा केव्हाही हाक मारता येते.
2) व्यक्तीला कधीही हाक मारतो. 2) कधीही हाक मारता येते.
3) तिच्याकडे धावतो. 3) तिच्याकडे धाव घेता येते.
4) भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. 4) पण केव्हा यायचं हे तिच्यावर अवलंबून असतं. ती कधीकधी मध्यरात्रीही येते. खूप वाट पाहायला लावते.

4) ‘वाट पाहणे’ या प्रक्रियेबाबत पुढील मुद्द्यांना अनुसरून लेखिकेचे मत लिहून तक्ता पूर्ण करा.

वाट पाहणे प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी वाट पाहण्याचे फायदे

उत्तर :

वाट पाहणे प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी वाट पाहण्याचे फायदे
1) कोकिळ
2) उन्हाळ्याची सुट्टी
3) पुस्तके
4) पोपटांचे थवे
5) कविता
6) आत्या
7) पाऊस
8) विठ्ठलदर्शन
1) एखाद्या गोष्टीची किंमत करणे.
2) संयम
3) धीर धरणे
4) विश्वास घट्ट करणे.
5) श्रद्धा डोळस व पक्की करणे.
1) सुखाची चव वाढते.
2) यशाची गोडी वाढते.
3) प्रेमातली व मायेतली तृप्ती वाढते.
4) आयुष्याबद्दलची ओढ वाढते.

5) स्वमत

अ) पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर :

या पाठात ‘वाट पाहणे’ या प्रक्रियेतील कितीतरी गोष्टी लेखिकेने स्वानुभवातून सांगितल्या आहेत. त्याचप्रमाणे या प्रक्रियेतून कोणकोणत्या गोष्टी शिकता येतात याचेही विवेचन केले आहे. शिवाय वाट पाहण्याचे फायदेही विशद केले आहेत. एकूण संपूर्ण पाठच ‘वाट पाहणे’ या विषयाला वाहिलेला असल्यामुळे पाठाचे शीर्षक समर्पक आहे.

आ) म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा.

उत्तर :

माणसाने नेहमी खरे बोलावे असे शिकवले जाते. पण ते चूक आहे. कारण नसताना खोटे बोलू नये हे योग्य. पण इतरांच्या सुखासाठी, समाजाचे नुकसान न होऊ देण्यासाठी विवेकाने वागावे, मग ते असत्य असले तरी चालेल. निखळ सत्यापेक्षा विवेक श्रेष्ठ. म्हातारीची वाट पाहणंसुखाचं करण्यासाठी पोस्टमननं केलेली युक्ती म्हणजे विवेक असून ती सर्वमेव समर्थनीय आहे, असे माझे मत आहे.

इ) ‘वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल जाणवून देणारी आहे’, या विधानाची सत्यता पटवून द्या.

उत्तर :

‘वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल जाणवून देणारी आहे’ हे विधान सत्य आहे. कारण वाट पाहणं ही एरवी सुखाची गोष्ट नसते. दु:ख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडतड अशा कितीतरी गोष्टी त्यात भरलेल्या असतात. पण त्याचबरोबर हेही खरे की एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते. तेव्हाच तिची किंमत कळत जाते. अनेक गोष्टींची किंमत तिची वाट पाहण्यातूनच कळत असते. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यालाच पावसाची इतरांना न कळलेली किंमत कळत नसते. अर्थातच उपरोक्त विधान सत्य आहे.

Leave a Comment