धातू अधातू स्वाध्याय इयत्ता आठवी सामान्य विज्ञान

1. तक्ता पूर्ण करा.
| धातूंचे गुणधर्म | दैनंदिन जीवनात उपयोग |
|---|---|
| i) तन्यता | |
| ii) वर्धनीयता | |
| iii) उष्णतेचे वहन | |
| iv) विद्युतवहन | |
| v) नादमयता |
उत्तर :
| धातूंचे गुणधर्म | दैनंदिन जीवनात उपयोग |
|---|---|
| i) तन्यता | धातूंच्या तारा तयार करण्यासाठी |
| ii) वर्धनीयता | धातूंचे पत्रे तयार करण्यासाठी |
| iii) उष्णतेचे वहन | अन्न शिजविण्याची भांडी तयार करण्यासाठी |
| iv) विद्युतवहन | विद्युत वाहक तारा बनविण्यासाठी |
| v) नादमयता | घंटा तयार करण्यासाठी |
2. गटात न बसणारा शब्द ओळखा.
अ. सोने, चांदी, लोह, हिरा
उत्तर :
हिरा
हिरा हा अधातू असून इतर सर्व धातू आहेत.
आ. तन्यता, ठिसूळताम नादमयता, वर्धनीयता
उत्तर :
ठिसूळता
ठिसूळता हा अधातूंचा गुणधर्म असून इतर सर्व धातूंचे गुणधर्म आहेत.
इ. C, Br, S, P
उत्तर :
Br
सर्वसामान्य तापमानाला Br द्रवरूपात असून इतर सर्व स्थायुरूपात असतात.
ई. पितळ, कांस्य, लोखंड, पोलाद
उत्तर :
लोखंड
लोखंड हा धातू असून इतर सर्व संमिश्रे आहेत.
3. शास्त्रीय कारणे लिहा.
अ. स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्यांच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो.
उत्तर :
कारण स्टेनलेस स्टील व तांबे हे दोन्ही उष्णतेचे वाहक आहेत पण तांबे स्टीलपेक्षा जास्त चांगले उष्णता वाहक आहे.
भांड्याच्या खालच्या भागाला तांब्याचा मुलामा दिल्यामुळे तो भाग उष्णतेचा उत्तम सुवाहक बनतो. त्यामुळे भांड्याला पुरविलेली उष्णता सर्वत्र सारखी पसरविली जाते. त्यामुळे अन्न लवकर शिजण्यास मदत होते.
आ. तांबे व पितळेची भांडी लिंबाने का घासतात ?
उत्तर :
तांबे व पितळ यांच्या भांड्यांवर क्षरणामुळे कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर जमा होतो.
लिंबा मधील आम्लामुळे कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर विरघळतो.
त्यामुळे भांडी स्वच्छ होतात व चकाकतात. म्हणून तांबे व पितळेची भांडी लिंबाने घासतात.
इ. सोडिअम धातूला केसोसीनमध्ये ठेवतात.
उत्तर :
सोडिअम धातू हवेच्या संपर्कात आल्यास हवेतील आद्रतेशी अभिक्रिया होऊन पेट घेतो. त्याचे ऑक्सिडेशन होते.
यामुळे प्रयोगशाळेत दुर्घटना होऊ शकते.
सोडिअमची केरोसीनबरोबर अभिक्रिया होत नाही. म्हणून सोडिअम धातूला केरोसीनमध्ये ठेवतात.
4. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
अ. धातूचे क्षरण होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल ?
उत्तर :
i) धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्यांच्यावर तेल, ग्रीस, वारनिश व रंगांचे थर दिले जातात.
ii) तसेच दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो. उदा. लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते.
iii) या क्रियांमुळे धातूंच्या पृष्ठभागाचा हवेपासून संपर्क तुटतो व त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्याने क्षरण होत नाही.
आ. पितळ व कांस्य ही संमिश्रे कोणकोणत्या धातूंपासून बनलेली आहेत ?
उत्तर :
i) कांस्य हे संमिश्र तांबे व कथिल यांपासून बनवतात.
ii) पितळ हे संमिश्र तांबे व जस्त यांपासून बनवतात.
इ. क्षरणांचे दुष्परिणाम कोणते ?
उत्तर :
i) लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन आर्यन ऑक्साइडचा तांबूस रंगाचा लेप तयार होतो.
ii) तांब्यावर कार्बन डायऑक्साइड वायूची अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेटचा हिरवट रंगाचा लेप तयार होतो.
iii) चांदीवर हायड्रोजन सल्फाइड वायूची अभिक्रिया होऊन सिल्व्हर सल्फाइडचा काळ्या रंगाचा लेप तयार होतो.
iv) क्षरणामुळे पुतळे, पूल, लोखंडाच्या वस्तू, जहाजे, तांबे व पितळेची भांडी इत्यादींचे नुकसान होते.
ई. राजधातूंचे उपयोग कोणते ?
उत्तर :
हवा, पाणी, उष्णता, आम्ले, अल्कली यांचा सहज परिणाम न होणारे धातू म्हणजे राजधातू होय. उदा. सोने, चांदी व प्लटिनम
उपयोग – i) सोने, चांदी व प्लटिनम यांचा मुख्यत: अलंकार बनविण्यासाठी उपयोग होतो.
ii) चांदीचा उपयोग औषधांमुळे होतो,
iii) इलेक्ट्रॉनिक उपकरणात चांदी व सोने यांचा उपयोग होतो.
iv) प्लटिनमचा उपयोग उत्प्रेरक म्हणून देतो.
5. खाली गंजणे याची क्रिया दिली आहे. या क्रियेत तीनही परीक्षानळ्यांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

अ. परीक्षानळी 2 मधील खिळ्यावर गंज का चढला नाही ?
उत्तर :
परीक्षानळी 2 मध्ये, उकळलेल्या पाण्यावर असलेला तेलाचा थर खिळ्याचा संपर्क हवे सोबत होऊ देत नाही.
त्यामुळे परीक्षानळी 2 मधील खिळ्यावर गंज चढला नाही.
आ. परीक्षानळी 1 मधील खिळ्यावर खूप गंज का चढला असेल ?
उत्तर :
परीक्षानळी 1 मध्ये, खिळ्याचा पाणी व हवा या दोन्हींशी संपर्क आल्याने ऑक्सिडीकरण होऊन खिळ्यावर खूप गंज चढला असेल.
इ. परीक्षानळी 3 मधील खिळ्यावर गंज चढेल का ?
उत्तर :
परीक्षानळी 3 मध्ये, शुष्क हवा आहे. तसेच या परीक्षा नळी मध्ये असलेले कॅल्शिअम क्लोराइड हे ओलावा शोषून घेते.
त्यामुळे परीक्षानळी 3 मधील खिळ्यावर गंज चढणार नाही.