स्थान विस्तार स्वाध्याय इयत्ता दहावी

स्थान विस्तार स्वाध्याय इयत्ता दहावी

स्थान विस्तार स्वाध्याय इयत्ता दहावी भूगोल

प्रश्न. 1. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा.

अ) ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.

उत्तर :

हे विधान योग्य आहे.

आ) भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

योग्य विधान – भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे.

इ) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे.

उत्तर :

हे विधाने अयोग्य आहे.

योग्य विधान – ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे.

ई) ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.

उत्तर :

हे विधान योग्य आहे.

उ) ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

योग्य विधान – ब्राझील देशाला अटालांटिक महासागराचा किनारा लाभला आहे.

ऊ) भारताच्या आग्नेसेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

योग्य विधान – भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.

ए) भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात.

उत्तर :

हे विधान योग्य आहे.

प्रश्न. 2. थोडक्यात उत्तरे लिहा.

अ) स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले ?

उत्तर :

स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले :

ब्राझील : i) स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध वित्तीय संकटांना सामोरे जावे लागले.

भारत: i) स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षात भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले.

ii) स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतांतील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले.

iii) स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले.

आ) भारत व ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत ?

उत्तर :

भारत व ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील पुढील बाबी वेगळ्या आहेत :

i) भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे.

ii) ब्राझीलचे स्थान उत्तर.दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे.

iii) भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे.

iv) ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे.

इ) भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेषावृत्तीय विस्तार सांगा.

उत्तर :

i) भारताच्या मुख्य भूमीचे स्थान हे 8°4′ उत्तर अक्षवृत्त ते 37°6′ उत्तर अक्षवृत्त आणि 68°7′ पूर्व रेखावृत्त ते 97°25′ पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान आहे.

ii) ब्राझीलच्या मुख्य भूमीचे स्थान हे 5°15′ उत्तर ते 33°45′ दक्षिण अक्षवृत्त आणि 34°45′ पश्चिम ते 73°48′ पश्चिम रेखावृत्त यांच्या दरम्यान आहे.

प्रश्न. 3. अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा.

अ) भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक ……………… नावाने ओळखले जाते.

i) लक्षद्वीप

ii) कन्याकुमारी

iii) इंदिरा पॉईट

iv) पोर्ट ब्लेअर

उत्तर :

भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईट नावाने ओळखले जाते.

आ) दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.

i) चिली-इक्वेडोर

ii) अर्जेंटिना-बोलिव्हिया

iii) कोलंबिया-फ्रेंच गियाना

iv) सुरीनाम-उरुग्वे

उत्तर :

दक्षिण अमेरिका खंडातील चिली-इक्वेडोर हे दोन ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.

इ) दोन्ही देशांतील राजवट …………….. प्रकारची आहे.

i) लष्करी

ii) साम्यवादी

iii) प्रजासत्ताक

iv) अध्यक्षीय

उत्तर :

दोन्ही देशांतील राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे.

ई) खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्यप्रकारे दर्शवतो ?

उत्तर :

उ) खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्यप्रकारे दर्शवतो ?

उत्तर :

ऊ) गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे ?

उत्तर :

ए) गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे ?

उत्तर :

Leave a Comment