बाह्यप्रक्रिया भाग 2 स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. १. पुढीलपैकी योग्य विधान ओळखून लिहा.
अ. तापमानकक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते.
उत्तर :
योग्य विधान
आ. वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते.
उत्तर :
अयोग्य विधान
योग्य विधान : वाळवंटी वाऱ्याचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते.
इ. भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते.
उत्तर :
योग्य विधान
ई. वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते.
उत्तर :
योग्य विधान
प्रश्न. २. पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखून दुरुस्त करून लिहा.
अ. हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो.
उत्तर :
हे विधान अयोग्य विधान आहे.
योग्य विधान : हिमनदीच्या तळभागावरील बर्फ पृष्ठभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो.
आ. मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यांमुळे नदीचे संचयनकार्य घडून येते.
उत्तर :
हे विधान योग्य आहे.
इ. नदी, हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते.
उत्तर :
हे विधान योग्य आहे.
ई. हिमनदीची गती मध्यभागी कमी, तर दोन्ही काठांवर जास्त असते.
उत्तर :
हे विधान अयोग्य आहे.
योग्य विधान : हिमनदीची गती मध्यभागी जास्त, तर दोन्ही काठांवर कमी असते.
प्रश्न. ३. चुकीची जोडी ओळखा.
अ. संचयन – ‘V’ आकाराची दरी
आ. वहन – ऊर्मिचिन्हे
इ. खनन – भूछत्र खडक
उत्तर :
अ. संचयन – ‘V’ आकाराची दरी
प्रश्न. ४. खालील आकृत्यांमधील भुरूपे कोणती, ते लिहा.

उत्तर :

प्रश्न. ५. खाली दिलेल्या भुरूपांचे कारकांनुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा.
(धबधबा, त्रिभुज प्रदेश, हिमगव्हर, गिरिशृंग, बारखाण, हिमोढ, कुंभगर्ता, भूछत्र खडक, विलयविवर, खाजण, पुळण, लवणस्तंभ)
| नदी | वारा | हिमनदी | सागरी लाटा | भूजल |
|---|---|---|---|---|
उत्तर :
| नदी | वारा | हिमनदी | सागरी लाटा | भूजल |
|---|---|---|---|---|
| धबधबा, त्रिभुज प्रदेश, कुंभगर्ता | बारखाण, भूछत्र खडक | हिमगव्हर, गिरिशृंग, हिमोढ | पुळण, खाजण | विलयविवर, लवणस्तंभ |
प्रश्न. ६. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
अ. नदीच्या खननकार्यामुळे निर्माण होणारी भुरूपे कोणती ?
उत्तर :
नदीच्या खननकार्यामुळे घळई, व्ही (V) आकाराची दरी, धबधबा इत्यादी भुरुपे निर्माण होतात.
आ. लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते ?
उत्तर :
i) लवणस्तंभाची निर्मिती भूजल या कारकामुळे होते.
ii) चुनखडकांच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतांतून ते पाझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुन्हेच्या छताशी व तळाशी सचतात. ही क्रिया सतत झाल्याने छताकडे व तळाशी अनुक्रमे झुंबरांची व स्तंभाची निर्मिती होते. अशाप्रकारे लवणस्तंभाची निर्मिती होते.
इ. सागरी जलाच्या संचयनकार्यामुळे निर्माण होणारी भुरूपे कोणती ?
उत्तर :
सागरी जलाच्या संचयनकार्यामुळे निर्माण होणारी भुरूपे पुढीलप्रमाणे आहेत :
i) पुळण, ii) वाळूचा दांडा, iii) खाजण
ई. हिमोढाचे प्रकार कोणते ?
उत्तर :
हिमोढाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :
i) भू हिमोढ – हिमनदीच्या तळाशी संचयित झालेल्या हिमोढास भू-हिमोढ म्हणतात.
ii) पार्श्व हिमोढ – हिमनदीच्या काठाकडील संचयित हिमोढास पार्श्व हिमोढ म्हणतात.
iii) मध्य हिमोढ – जेव्हा दोन हिमनद्या एकत्र येतात, तेथे त्यांच्या आतील दोन कडांच्या भागातील पार्श्व हिमोढांपासून मुख्य हिमनदीच्या पात्रात तयार होणाऱ्या हिमोढास मध्य हिमोढ म्हणतात.
iv) अंत्य हिमोढ – हिमनदीच्या अग्रभागी हिमनदीचे आणलेला सर्व हिमोढ जलप्रवाह पुढे वाहून नेऊ शकत नाही. त्यामुळे या भागास हिमोढ साचतो. हा हिमोढ हिमनदीच्या शेवटच्या भागात असल्यामुळे त्याला अंत्य हिमोढ म्हणतात.
प्रश्न. ७. खालील चित्राचे लक्षपूर्वक निरीक्षण करा. बाह्यकारकांमुळे तयार झालेली भुरूपे ओळखा. त्यांना पेन्सिलने क्रमांक देऊन त्यांची नावे दिलेल्या क्रमांकानुसार वहीत लिहा.

उत्तर :
