इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा स्वाध्याय इयत्ता दहावी

इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा स्वाध्याय इयत्ता दहावी

इतिहासलेखन पाश्चात्य परंपरा स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास

इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी यावर क्लिक करा.

1. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

1) आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ………………. यास म्हणता येईल.

अ) व्हॉल्टेअर

ब) रेने देकार्त

क) लिओपोल्ड रांके

ड) कार्ल मार्क्स

उत्तर :

आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल.

2) आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ………………. याने लिहिला.

अ) कार्ल मार्क्स

ब) मायकेल फुको

क) लुसिऑ फेबर

ड) व्हॉल्टेअर

उत्तर :

आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला.

ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

1) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल – रिझन इन हिस्टरी

2) लिओपॉल्ड व्हॉन रांके – द थिअरी अँण्ड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी

3) हिरोडोटस – द हिस्टरीज

4) कार्ल मार्क्स – डिस्कोर्स ऑन द मेथड

उत्तर :

चुकीची जोडी – कार्ल मार्क्स – डिस्कोर्स ऑन द मेथड

दुरुस्त जोडी – कार्ल मार्क्स – दास कॅपिटल

2. पुढील संकल्पना स्पष्ट करा.

1) द्वंद्ववाद

उत्तर :

i) एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यांतून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला ‘द्वंद्ववाद’ असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली.

ii) दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात, दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते, त्या पद्धतीलाच ‘द्वंद्ववाद’ असे म्हणतात.

2) अँनल्स प्रणाली

उत्तर :

i) विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये इतिहास लेखनाची अँनल्स नावाची प्रणाली उदयास आली. या अँनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली.

ii) इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणे हे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीला ‘अँनल्स प्रणाली’ असे म्हणतात.

iii) फ्रेंच इतिहासकारांना अँनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय दिले जाते.

3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

1) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

उत्तर :

i) इतिहासलेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमॉ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने इतिहासलेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली.

ii) स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला.

iii) इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला.

iv) सीमॉ-द-बोव्हा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

2) फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.

उत्तर :

i) फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांनी ‘आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज’ या ग्रंथामध्ये इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे, असे प्रतिपादन केले.

ii) पुरातत्त्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले.

iii) फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.

4. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

उत्तर :

5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1) कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पष्ट करा.

उत्तर :

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने ‘वर्गसंघर्षाचा सिद्धांत’ मांडला. त्याच्या मते –

i) इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.

ii) मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात.

iii) समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो.

iv) उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे.

2) आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तर :

आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये –

i) या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते.

ii) हे प्रश्न भूतकालीन मानवी समाजघटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथा-कहाण्यांशी जोडलेला नसतो.

iii) या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते.

iv) मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो.

3) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय ?

उत्तर :

i) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय.

ii) इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमॉ-द-बोव्हा हिने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला.

iii) स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वावर सविस्तर संशोधन सुरू झाले.

iv) 1990 नंतर ‘स्त्री’ हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच ‘स्त्रीवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.

4) लिपोपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.

उत्तर :

लिपोपॉल्ड व्हॉन रांके यांनी इतिहासलेखन कसे करावे, याविषयी मांडलेल्या मतांतून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते –

i) इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. इतिहासलेखनात कल्पनिकता नसावी.

ii) इतिहासलेखनात करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते.

iii) जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा.

Leave a Comment