संसदीय शासन पद्धतीची ओळख स्वाध्याय

संसदीय शासन पद्धतीची ओळख स्वाध्याय

संसदीय शासन पद्धतीची ओळख स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र

प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

1) संसदीय शासनपद्धती ………………. येथे विकसित झाली.

अ) इंग्लंड

ब) फ्रान्स

क) अमेरिका

ड) नेपाळ

उत्तर :

संसदीय शासनपद्धती इंग्लंड येथे विकसित झाली.

2) अध्यक्षीय शासनपद्धतीत ……………… हे कार्यकारी प्रमुख असतात.

अ) प्रधानमंत्री

ब) लोकसभा अध्यक्ष

क) राष्ट्राध्यक्ष

ड) राज्यपाल

उत्तर :

अध्यक्षीय शासनपद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात.

प्रश्न. 2. खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा.

मंडळांचे नाव कार्य
कायदेमंडळ
कार्यकारी मंडळ
न्यायमंडळ

उत्तर :

मंडळांचे नाव कार्य
कायदेमंडळ कायद्याची निर्मिती करणे.
कार्यकारी मंडळ कायद्याची अंमलबजावणी करणे.
न्यायमंडळ न्यायदान करणे.

प्रश्न. 3. खालील विधाने सकारण स्पष्ट करा.

1) भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला.

उत्तर :

ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती. ब्रिटिशांची या पद्धतीने राज्यकारभार करण्यात सुरुवात केली त्यामुळे भारतीयांनी या पद्धतीचा परिचय झाला. संविधानकर्त्यानी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल करून विचार-विनिमय करून या शसनपद्धतीचा अवलंब केला.

2) संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचारविनियम महत्त्वाचे असते.

उत्तर :

कारण एखादा सार्वजनिक हिताचा प्रश्न असेल तर त्यावर सर्वांनी चर्चा करून तोडगा काढणे गरजेचे असते.

या चर्चेत विरोधी पक्षाचे सभासदही भाग घेतात. योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे कायद्यातील किंवा धोरणातील त्रुटी दाखवून देणे, विविध गोष्टींवर विचार करणे, चर्चा करणे गरजेचे असते. त्यामुळे जास्तीत जास्त निर्दोष निर्णय जनतेपर्यंत पोहोचतात. यामुळे संसदीय शासनपद्धतीत चर्चा व विचारविनिमय यांना महत्त्व असते.

प्रश्न. 4. खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा.

1) जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय?

उत्तर :

शासनाने किंवा पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला, कृतीला किंवा धोरणाला कायदेमंडळ जबाबदार असते. एखाद्या खात्याचा निर्णय हा संपूर्ण राज्याचा निर्णय समजला जातो. त्यामुळे त्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी मंत्रिमंडळाची असते. म्हणून या शासनपद्धतीला जबाबदार शासनपद्धती म्हणतात.

2) अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

उत्तर :

अध्यक्षीय शासनपद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात.

कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे व राष्ट्राध्यक्ष जनतेकडून निवडले जातात.

कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ एकमेकांच्या नियंत्रणाखाली असतात. परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो.

Leave a Comment