शिवपूर्वकालीन भारत स्वाध्याय

शिवपूर्वकालीन भारत स्वाध्याय

शिवपूर्वकालीन भारत स्वाध्याय इयत्ता सातवी

प्रश्न. 1. नावे सांगा. 

1) गोंडवनची राणी –

उत्तर :

राणी दुर्गावती

2) उदयसिंहाचा पुत्र –

उत्तर :

महाराणा प्रताप

3) मुघल सत्तेचा संस्थापक –

उत्तर :

बाबर

4) बहमनी राज्याचा पहिला सुलतान –

उत्तर :

हसन गंगू

5) गुरुगोविंदसिंग यांनी स्थापन केलेले दल –

उत्तर :

खालसा दल

प्रश्न. 2. गटात न बसणारा पर्याय निवडा. 

1) सुलतान मुहम्मद, कुतुबुद्दीन ऐवक, मुहम्मद घोरी, बाबर

उत्तर :

बाबर

2) आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही, बरिदशाही

उत्तर :

 सुलतानशाही

3) अकबर, हुमायून, शेरशाह, औरंगजेब

उत्तर :

औरंगबेज

प्रश्न. 3. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये का उदयास आली ?

उत्तर :

i) दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले होते.

ii) दौलताबादचा किल्ला त्यांनी जिंकून घेतला. हसन गंगू हा या सरदारांचा प्रमुख याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. अर्थात दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. म्हणून विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये उदयास आली.

2) महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या ?

उत्तर :

महमूद गावानने पुढील सुधारणा केल्या.

i) महमूद गावानने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले.

ii) त्यांनी सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली.

iii) जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली.

iv) तसेच बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केले.

3) मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले ?

उत्तर :

i) औरंगजेबाच्या काळात आहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. मुघलांनी आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले.

ii) आहोम गदाधरसिंह याच्या नेतृत्वाखाली संघटित झाले.

iii) लाच्छित बडफूकन या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला.

iv) आहोमांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. त्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले.

प्रश्न. 4. तुमच्या शब्दांत थोडक्यात माहिती लिहा. 

1) कृष्णदेवराय 

उत्तर :

i) कृष्णदेवराय हे इ. स. 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर बसले.

ii) त्यांनी विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले.

iii) बहमनी सुलतान महमूदशाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्यसंघाचा त्यांनी पराभव केला.

iv) कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते.

v) ते विद्वान होते. त्यांनी तेलुगु भाषेमध्ये ‘आमुक्तमाल्यदा’ हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला.

vi) त्यांच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये हजार राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले.

vii) कृष्णदेवरायांचा मृत्यू इ. स. 1530 मध्ये झाला. त्यानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागली.

2) चांदबिबी 

उत्तर :

i) इ. स. 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला करून अहमदनगरच्या किल्ल्याचा वेढा दिला.

ii) अहमदनगरच्या हुसेन निजामशाहची कर्तबगार मुलगी चांदबिनीहिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला.

iii) त्यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली. या दुहीतून चांदबिबीस ठार मारले गेले.

3) राणी दुर्गावती 

उत्तर :

i) चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवनची राणी झाली.

ii) तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला.

iii) मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवनची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा आहे.

iv) राणी दुर्गावतीचे पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही.

प्रश्न. 5. सकारण लिहा. 

1) बहमनी राज्याची पाच शकले झाली. 

उत्तर :

कारण – i) महमूद गावानंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली.

ii) विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला.

iii) विविध प्रांतांतील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागल्याने बहमनी राज्याचे विघटन झाले. म्हणून वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची पाच शकले झाली.

2) राणासंगा यांच्या सैन्याचा पराभव झाला. 

उत्तर :

कारण – i) पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर मेवाडच्या राणासंगा यांनी राजपूत राजांना एकत्र आणले.

ii) बाबर आणि राणासंगा यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली.

iii) या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे राणासंगा यांच्या सैन्याचा पराभव झाला.

3) राणा प्रताप इतिहासात अजरामर झाला. 

उत्तर :

कारण – i) राणा उदयसिंहा यांच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर बसले.

ii) त्यांनी मेवाडच्या अस्तित्वासाठी संघर्ष चालू ठेवला.

iii) महाराणा प्रताप यांनी अखेपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला.

iv) पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले.

4) औरंगजेबाने गुरु गुरुतेघ बहाद्दर यांना कैद केले. 

उत्तर :

कारण – i) औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध शिखांचे नववे गुरु गुरुतेघबहाद्दर यांनी तीव्र नापसंती दर्शवली. त्यामुळे औरंगजेबाने गुरु गुरुतेघबहाद्दर यांना कैद केले.

प्रश्न. 6. कालरेषा पूर्ण करा. 

उत्तर :

 

प्रश्न. 7. इंटरनेटच्या साहाय्याने तुम्हांना आवडणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीची माहिती मिळवा व खालील चौकटीत लिहा. 

मला हे माहीत आहे …………..

महाराष्ट्राच्या जडण-घडणीतील शिल्पकार-महात्मा फुले

उत्तर :

मला हे माहीत आहे …………..

महाराष्ट्राच्या जडण-घडणीतील शिल्पकार-महात्मा फुले

महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली पुणे येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे होते. ते जातीने क्षत्रिय माळी होते. त्यांच्या घराण्यात फुलांचा व्यवसाय असल्याने त्यांचे गोऱ्हे ऐवजी फुले आडनाव पडले. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचे वर्षी त्यांचा सावित्रीबाई या कन्येशी विवाह झाला.

ज्योतिबांची चिंतनशीलता व बौद्धिक कौशल्य पाहून त्यांच्या शेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफ्फार बेग मुन्शी व धर्मोपदेशक लिजीट साहेब यांनी त्यांचे शिक्षण पुन्हा चालू करावे असा आग्रह त्यांच्या वडिलांकडे धरला. त्यांच्या ब्राम्हण मित्राच्या लग्नात वरातीमध्ये ब्राम्हणांनी क्षुद्र म्हणून त्यांचा अपमान केला, तेव्हापासून सामाजिक विषमतेबद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण झाली. अज्ञानरूपी अंध:काराला दूर करण्यासाठी शिक्षणासारखा दुसरा पर्याय नाही. शिक्षणाने मनुष्याला सत्य, असत्याचा व अंतिम हिताचा विचार करण्याची शक्ती प्राप्त होते.  शिक्षण हे सुधारणेचे मूळ आहे. त्यातून स्वाभिमानाची जाणीव जागृत होते, हे त्यांनी ताडले. म्हणून स्त्रियांचे शिक्षण म्हणजे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण, असे त्यांचे मत होते. परंतु त्याकाळात पुण्यात स्त्रियांना शिक्षणाची अजिबात सोय नव्हती. अशा प्रतिकूल परिस्थितीत 1848 मध्ये मुलींची पाहिली शाळा सुरू केली. त्यासाठी त्यांनी सावित्रीबाईला शिक्षण देऊन शिक्षिका म्हणून नेमले. ही गोष्ट त्याकाळी सनातन्यांना पटली नाही. म्हणून त्यांनी सावित्रीबाईचा छळ करणे आरंभीले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महात्मा फुल्यांनी स्त्री शिक्षणाचे कार्य केले. त्याबद्दल सरकारने इ. स. 1852 मध्ये विश्राम बागवाड्यात त्यांचा जाहीर सत्कार केला.

त्यांनी स्वत:च्या घरात एक बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून मुंबईत नाभिकांचा एक संप घडवून आणला. स्त्रियांच्या संदर्भातील विविध समस्या सोडवण्यापुरते महात्मा फुले यांचे प्रयत्न मर्यादित नव्हते. स्त्रियांना दुय्यम लेखणारी पुरुषी मनोवृत्ती बदलण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

मे 1852 मध्ये अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली. 1868 मध्ये आपल्या घराजवळचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याकरिता 25 सप्टेंबर 1873 मध्ये ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना केली. महाराष्ट्रातील शेतकरी अनिष्ट चालीरीती, धर्मभोळेपणा याखाली दबला होता आणि दारिद्र्य, मागासलेपणा, कर्जबाजारीपणा यात तो पिचून गेला होता. म्हणून त्यांच्या स्थितीचे ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या ग्रंथात प्रभावीपणे वर्णन केले. आणि ड्युक ऑफ कॅनाट भारतात आल्यावर त्यांच्या समोर शेतकऱ्यांची कैफियत शेतकऱ्यांच्या वेशात सांगितली. मुंबईतील गिरणी कामगारावर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडण्यासाठी नारायण लोखंडे यांच्या सहाय्याने ‘कामगार संघटना’ स्थापना केली.

महात्मा फुलेंच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास असे दिसून येते, की समाजसुधारणेसाठी शिक्षण हेच माध्यम आहे, असा त्यांनी प्रचार केला. फुल्यांचे कार्य सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे व क्रांतिकारक होते.

हिंदू समाजातील बहुजन समाजाला स्वजागृत व आत्मावलोकन करायला लावणारा पहिला माणूस म्हणजे ज्योतिबा फुले होय. त्यांच्या कार्याचा मुंबई येथे गौरव करून त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी बहाल करण्यात आली.

अशा या महापुरुषाची 27 नोव्हेंबर 1890 बुधवार या दिवशी जीवन ज्योत मावळून गेली. सर्वत्र आकांत उडाला. पुणे हळहळले, मुंबई हादरली. सर्वत्र हाहाकार झाला. महात्मा फुले आजही आपल्या कर्तृत्वाने अमर आहे.

Leave a Comment