इतिहासाची साधने स्वाध्याय

इतिहासाची साधने स्वाध्याय

इतिहासाची साधने स्वाध्याय इयत्ता नववी

प्रश्न. 1. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

1) भारताचे राष्ट्रीय अभिलेखावर ………………….. येथे आहे.

अ) पुणे

ब) नवी दिल्ली

क) कोलकता

ड) हैदराबाद

उत्तर :

भारताचे राष्ट्रीय अभिलेखावर नवी दिल्ली येथे आहे.

2) दृक-श्राव्य साधनांमध्ये ………………….. या साधनाचा समावेश होतो.

अ) वृत्तपत्र

ब) दूरदर्शन

क) आकाशवाणी

ड) नियतकालिके

उत्तर :

दृक-श्राव्य साधनांमध्ये दूरदर्शन या साधनाचा समावेश होतो.

3) भौतिक साधनांमध्ये ………………… चा समावेश होत नाही.

अ) नाणी

ब) अलंकार

क) इमारती

ड) म्हणी

उत्तर :

भौतिक साधनांमध्ये म्हणी चा समावेश होत नाही.

ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.

व्यक्तीविशेष
1) जाल कूपर
2) कुसुमाग्रज
3) अण्णाभाऊ साठे
4) अमर शेख
– टपाल तिकीट अभ्यासक
– कवी
– लोकशाहीर
– चित्रसंग्राहक

उत्तर :

अमर शेख – चित्रसंग्राहक

प्रश्न. 2. टिपा लिहा.

1) लिखित साधने

उत्तर :

i) वृत्तपत्रे, नियतकालके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोशवाड्मय या साधनांना लिखित साधने असे म्हणतात.

ii) ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात, त्या ठिकाणास ‘अभिलेखागार’ असे म्हणतात.

iii) आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत.

iv) 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्त्रोत आहे.

v) टपाल तिकीटावरुन इतिहासकार इतिहास सांगू शकतात. तसेच टपालखाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी-पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृतमहोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतकपूर्ती निमित्त तिकीट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो.

2) प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया

उत्तर :

i) 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाच्या स्त्रोत आहे.

ii) प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया वृत्तलेख, छायचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत.

iii) 1990 च्या दशकात पीटीआयने टेलिप्रेंटर्स ऐवजी ‘उपग्रह प्रसारण’ तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. तसेच पीटीआयने ऑनलाइन सेवा सुरू केली आहे.

iv) आधुनिक भारताच्या इतिहासलेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे.

प्रश्न. 3. कारणे लिहा.

1) टपाल खाते टपाल तिकीटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.

उत्तर :

कारण – i) टपाल तिकिटे ही लिखित साधनांपैकी एक साधन आहे.

ii) टपाल तिकीटांच्या आकारांतील वैविध्य, विषयांतील नावीन्य, रंगसंगती यांमुळे टपाल तिकिटे बदलत्या काळाविषयी माहिती देतात.

iii) टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी-पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृतमहोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतकपूर्ती निमित्त तिकिट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो. म्हणून टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीच्या वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.

2) आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक-श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात.

उत्तर :

कारण – i) दृक-श्राव्य माध्यमांमध्ये दूरदर्शन, चित्रपट, वृत्तपट, अनुबोधपट यांचा समावेश होतो.

ii) इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट तयार केले.

iii) समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट (डाॅक्युमेंटरीज) या विभागाने तयार केले आहे. त्यातून आपल्याला चालू घडामोडी कळतात. त्यामुळे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक-श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात.

Leave a Comment