आपले परमवीर स्वाध्याय
आपले परमवीर स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी
प्रश्न. 1. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
अ) फ्लाईन ऑफिसर निर्मलजीत सेखाॅ सावध का होते ?
उत्तर :
14 डिसेंबर 1971 रोजी शत्रूची सहा सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली. म्हणून तेथे नियुक्तीवर असणारे फ्लाईन ऑफिसर निर्मलजीत सेखाॅ सावध होते.
आ) फ्लाईन ऑफिसर निर्मलजीत सेखाॅना उड्डाण करण्यात कोणती अडचण होती ?
उत्तर :
14 डिसेंबर 1971 रोजी शत्रूंनी श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला केला होता. तेथे नियुक्त असणाऱ्या फ्लाईन ऑफिसर निर्मलजीत सेखाॅ सावध होते, पण धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुराळ्यामुळे निर्मलजीत यांना धावपट्टी दिसत नव्हती. फ्लाईन ऑफिसर निर्मलजीत सेखाॅना उड्डाण करण्यात ही अडचण होती.
इ) निर्मलजीत सेखाॅनी निकराची लढाई चालू का ठेवली ?
उत्तर :
निर्मलजीत सेखाॅना श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्र वाचवायचे होते. शत्रूची विमाने माथ्यावर घोंगावत होती. गोळ्यांच्या फैरी झाडत होती. तरीही निर्मलजीत सेखाॅ प्राणाची पर्वा न करता हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने करीत होते. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असतानाही त्यांनी निकराची लढाई चालू ठेवली.
ई) निर्मलजीत सेखाॅनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव कसा केला ?
उत्तर :
फ्लाईग ऑफिसर निर्मलजीत यांनी शत्रूच्या दोन सेबरजेट विमानांचा अचूक वेध घेतला. शत्रू संख्येने जास्त असूनही निर्मलजीतांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले. अशा रीतीने निर्मलजीत सेखाॅनी श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्राचा बचाव केला.
उ) दधीची ऋषींनी लोककल्याणासाठी कोणता योग केला ?
उत्तर :
दधीची ऋषींनी लोकांच्या कल्याणासाठी स्वत:च आपल्या प्राणांची आहुती दिली आणि अस्थींचे दान दिले. केवळ यामुळे सगळे पाणी पळवून नेणाऱ्या राक्षसाचे निर्दालन झाले.
प्रश्न. 2. फ्लाईन ऑफिसर निर्मलजीत सेखाॅ हे शत्रूशी धैर्याने लढले. त्याचे पाच सहा वाक्यांत वर्णन करा.
उत्तर :
शत्रूची सेबर जेट विमाने माथ्यावर, अगदी खालून घोंगावू लागली होती. गोळ्यांच्या फैरी झाडत होती. तरीही प्राणाची पर्वा न करता फ्लाईन ऑफिसर सेखाॅने नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले. त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला. पाहता पाहता दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली. शत्रू संख्येने जास्त असूनही त्यांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले. त्यामुळे श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्र बचावले.
प्रश्न. 3. परमवीरचक्रधारकांची माहिती वाचून आपल्याला कोणती प्रेरणा व स्फूर्ती मिळते ?
उत्तर :
आपण केवळ स्वत:साठी नव्हे तर देशासाठी जगलो पाहिले. यात आपल्याला मृत्यू आला तरी ते आपले भाग्य होय. देशासाठी कोणत्याही संकटाला आपण निर्भयपणे सामोरे गेलो पाहिजे. परमवीरधारकांची माहिती वाचून आपल्याला ही प्रेरणा व स्फूर्ती मिळते.
प्रश्न. 4. आपले परमवीर व दधीची ऋषी यांच्यात तुम्हांला कोणते साम्य आढळते ?
उत्तर :
दधीची ऋषींनी लोककल्याणासाठी स्वत:चे बलिदान दिले. दधीची ऋषींच्या अस्थींमुळे इंद्रवज्राला सामर्थ्य मिळाले. तसेच त्या परमवीरांकडून, त्यांच्या शौर्यातून, त्यांच्या अत्युच्च अशा बलिदानातून भारतीय सेनेला अमोघ सामर्थ्य मिळते. आपले परमवीर व दधीची ऋषी यांच्यात आम्हाला हे साम्य आढळते.
प्रश्न. 5. परमवीर चक्राची माहिती मुद्द्यांनुसार लिहा.
उत्तर :
धातू – कांस्य
कापडी पट्टीचा रंग – गडद जांभळा
पदकाची दर्शनी बाजू – मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह
पदकाची मागजी बाजू – परमवीर हे शब्द गोलाकार कोरलेले.
पदकावरील कोरलेले शब्द – परमवीरचक्र
भाषा – इंग्रजी व हिंदी
पुष्प – दोन कमलपुष्पे
प्रश्न. 6. परमवीर चक्र पदकाचे डिझाईन तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर यांची सहा-सात वाक्यांत माहिती लिहा.
उत्तर :
सावित्रीबाई खानोलकर या मूळच्या युरोपियन; परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या. या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतले. शिवाय भारतातील कला, परंपरांचाही खूप अभ्यास केला. मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा त्या अस्खलितपणे बोलत असत.
खेळूया शब्दांशी
1) खालील शब्दसमूह व वाक्प्रचार यांचा वाक्यांत उपयोग करा.
अ) घोंगावणे
उत्तर :
घोंगावणे – घाणीजवळ माशा घोंगावतात.
आ) झेपावणे
उत्तर :
झेपावणे – मला पाहताच इवलीशी त्रिविधा माझ्याकडे झेपावली.
इ) वेध घेणे
उत्तर :
वेध घेणे – रडार यंत्र विमानांचा अचूक वेध घेते.
ई) वेढणे
उत्तर :
वेढणे – पुरामुळे नदीने संपूर्ण गाव वेढले होते.
उ) बचावणे
उत्तर :
बचावणे – मी पटकन बाजूला झालो म्हणून ट्रकच्या अपघातातून बचावलो.
ऊ) सामोरे जाणे
उत्तर :
सामोरे जाणे – कोणत्याही संकटाला सामोरे जाणे हा शिवाजी महाराजांचा स्वभाव होता.
2) समानार्थी शब्द लिहा.
अ) सावध
उत्तर :
सावध – दक्ष, हुशार
आ) लढाई
उत्तर :
लढाई – युद्ध
इ) प्रत्यक्ष
उत्तर :
प्रत्यक्ष – डोळ्यांदेखत
ई) शत्रू
उत्तर :
शत्रू – वैरी
आपण समजून घेऊया
खालील वाक्यांतील संबंधी सर्वनामे अधोरेखित करा.
1. ज्यांनी बचत केली, त्यांनी आपले भविष्य सुरक्षित केले.
उत्तर :
ज्यांनी बचत केली, त्यांनी आपले भविष्य सुरक्षित केले.
2. ज्याला खुंटा वारसा खो खो खेळता येतो, त्याला गोल खो खो खेळता येतोच.
उत्तर :
ज्याला खुंटा वारसा खो खो खेळता येतो, त्याला गोल खो खो खेळता येतोच.
3. जे दुसऱ्याला मदत करतात, ते लोकप्रिय होतात.
उत्तर :
जे दुसऱ्याला मदत करतात, ते लोकप्रिय होतात.