प्रीतम स्वाध्याय
प्रीतम स्वाध्याय इयत्ता नववी मराठी

प्रश्न. 1. तुलना करा.
शाळेतील प्रीतम | सेकंड लेफ्टनंट प्रीतम |
---|---|
1) | 1) |
2) | 2) |
उत्तर :
शाळेतील प्रीतम | सेकंड लेफ्टनंट प्रीतम |
---|---|
1) शरीराने किडकिडीत अंगकाठीचा. साधे मराठी लिहिण्यातही खूप चुका करणारा. मामा-मामी खेरीज कुणीच नातेवाईक नसलेला. कुणाशी एक शब्दही न बोलणारा. | 1) देखणा, भरदार व उंच. वडील पासिंग आऊट परेडसाठी येऊ शकले नाही म्हणून लेखिकेला त्यांच्या जागी बसवणारा. तिची जाण्यायेण्याची तिकीट काढण्याइतपत श्रीमंत |
2) लेखिकेच्या लग्नात आपल्या आईच्या जुन्या बांगड्या तिला सप्रेम भेट देणारा. लेखिकेशी आईएवढेच अतूट नाते जोडणारा. | 2) स्वत:च्या लग्नात आईसाठी घेतलेली साडी लेखिकेला दिली. तिच्यामुळे मी कॅप्टन झालो हे पत्नीला सांगणारा कृतज्ञ भावनेचा. |
प्रश्न. 2. कारणे लिहा.
अ) प्रीतमला मराठी नीट येत नसे, कारण ………..
उत्तर :
त्याचे प्राथमिक शिक्षण प्रथम पंजाबमध्ये व नंतर बंगालमध्ये झाले होते.
आ) पोरकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते, कारण ……………
उत्तर :
कारण लेखिकेचे वडील मरण पावले होते आणि प्रीतमची ही आई मरण पावली होती.
प्रश्न. 3. प्रतिक्रिया लिहा.
अ) प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्याच्या वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया –
उत्तर :
‘नीट मराठीही लिहिता येत नाही, तुझ्या आईवडिलांना ताबडतोब मला भेटायला सांग. तू दिवसेंदिवस आळशी होत चालला आहेस. तुझ्या पालकांना तुझा बेजबाबदारपणा कळायलाच हवा.
आ) अबोल प्रीतम भडभडा बोलल्यानंतर वर्गशिक्षकेची प्रतिक्रिया –
उत्तर :
‘प्रीतम, मला यातले काहीच ठाऊक नव्हते. असं कर, उद्यापासून दुपारच्या सुटीत लवकर डबा खा अन् खेळण्याऐवजी माझ्याकडे ये. मी तुला मराठी शिकवेन अस् मग बाकी विषयही तुला सहज समजतील’.
प्रश्न. 4. लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा.
उदाहरण | गुण |
---|---|
अ) बाईनी प्रीतमला जवळ घेतले. | 1) कार्यनिष्ठा |
आ) दुपारच्या सुट्टीत बाईनी प्रीतमला मराठी शिकवले. | 2) संवेदनशीलता |
इ) प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईनी हातात चढवल्या. | 3) निरीक्षण |
ई) एका दृष्टिक्षेपात बाईनी अंदाज केला. | 4) ममत्व |
उत्तर :
उदाहरण | गुण |
---|---|
अ) बाईनी प्रीतमला जवळ घेतले. | 4) ममत्व |
आ) दुपारच्या सुट्टीत बाईनी प्रीतमला मराठी शिकवले. | 1) कार्यनिष्ठा |
इ) प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईनी हातात चढवल्या. | 2) संवेदनशीलता |
ई) एका दृष्टिक्षेपात बाईनी अंदाज केला. | 3) निरीक्षण |
प्रश्न. 5. प्रीतमला स्वत:बद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्ये शोधा व लिहा.
उत्तर :
i) मी नापास झालो तर बाबांना सांगून ते (मामा) मला बोर्डिगात ठेवणार.
ii) आधीच मामीची तीन लहान मुले तिला खूप त्रास देतात. त्यात माझा त्रास नको.
iii) बाई, माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या अन् अत्तर तुम्हाला दिले. खास माझ्या स्वत:च्या वस्तू आहेत त्या.
iv) केव्हाही मुलगा म्हणून हाक मारा. मी धावत येईन.
प्रश्न. 6. खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ लिहा.
अ) रया जाणे
1) शोभा जाणे
2) शोभा कारणे
3) शोभा येणे
उत्तर :
1) शोभा जाणे
आ) संजीवनी मिळणे
1) जीव घेणे
2) जीवदान देणे
3) जीव देणे
उत्तर :
2) जीवदान देणे
प्रश्न. 7. कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्यांचे रूपांतर करा.
1) मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. (आज्ञार्थी करा.)
उत्तर :
मुलांनो, आईवडिलांची आज्ञा पाळा.
2) हा तलाव अतिशय सुंदर आहे. (उद्गारार्थी करा.)
उत्तर :
अबब ! किती सुंदर आहे हा तलाव !
3) बापरे ! रस्त्यावर केवढी ही गर्दी ! (विधानार्थी करा.)
उत्तर :
रस्त्यावर खूपच गर्दी आहे.
4) नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)
उत्तर :
नेहमी खरे बोलावे का ?
प्रश्न. 8. स्वमत
अ) प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नातेसंबंधांविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
उत्तर :
प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यात करुणा, सहानुभूती, जिव्हाळा आणि वात्सल्य या चढत्या क्रमाने नातेसंबंध निर्माण झाला आहे.
प्रीतमला आई नाही, तो मामांकडे राहतो, मामा ही त्याला मारतात हे ऐकून त्याच्या बाईच्या मनात करुणा निर्माण होते. कारण तीही वडिलांविना पोरकी आहे. म्हणून त्याचे दु:ख तिला जाणवते.
यामुळे तिच्या मनात प्रीतमबद्दल सहानुभूती निर्माण होते. शाळेच्या दुपारच्या सुट्टीत त्याला ती मराठी शिकवते. यामुळे प्रीतमच्या मनात तिच्याबद्दल असीम आदर निर्माण होतो.
आता दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल जिव्हाळा निर्माण झाला आहे. तिच्या लग्नाच्या वेळी तो तिला त्याच्याजवळ असलेल्या त्याच्या आईच्या वापरलेल्या जुन्या बांगड्या भेट देतो आणि तीही त्या आपल्या हातात घालते.
पुढे, आईचे वात्सल्य असते ते वात्सल्य त्याच्याबद्दल तिच्या मनात निर्माण होते. तो लेफ्टनंट म्हणून नियुक्त झाल्यावर ‘पासिंगआऊट परेडसाठी’ त्याचे वडील येऊ शकले नाहीत तेव्हा तो त्यांची खुर्ची तिला देतो. ती त्याच्या लग्नाला जाते तेव्हा तो तिला म्हणतो, “केव्हा ही मुलगा हाक मारा, मी धावत येईन”. असे त्यांचे मायलेकराचे नाते निर्माण झाले आहे.
आ) तुमच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान स्पष्ट करा.
उत्तर :
माझ्या जीवनात शिक्षकांचे स्थान अनन्यसाधारण आहे. ते करुणेचे सागर आहेत, नि:स्वार्थ सेवा कारणे त्यांनीच मला शिकवले, ते माझे मार्गदर्शकही आहेत. त्यांनीच मला लेखनाला प्रोत्साहित केले आहे. त्यांच्यापासून मी प्रेमळपणाच्या सामर्थ्याचे धडेही घेतले आहेत.
आमची आर्थिक स्थिती इतकी बिकट होती की मला माध्यमिक शिक्षण घेणे केवळ अशक्य होते. आमचे मुख्याध्यापक पतेवार सर यांनी कोणतीही फी न घेत मला मॅट्रिकपर्यंत शिक्षण द्यायचे ठरवले म्हणून आज मी शिक्षण घेत आहे. ते करुणेचे सागर आहे. त्यांनी आम्हाला नि:स्वार्थ सेवा शिकवली. मेयो रुग्णालयात ज्यांना कुणी भेटायलाही येत नाही अशा रुग्णांना भेटायला ते आम्हाला फळे घेऊन पाठवत असत. त्यांनीच आम्हाला अवांतर पुस्तके वाचायला देऊन आमचे मार्गदर्शन केले व वाचनाची सवय लावली. शिवाय स्वतंत्रपणे लेखन करायलाही प्रोत्साहित केले. प्रेमळपणाने माणसे जिंकण्याची कला मी त्यांच्यापासूनच शिकलो.