वडिलांस पत्र स्वाध्याय

वडिलांस पत्र स्वाध्याय

वडिलांस पत्र स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी

प्रश्न. 1. चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) राजगडाला ‘गडांचा राजा आणि राजांचा गड’ असे का म्हणतात ?

उत्तर :

राजगड बळकट आहे. तो अति उंच असून अवघड अशा डोंगरावर आहे. म्हणून त्याला गडांचा राजा म्हणतात. 1646 साली छत्रपती शिवाजीमहाराजांनी तो ताब्यात घेतला. म्हणून तो राजांचा गड झाला. म्हणून रायगडला ‘गडांचा राजा आणि राजांचा गड’ म्हणतात.

आ) शिक्षकांनी मुलांना राजगडाबाबत कोणती माहिती दिली ?

उत्तर :

सहलीला जाण्यापूर्वी शिक्षकांनी मुलांना राजगडाची प्रतिकृती दाखवली होती. त्यांनी सांगितले की 1646 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला. हा किल्ला जुना, दुर्लक्षित, ओसाड पण बळकट आहे. इतकेच नव्हे तर तो अति उंच असून अवघड अशा डोंगरावर आहे. शिक्षकांनी मुलांना राजगडाबाबत ही माहिती दिली.

इ) राजगडाचे भौगोलिक स्थान आगळेवेगळे आहे असे का म्हटले असावे ?

उत्तर :

राजगडांच्या उत्तरेला गुजवणी नदी आहे. दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण आहे. पूर्वेला पुणे-सातारा रस्ता आहे आणि पश्चिमेला सह्याद्रीला घाटमाथा आहे. म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे म्हटले असावे.

ई) मार्गदर्शकाने मुलांना राजगडाविषयी कोणती माहिती पुरवली ?

उत्तर :

राजगड किल्ल्याची उंची सर्वात जास्त आहे. याचा घेर बारा कोसांचा आहे. शिवाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला. त्याला राजधानीचे ठिकाण बनवले. राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम इथे करून घेतले. मार्गदर्शकाने ही माहिती मुलांना पुरवली.

उ) समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखा का जाणवला ?

उत्तर :

समीरला या किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅन सारखा जाणवला. कारण मध्यभागी पंख्याचा उंचवटा म्हणजे बालेकिल्ला आणि पंख्याची तीन पाती म्हणजे पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या तीन माच्या आहेत.

ऊ) राजगडाने कोणकोणत्या ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत.

उत्तर :

राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले. अंधाऱ्या रात्रीतील गुप्त खलबते ऐकली. महाराजांच्या अनेक नव्या मोहिमांची तयारी राजगडाने बघितली. अफझलखानाशी लढण्याचे बेत राजगडावर ठरले. पुरंदर पायथ्याशी तह करण्यास महाराज राजगडावरून गेले होते. महाराज आगऱ्याहून सुटून बैराग्याच्या वेशात परत आले ते राजगडावरच. राजगडाने ह्या सर्व ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत.

प्रश्न. 2. समीर असे का म्हणाला असावा ?

अ) महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे.

उत्तर :

महाराष्ट्रात तोरणा, सिंहगड (कोंढाणा), राजगड, पुरंदर, शिवनेरी, पन्हाळा इत्यादी अनेक किल्ले आहेत. म्हणून महाराष्ट्र हे किल्ल्यांचे राज्य असे समीर म्हणाला असावा.

आ) किल्ल्याहून मला परतावंसं वाटत नव्हतं.

उत्तर :

समीरने राजगडावरून भाटघर धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टिसौंदर्य पाहिले. म्हणून त्याला किल्ल्याहून परतावेसे वाटत नव्हते.

इ) मला एक फलक खूप आवडला.

उत्तर :

राजगडावर समीरने एक फलक पाहिला. त्यावर राजगडावर घडलेल्या ऐतिहासिक घटनांची नोंद होती. म्हणून तो फलक समीरला खूप आवडला.

ई) आपल्या सर्वासाठी अभिमानाची गोष्ट अशी, की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे.

उत्तर :

जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती स्विझर्लडमधील म्युझियममध्ये ठेवल्या आहेत. त्यात एक प्रतिकृती राजगडची आहे. म्हणून समीरला गोष्ट आपल्या सर्वासाठी अभिमानाची वाटते.

उ) आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघण्याचे ठरवूया का ?

उत्तर :

आपल्या पुरातन वास्तूंत देशाचा गौरवशाली इतिहास दडलेला आहे. म्हणून समीरने त्याच्या वडिलांना ‘आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघण्याचे ठरवूया का ?’ अशी विचारणा केली असावी.

ऊ) आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते.

उत्तर :

समीर वसतिगृहात राहतो. तिथले जेवण घेतो. म्हणून त्याला आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते.

प्रश्न. 3. बसस्थानकावर प्रवाशांसाठी ध्वनिक्षेपकातून दिल्या जाणाऱ्या सूचना कोणकोणत्या भाषांमध्ये दिल्या जातात ? त्यांतील तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही पाच सूचना लिहा.

उत्तर :

बसस्थानकावर प्रादेशिक, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांतून सूचना दिल्या जाताना. मला आवडलेल्या पाच सूचना अशा –

i) विशिष्ट गावाची बस या विशिष्ट प्लॅटफॉर्मवर लागली आहे.

ii) विशिष्ट गावाची बस अर्ध्या तासानंतर येईल.

iii) विशिष्ट गावाची बस या विशिष्ट मार्गे जात आहे.

iv) विशिष्ट गावाची बस या प्लॅटफॉर्मवरून लवकरच सुटत आहे.

v) प्रवाशांनी खिसेकापूपासून सावध राहावे.

प्रश्न. 4. राजगडाने कार्य पाहिले, खलबते ऐकली असे वर्णन आले आहे म्हणजे निर्जीव वस्तूला सजीव समजून असे वर्णन केले आहे. खालील वस्तूंचे या पद्धतीने दोन ओळींत वर्णन लिहा.

उदा.,

उत्तर :

प्रश्न. 5. राजगडाची वैशिष्ट्ये दिलेल्या तक्त्यात लिहा.

उत्तर :

प्रश्न. 6. तुम्ही पाहिलेल्या एखाद्या किल्ल्याचे आठ-दहा वाक्यांत वर्णन करा.

उत्तर :

आम्ही नागपूरचा सीताबर्डी हा ऐतिहासिक किल्ला पाहिला. हा किल्ला नागपूरचे रघुजी राजे भोसले यांची राजधानी होती. येथून राजांच्या शहरातील महालापर्यंत भुयारी रस्ता होता. रघुजी यांनी या किल्ल्यावर आपले सैन्य ठेवले होते. हा किल्ला इंग्रजांनी जिंकल्यावर त्यांनीही तेथे आपली मिलिटरी ठेवली. 15 ऑगस्ट 1947 तेथे असलेला इंग्रजांचा युनियन जॅक ह्या ध्वजाला खाली उतरवण्यात आले आणि भारताचा तिरंगा आकाशात लहरू लागला. आज हा किल्ला भारतीय मिलिटरीसाठी आरक्षित आहे. या किल्ल्यावर पिवळ्या रंगाचा एक स्तंभ आहे. ते इंग्रजांच्या काळातील आहे आणि त्यावर ‘येथे टिपू सुलतानच्या नातवाला फाशी दिली’ असे वाक्य कोरलेले आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला पायथ्याशी टेकडीवरच्या गणपतीचे मंदिर आहे. हा किल्ला फक्त स्वातंत्र्यदिनी किंवा गणराज्यदिनी लोकांकरिता खुला ठेवण्यात येतो.

प्रश्न. 7. समीरचे पत्र वाचून समीरचे बाबा त्याला काय उत्तर पाठवतील याची कल्पना करा व लिहा.

उत्तर :

खेळूया शब्दांशी

अ) खालील शब्दांत लपलेले शब्द लिहा.

अ) वसतिगृहातले

उत्तर :

वसतीगृहातले – i) वसती ii) गृह iii) आतले iv) सती v) सहा vi) तीस vii) हाव viii) हास ix) हात x) लेस

आ) भारतातील

उत्तर :

भारतातील – i) भार ii) भात iii) भाल iv) भारत v) आतील vi) रत vii) तार viii) ताल ix) तीर x) लता

इ) राजधानी

उत्तर :

राजधानी – i)राज ii) राधा iii) राणी iv) जरा v) जनी vi) धारा vii) निज viii) नीरा

आ) खालील शब्दांना दायी, शाली यांपैकी योग्य प्रत्यय लावून नवीन शब्द बनवा.

अ) गौरव

उत्तर :

गौरव – गौरवशाली

आ) वैभव

उत्तर :

वैभव – वैभवशाली

इ) सुख

उत्तर :

सुख – सुखदायी

ई) भाग्य

उत्तर :

भाग्य – भाग्यशाली

उ) आनंद

उत्तर :

आनंद – आनंददायी

ऊ) आराम

उत्तर :

आराम – आरामदायी

आपण समजून घेऊया

खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा.

i) साधा भविष्यकाळ

1) मी खूप शिक्षण घेणार.

उत्तर :

मी खूप शिक्षण घेणार.

2) नंदिनी सायकल चालवणार.

उत्तर :

नंदिनी सायकल चालवणार.

3) मुले विज्ञान प्रदर्शनात भाग घेणार.

उत्तर :

मुले विज्ञान प्रदर्शनात भाग घेणार.

वरील वाक्यांतील सर्व क्रियापदे भविष्यकाळातील आहेत. हा साधा भविष्यकाळ होय.

ii) पूर्ण भविष्यकाळ

1) वैमानिकाने विमान चालवले असेल.

उत्तर :

वैमानिकाने विमान चालवले असेल.

2) प्रकाशला बक्षीस मिळालेले असेल.

उत्तर :

प्रकाशला बक्षीस मिळालेले असेल.

3) वाहनचालकाने गाडी गॅरेजमध्ये ठेवलेली असेल.

उत्तर :

वाहनचालकाने गाडी गॅरेजमध्ये ठेवलेली असेल.

वरील क्रियापदांवरून क्रिया भविष्यकाळात पूर्ण होणार आहे असे दर्शवतात. हा पूर्ण भविष्यकाळ होय.

iii) अपूर्ण भविष्यकाळ

1) तो निबंध लिहीत असेल.

उत्तर :

तो निबंध लिहीत असेल.

2) गाडी प्लॅटफॉर्मवर आलेली असेल.

उत्तर :

गाडी प्लॅटफॉर्मवर आलेली असेल.

3) श्रेयाने स्पर्धा जिंकलेली असेल.

उत्तर :

श्रेयाने स्पर्धा जिंकलेली असेल.

वरील क्रियापदांवरून अपूर्ण क्रियापद बोध होतो. म्हणून ही वाक्ये अपूर्ण भविष्यकाळ होय.

iv) रीती भविष्यकाळ

1) सुरेश नेहमी गाणे म्हणत राहील.

उत्तर :

सुरेश नेहमी गाणे म्हणत राहील.

2) पक्षी चिवचिवाट करत राहतील.

उत्तर :

पक्षी चिवचिवाट करत राहतील.

3) साहिल कविता रचत राहील.

उत्तर :

साहिल कविता रचत राहील.

वरील क्रियापदांवरून भविष्यकाळात क्रिया सुरू राहतील, अशी रीती सांगितल्यामुळे ही वाक्ये रीती भविष्यकाळातील आहेत.

खालील सारणी पूर्ण करा.

काळ सामान्य अपूर्ण पूर्ण रीतिकाळ
वर्तमान मधुबाला तबला वाजवते. ………………..………………..मधुबाला तबला वाजवत असते.
भूतकाळ ………………..मधुबाला तबला वाजवत होती. ………………..………………..
भविष्यकाळ ………………..………………..मधुबालाने तबला वाजवला असेल. ………………..

उत्तर :

काळ सामान्य अपूर्ण पूर्ण रीतिकाळ
वर्तमान मधुबाला तबला वाजवते. मधुबाला तबला वाजवत होती. मधुबालाने तबला वाजवला. मधुबाला तबला वाजवत असते.
भूतकाळ मधुबालाने तबला वाजवला.मधुबाला तबला वाजवत होती. मधुबालाने तबला वाजवला होता.मधुबाला तबला वाजवत असे.
भविष्यकाळ मधुबाला तबला वाजवणारमधुबालाने तबला वाजवला असेलमधुबालाने तबला वाजवला असेल. मधुबाला तबला वाजवत राहील

Leave a Comment