परिवर्तन विचारांचे स्वाध्याय
परिवर्तन विचारांचे स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी

प्रश्न. 1. चार ते पाच वाक्यांत उत्तरे लिहा.
अ) अजय अस्वस्थ का झाला ?
उत्तर :
अजयची सहल शनिवारी जाणार होती. शनिवार म्हणजे ना कर्त्याचा वार, वाईट वार असतो असा अनेकांप्रमाणे अजयचाही समज होता. त्यातच अजय शनिवारी सकाळी उठला तेव्हा त्याला भिंतीवर पाल चुकचुकताना आढळली. हे अशुभ मानले जाते. शिवाय, तो घराबाहेर आला तेव्हा त्याला मांजर आडवे गेले. हा अपशकुन मानला जातो. या सर्व अपशकुनांमुळे अजय अस्वस्थ झाला.
आ) कोणताही वार हा वाईट नसतो हे सरांनी अजयला कसे पटवून दिले ?
उत्तर :
अजयची सहल शनिवारी संध्याकाळी परतली. सरांनी अजयला विचारले. ‘कशी झाली सहल ?’ अजय आनंदाने म्हणाला, ‘सर, खूप मस्त. खूप मजा आली. धमाल केली सर सहलीत. आजचा दिवस खूपच आनंदात तेल’ तेव्हा अजयच्या खांद्यावर हात ठेवत सर म्हणाले, ‘कोणताही वार हा वाईट नसतो.’ शनिवारी सहल असून ती आनंदात झाली असे अजय म्हणाला. त्यावरून सरांनी त्याला कोणताही वार वाईट नसतो हे पटवून दिले.
इ) कोणत्या दिवसाला किंवा वाराला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात ?
उत्तर :
ज्या दिवशी आपण वाईट काम करू, दुसऱ्याला त्रास होईल असे वर्तन करू, किंवा दुसऱ्याची मने दुखवू तो दिवस, तो वार वाईट म्हटला पाहिजे असे सर म्हणतात.
प्रश्न. 2. अजयचे मतपरिवर्तन कसे झाले ते सविस्तर लिहा.
उत्तर :
अजयची सहल शनिवारी होती. सकाळ त्याला पाल चुकचुकताना दिसली. तो घराबाहेर आला तेव्हा मांजर आडवे गेले. मुलांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे मुले बसमधून खाली उतरली. उतरताना अजयच्या मित्राचा पाय मुरगळला. झालेले अपशकुन व प्रत्यक्षातील घडलेल्या घटना यामुळे अजय/ अस्वस्थ झाला होता. पाय मुरगळला त्याला सरांनी डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्याचा मुरगळा काढला आणि तो हसत हसत परत बसमध्ये बसला.
सहलीत मुलांनी दिवसभर धमाल केली. कविता गायल्या, गाण्याच्या भेंड्या खेळल्या, गप्पा मारल्या, एकमेकांना कोडी घातली, नाच केला, विनोद केला, निसर्गाचे निरीक्षण केले, खूप गमतीजमती केल्या.
संध्याकाळी सहल परतली. सहलीबद्दल सरांनी अजयला विचारल्यावर अजय म्हणाला की, सहल खूप मस्त झाली, खूप मजा आली. यावर त्याच्या पाठीवर हात ठेवत सर म्हणाले की कोणताही वार किंवा दिवस वाईट नसतो. तू विज्ञानाचा विद्यार्थी असून असल्या अशास्त्रीय गोष्टींवर विश्वास कसा ठेवतोस ? जग किती पुढे गेले आहे. रोज नवे नवे शोध लागत आहेत. आणि आपण डोक्यात खुळचट कल्पना घेऊन बसतो. मांजर इकडून तिकडे फिरणारच. टायरला काही अणुकूचीदार रुतले तर तो पंक्चर होणारच. अपशकुन वगैरे काही नाही. ज्या दिवशी आपण वाईट काम करू, इतरांना त्रास होईल असे काम करू तो वाईट दिवस.
सहलीतील शनिवारीही प्रत्यक्ष आलेला आनंदाचा अनुभव आणि सरांनी केलेले मतप्रदर्शन यामुळे अजयचे मत परिवर्तन झाले.
प्रश्न. 3. कोण, कोणास व का म्हणाले ते सांगा.
अ) ‘आपली सहल नीट पार पडेल ना ?’
उत्तर :
अजय सरांना म्हणाला. कारण त्याला सकाळपासून अपशकुन होत होते आणि आता बसचा टायर पंक्चर झाला होता. त्यामुळे बसच्या खाली उतरताना त्याच्या मित्राचा पाय मुरगळला होता.
आ) ‘तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस.’
उत्तर :
सर अजयला म्हणाले. कारण अजयचा अपशकुन वगैरे अशास्त्रीय गोष्टींवर विश्वास आहे हे त्यांना कळले होते.
खेळूया शब्दांशी
अ) खालील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा.
अ) मैदान गाजवणे.
उत्तर :
क्रिकेटमध्ये शतक ठोकून विराटने मैदान गाजवले.
आ) एका पायावर तयार असणे.
उत्तर :
सहलीला जायला मनीषा एका पायावर तयार असते.
इ) कपाळावर आठ्या पसरणे.
उत्तर :
घरमालक किराया मागायला आला की जयाच्या कपाळावर आठ्या पडतात.
ई) मन खट्टू होणे.
उत्तर :
सहल रद्द झाल्याचे कळताच शुभाचे मन खट्टू झाले.
इ) ‘बिन’ हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खालील आकृतीत दिले आहेत. हे शब्द अभ्यासा. त्यानुसार ‘गैर’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द पुढील आकृत्यांमध्ये लिहा.

उत्तर :

ई) ‘झपझप’ या शब्दातून चालण्याची रीत समजते. तसे खालील शब्दांतून कोणत्या क्रियेची रीत समजते ते लिहा.
1. भरभर | चालणे, खाणे, बोलणे, आवरणे |
2. फाडफाड | |
3. धपधप | |
4. पटपट | |
5. धाडधाड |
उत्तर :
1. भरभर | चालणे, खाणे, बोलणे, आवरणे |
2. फाडफाड | बोलणे, मारणे |
3. धपधप | पडणे, गळणे |
4. पटपट | जेवणे, उचलणे, गुंडाळणे, बोलणे |
5. धाडधाड | बोलणे, चालणे |