यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय

यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय

यंत्रांनी केलं बंड स्वाध्याय इयत्ता नववी मराठी

प्रश्न. 1. फरक सांगा.

यंत्रांद्वारे केली जाणारी कामे माणसांद्वारे केली जाणारी कामे
1)1)
2)2)
3)3)
4)4)

उत्तर :

यंत्रांद्वारे केली जाणारी कामे माणसांद्वारे केली जाणारी कामे
1) कामे फारच वेगाने होतात. 1) त्या मानाने कामे हळूहळू होतात.
2) कामे अचूक असतात.2) कामात चुका राहू शकतात.
3) कामे ध्वनिलहरींवरही चालतात. 3) कामे विचारांवर चालतात.
4) कामात कंटाळा व आळस नसतो. 4) कामात कंटाळा व आळस असू शकतो.

प्रश्न. 2. पाठात खालील यंत्रे कोणती कार्ये करतात.

यंत्र कार्य
1) रोबो फोन 1)
2) यंत्रमानव2)
3) सह्याजी 3)

उत्तर :

यंत्र कार्य
1) रोबो फोन 1) रोबो फोनला नुसतं म्हटलं की माता तुमच्याशी बोलायचं आहे, की फोनला लाईट लागतो, दहा सेकंदात बोलणाऱ्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही, तर बझर वाजू लागतो. ऐकणारा तिथं नसेल तर रोबो फोन जो काय निरोप असेल तो ध्वनिमुद्रित करतो आणि ऐकणारा आला की त्याला तो निरोप देतो.
2) यंत्रमानव2) यंत्रमानव कितीतरी पत्र बारा सेकंदात टाईप करून देतात.
3) सह्याजी 3) सह्याजी कुणाच्याही सह्यांची हुबेहूब नक्कल करते.

प्रश्न. 3. दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकिते.

उत्तर :

1) यंत्रांनी ताबा घेतल्यावर ते माणसाला गुलाम करतील.

2) ते म्हणतील तसं निमूटपणे वागावं लागेल.

3) यंत्र जगावर राज्य करतील.

प्रश्न. 4. खालील शब्दांची विशेषणे, विशेष्य शोधा व लिहा.

उत्तर :

प्रश्न. 5. खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1) हकालपट्टी करणे.
2) स्तंभित होणे.
3) चूर होणे.
4) वठणीवर आणणे.
अ) आश्चर्यचकित होणे.
आ) योग्य मार्गावर आणणे.
इ) हाकलून देणे.
ई) मग्न होणे.

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1) हकालपट्टी करणे.
2) स्तंभित होणे.
3) चूर होणे.
4) वठणीवर आणणे.
इ) हाकलून देणे.
अ) आश्चर्यचकित होणे.
ई) मग्न होणे.
आ) योग्य मार्गावर आणणे.

प्रश्न. 6. खाली काही शब्दांची यादी दिली आहे. त्यांतील शब्दांचे उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द असे वर्गीकरण करा व लिहा.

अवलक्षण, भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, दरमहा, विद्वत्त, नाराज, निर्धन, गावकी, दररोज, बिनतक्रार, दगाबाज, प्रतिदिन

उत्तर :

प्रश्न. 7. स्वमत

अ) तुमच्या मते माणसाला ‘यंत्र’ हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल का ? सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर :

आमच्या मते माणसाच्या जागी सर्वोत्तम पर्याय ‘यंत्र’ ठरू शकणार नाही. कारण यंत्राला भावना नसतात. म्हणून मानवता, देशभक्ती, भाषाभिमान, आईचे वात्सल्य, जिव्हाळा ह्या गोष्टीच दिसणार नाहीत. मानवी जीवनच संपून जाईल. उदा. मानवतावादी मदर, स्त्रीकैवारी महात्मा फुले, समतावादी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कधी निर्माणच होणार नाहीत आणि खरी मानवी संस्कृतीही अस्तित्वात राहणार नाही. प्रेम, जिव्हाळाही उरणार नाही.

आ) ‘मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर ………’ कल्पनाचित्र रेखाटा.

उत्तर :

तर कामात यांत्रिकपणा येईल. प्रेम व जिव्हाळा उरणार नाही. हास्यविनोद, गजबज, जिवंतपणा सारंच संपून जाईल. जीवन एकटे, सुनंसुनं, उदास, शुष्क आणि निर्जीव, निकस वाटू लागेल. माणसं यंत्राचे गुलाम बनतील. भावना संपतील, भक्ती आणि श्रद्धाही संपून जातील, चिंतनालाही पूर्ण विराम मिळेल.

भाषाभ्यास

खाली दिलेली उदाहरणे वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

1) “दिवा जळे मम व्यथा घेउनी

असशिल जागी तूही शयनी

पराग मिटल्या अनुरागाने

उसाशांत वेचुनी गुंफुनी”

उत्तर :

शृंगार रस

2) “जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले

दैवाने नाही पडले

तोवरती तू झोप घेत जा बाळा

काळजी पुढे देवाला”

उत्तर :

करुण रस

3) “लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता

कवटाळुनि त्याला माता |

अति आक्रोशें, रडते केविलवाणी

भेटेन नऊ महिन्यांनी”

उत्तर :

वीर रस

4) आम्ही कोण म्हणूनी काय पुसता,

दाताड वेंगाडुनी

फोटो मासिक, पुस्तकांत न तुम्ही

का आमुचा पाहिला ?

उत्तर :

बीभत्स रस

6) “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार

पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल”

उत्तर :

हास्य रस

7) “ओढ्यांत भालु ओरडती

वाऱ्यात भुते बडबडती

डोहात सावल्या पडती”

उत्तर :

अद्भुत रस

8) “पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ

हत्तीवरूनि मत्त नृप खालती

मुकुट रंकास दे करटि भूपात्रती

झाड खट्खट तुझे खडग क्षुद्रां

धडधड फोड तट, रुद्र | ये चहुकडे|”

उत्तर :

भयानक रस

9) “जे खळांची व्यंकटी सांडो

तयां सत्कर्मी रती वाढो

भूतां परस्परे जडो | मैत्र जीवांचे”

उत्तर :

रौद्र रस

Leave a Comment