लिओनार्दो दा व्हिंची स्वाध्याय

लिओनार्दो दा व्हिंची स्वाध्याय

लिओनार्दो दा व्हिंची स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी

प्रश्न. 1. फरक स्पष्ट करा.

लिओनार्दो यांनी वर्णिलेला चित्रकला व शिल्पकला यांतील फरक

चित्रकला शिल्पकला

उत्तर :

चित्रकला शिल्पकला
चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी भरत राहतो. शिल्पकला यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देणारी असते. शिल्पकार दगडातला नको असलेला भाग काढत राहतो.

प्रश्न. 2. तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

अ) ‘आजही लोक लिओनार्दो यांच्या नोंदवह्यांचा अभ्यास करतात’ या विधानामागील कारण.

उत्तर :

त्यातली तंत्र समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

आ) तुमच्या मते लिओनार्दो यांचे जगावर असलेले ऋण.

उत्तर :

त्याने आपली चित्रे, शिल्प, बांधलेल्या इमारती, पूल आणि आपले संशोधन हे सारे जगासाठी तो आपल्यामागे ठेवून गेला हे त्याचे जगावर असलेले ऋण होय.

इ) ‘चित्रकार’ म्हणून लिओनार्दो हे अजरामर होण्याची कारणे.

उत्तर :

i) चित्र काढताना ते इतके तल्लीन व्हायचे की, अक्षरश: तहान भूक विसरून जायचे.

ii) चित्रे अस्सल व्हावीत म्हणून नानातऱ्हेचे प्रयोग करणे.

iii) मोनालिसासारखे अद्वितीय चित्र काढणे.

iv) त्यांना विविध विषयांत गती आणि रुची होती. त्यांच्या ‘रोजनिशी’चा अजूनही अभ्यास केला जातो आहे, यावरूनच त्यांची महती कळायला हरकत नाही. या कारणांमुळे ‘चित्रकार’ म्हणून लिओनार्दो अजरामर झाला.

खेळूया शब्दांशी

अ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.

अ) तहानभूक विसरणे

उत्तर :

तहानभूक विसरणे – कामापायी तहानभूमी पर्वा न करणे.

वा.उ. – जयश्री पुस्तक तपासतांना तहानभूकही विसरून जाते.

आ) मंत्रमुग्ध होणे

उत्तर :

मंत्रमुग्ध होणे – अतिशय तल्लीन होणे.

वा.उ. – अलश्री लता मंगेशकरचे गाणे ऐकताना मंत्रमुग्ध झाली.

इ) कोड्यात टाकणे

उत्तर :

कोड्यात टाकणे – पेचात टाकणे

वा.उ. – भाग्यश्रीने विलक्षण प्रश्न विचारून आम्हा सर्वाना कोड्यात टाकले.

आ) खालील तक्त्यात दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा व त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.

विरामचिन्हे विरामचिन्हाचे नाव वाक्य
.
;
?
!
‘ ‘
” “

उत्तर :

विरामचिन्हे विरामचिन्हाचे नाव वाक्य
.पूर्णविराम राम शाळेत गेला.
;अर्धविराम कारक + अर्थ = कारकार्य
उपपद + अर्थ = उपपदार्थ
?प्रश्नार्थक चिन्हकोण आहे तिकडे ?
!उद्गारवाचक चिन्ह बाप रे ! केवढे उंच झाड !
‘ ‘ एकेरी अवतरण ‘मारणे’ हे क्रियापद आहे.
” “दुहेरी अवतरण आई म्हणाली, “घरी लवकर ये.”

लिहिते होऊया

‘माझी आवडती कला’ या विषयावर दहा ओळींत माहिती लिहा.

उतर :

‘नाट्यकला’ ही माझी आवडती कला आहे. ही कला अतिशय प्रभावी व परिणामकारी आहे. इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांचे जीवनाचे गाल्सवर्दीच्या ‘जस्टिस’ या नाटकाने बदलून टाकले होते. नाटक केवळ रंजन करणारेच नसते. तर ते प्रबोधनपरही असते. नाट्यकलेत अभिनय, संगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य, दिग्दर्शन इत्यादी कलांचाही समावेश होत असतो. साहित्यकला ही प्रथमस्थानी असते. लेखकाएवढेच महत्त्व दिग्दर्शकाला व अभिनेत्याला असते. नाटकांच्या स्पर्धा होत असतात. सिनेमातील नट, नटी नाट्यकलेतून पुढे आले आहेत. महाविद्यालयात नाट्यकला शिकवली जाते. एखादे नाटक अभ्यासक्रमात नेमलेले असते. इतर कलांचे ‘प्रयोग’ होत नाहीत पण नाटकांचे प्रयोग होतात. वैचारिक नाटके श्रेष्ठ असतात, तर विनोदी नाटके लोकप्रिय होतात. मराठीची नाट्यपरंपरा समृद्ध आहे.

आपण समजून घेऊया

खालील शब्दांचे संधिविग्रह पूर्ण करून तक्ता पूर्ण करा.

संधी संधिविग्रह
शरत्काल …………+ …………
जगन्नाथ …………+ …………
तल्लीन …………+ …………
संताप …………+ …………

उत्तर :

संधी संधिविग्रह
शरत्काल शरद् + काल
जगन्नाथ जगत् + नाथ
तल्लीन तत् + लीन
संताप सन् + ताप

खालील तक्ता पूर्ण करा.

संधिविग्रहसंधी
सत् + आचार
सत् + मती
शब्द + छल
शरद् + चंद्र

उत्तर :

संधिविग्रहसंधी
सत् + आचार सदाचार
सत् + मती सद्गती
शब्द + छल शब्दच्छल
शरद् + चंद्र शरच्चंद्र

बातमी लेखन

खालील बातमी वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.

1) कोण ते लिहा.

अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे –

उत्तर :

श्री. अविनाश शिंदे

आ) समारंभाचे अध्यक्ष –

उत्तर :

श्री. सदाशिव शिंदे

इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे –

उत्तर :

रसिक

2) चौकट पूर्ण करा.

अ) शिबिराथींची संख्या –

उत्तर :

पंचवीस

आ) शिबिराथींनी शिबिरात शिकलेली कला –

उत्तर :

चित्रकला

इ) शिबिराचे ठिकाण –

उत्तर :

जि. प. प्राथमिक शाळा, उत्रौली

ई) शिबिर सुरू झाले ती तारीख –

उत्तर :

10 डिसेंबर

3) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टीविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.

उत्तर :

Leave a Comment