आम्ल आम्लारी ओळख स्वाध्याय इयत्ता आठवी

आम्ल आम्लारी ओळख स्वाध्याय इयत्ता आठवी सामान्य विज्ञान

1. खालील दिलेली द्रावणे आम्ल की आम्लारी ते ओळखा.

उत्तर :

2. सूत्रांवरून रासायनिक नावे लिहा.

H2SO4, Ca(OH)2, HCl, NaOH, KOH, NH4OH

उत्तर :

i) H2SO4 सल्फ्युरिक आम्ल

ii) Ca(OH)2कॅल्शिअम हायड्राॅक्साइड

iii) HCl – हायड्रोक्लोरिक आम्ल

iv) NaOH – सोडिअम हायड्राॅक्साइड

v) KOH – पोटॅशिअम हायड्राॅक्साइड

vi) NH4OH – अमोनिअम हायड्राॅक्साइड

3. सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वांत जास्त महत्त्व का आहे ?

उत्तर :

H2SO4 ला रासायनिक उद्योगामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. कारण –

i) याचा वापर अमोनियम सल्फेट आणि सुपर फॉस्फेट ऑफ लाईम यासारख्या खतांच्या निर्मितीत होतो.

ii) तसेच सल्फ्युरिक आम्लाचा वापर हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक आम्ल, फॉस्फरिक आम्ल, इथर, मेटल सल्फेटस् यांच्या निर्मितीत होतो.

iii) तसेच याचा उपयोग डाय, औषधे, सुगंधी द्रव्ये आणि कीटकनाशके तयार करण्यासाठी देखील होतो.

4. उत्तरे द्या.

अ. क्लोराइड क्षार मिळवण्यास कोणते आम्ल वापरले पाहिजे.

उत्तर :

क्लोराइड क्षार मिळवण्यासाठी हायड्रोक्लोरीक आम्ल HCl हे आम्ल वापरले पाहिजे.

आ. एका खडकाच्या नमुन्यावर लिंबाच्या रस पिळताच तो फसफसतो आणि त्यात निर्माण होणाऱ्या वायूने चुन्याची निवळी पांढरी बनते. खडकात कोणत्या प्रकारचे संयुग आहे ?

उत्तर :

खडकात धातूंचे कार्बोनेट (CO3) हे संयुग आहे.

इ. प्रयोगशाळेतील एका अभिक्रियाकारकाच्या बाटलीवरची चिठ्ठी खराब झाली. त्या बाटलीतील द्रव्य आम्ल आहे की नाही हे तुम्ही कसे शोधून काढाल ?

उत्तर :

बाटलीतील द्रव्यात निळ्या लिटमसचा कागद टाकला असता जर निळा लिटमस तांबडा झाला तर ते द्रव्य आम्ल आहे असे सिद्ध होते.

5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ. आम्ल व आम्लारीतील फरक स्पष्ट करा.

उत्तर :

आम्लआम्लारी
i) हायड्रोजन आयन H+ हा मुख्य घटक असतो.i) हायड्राॅक्साइड हा OH मुख्य घटक असतो.
ii) चव आंबट असते.ii) चव कडवट असते.
iii) सामान्यत: अधातू ऑक्साइडपासून आम्ल पासून तयार होते.iii) सामान्यत: धातू ऑक्साइडपासून आम्लारी तयार होते.

आ. दर्शकावर मिठाचा परिणाम का होत नाही ?

उत्तर :

दर्शकाचा रंग आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्कामुळे बदलतो. मीठ उदासीन क्षार आहे म्हणून दर्शकावर मिठाचा परिणाम होत नाही.

इ. उदासिनीकरणातून कोणते पदार्थ तयार होतात ?

उत्तर :

आम्ल आणि आम्लारीच्या उदासिनीकरणातून क्षार व पाणी हे पदार्थ निर्माण होतात.

आम्ल + आम्लारी क्षार + पाणी

HCl + NaOH NaCl + H2O

ई. आम्लाचे औद्योगिक उपयोग कोणते ?

उत्तर :

i) सल्फ्युरिक आम्ल :

अ) अमोनियम सल्फेट हे खत तयार करण्यासाठी.

आ) सोन्या चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी.

इ) मोटरीच्या बॅटरीत.

ii) हायड्रोक्लोरिक आम्ल :

अ) स्टार्चपासून ग्लुकोज तयार करण्यासाठी.

आ) औषधांमध्ये,

इ) प्रसाधनगृहे स्वच्छ करण्यासाठी.

iii) नायट्रिक आम्ल :

अ) सुगंधी द्रव्ये आणि औषधे तयार करण्यासाठी,

आ) रंग आणि स्फोटक द्रव्ये तयार करण्यासाठी,

इ) तांबे, पितळ, चांदी इत्यादी धातूंच्या भांड्यावर नक्षीकाम करण्यासाठी,

ई) सोन्या-चांदीच्या वस्तूंना चकाकी आणण्यासाठी.

6. रिकाम्या जागा भरा.

1. आम्लातील प्रमुख घटक ………………… आहे.

उत्तर :

आम्लातील प्रमुख घटक H+ आहे.

2. आम्लारीतील प्रमुख घटक …………………. आहे.

उत्तर :

आम्लारीतील प्रमुख घटक OH आहे.

3. टार्टारिक हे ………………… आम्ल आहे.

उत्तर :

टार्टारिक हे सौम्य आम्ल आहे.

7. जोड्या लावा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. चिंचa. अँसेटिक आम्ल
2. दहीb. सायट्रिक आम्ल
3. लिंबूc. टार्टारिक आम्ल
4. व्हिनेगरd. लॅक्टिक आम्ल

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. चिंचc. टार्टारिक आम्ल
2. दहीd. लॅक्टिक आम्ल
3. लिंबूb. सायट्रिक आम्ल
4. व्हिनेगरa. अँसेटिक आम्ल

8. चूक की बरोबर ते लिहा.

अ. धातूंची ऑक्साइडस् आम्लारीधर्मी असतात.

उत्तर :

बरोबर

आ. मीठ आम्लधर्मी आहे.

उत्तर :

चूक

इ. क्षारांमुळे धातूचे क्षरण होते.

उत्तर :

चूक

ई. क्षार उदासीन असतात.

उत्तर :

बरोबर

9. पुढील पदार्थांचे आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन या गटांत वर्गीकरण करा.

HCl, NaCl, MgO, KCl,, CaO, H2SO4, HNO3, H2O, Na2CO3

उत्तर :

आम्लधर्मी – HCl, H2SO4, HNO3

आम्लारीधर्मी – MgO, CaO, Na2CO3

उदासीन – NaCl, KCl, H2O

Leave a Comment