थोरांची ओळख डॉ खानखोजे स्वाध्याय
थोरांची ओळख डॉ खानखोजे स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी
प्रश्न. 1. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा.
अ) तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्यलढ्याविषयीच्या कथा ऐकत असत.
उत्तर :
सत्य
आ) भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं.
उत्तर :
असत्य
इ) लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला.
उत्तर :
सत्य
ई) भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले.
उत्तर :
सत्य
प्रश्न. 2. खालील आकृती पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न. 3. कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा.
अ) भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी ……………….. येथे प्राप्त केली.
(जपान/अमेरिका/मेक्सिको)
उत्तर :
भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली.
आ) ……………… या विषयात भाऊंचा दबदबा वाढला.
(फिजिक्स/जेनेटिक्स/मॅथमॅटिक्स)
उत्तर :
जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला.
इ) भाऊंनी ……………….. या विषयात डॉक्टरेट मिळवली.
(वनस्पतीशास्त्र/प्राणिशास्त्र/कृषिशास्त्र)
उत्तर :
भाऊंनी कृषिशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली.
प्रश्न. 4. मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात, त्यांची यादी तयार करा.
उत्तर :
मक्याचे पदार्थ खालील प्रमाणे –
i) मक्याची भाकर
ii) मक्याची उसळ
iii) मक्याचे वडे
iv) मक्याची खीर
शोध घेऊया
दूरदर्शन, वृत्तपत्रे, पुस्तके, आंतरजाल यांसारख्या विविध माध्यमांद्वारे तुम्हांला आवडणाऱ्या थोर व्यक्तींची माहिती मिळवा. त्या माहितीचे हस्तलिखित तयार करा.
उत्तर :
बाबा आमटे
बाबा आमटे यांचे पूर्ण नाव मुरलीधर देविदास आमटे होय. यांना थोर समाजसुधारक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात व भारतात ओळखले जाते. त्यांनी कृष्ठरोग्यांच्या कल्याणासाठी चालविलेले कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य खरोखरच अद्वितीय आहे. यांचा जन्म हिंगणघाट जि. वर्धा येथे 26 डिसेंबर 1914 रोजी झाला.
बाबा आमटे यांनी आपला वकिलीचा व्यवसाय सोडून महारोग्यांच्या सेवाकार्याला वाहून घेतले. त्यांना या कार्यात त्यांची पत्नी साधनाताई यांनी मोलाची साथ दिली. त्यासाठी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा या गावाजवळ ‘आनंदवन’ या नावाची एक वसाहत स्थापन केली. या वसाहतीत महारोग्यांच्या पुनर्वसनाच्या कामास सुरूवात झाली. त्यांनी येथे कुष्ठरोग्यांवर फक्त उपचार न करता त्यांना आत्मनिर्भर बनविले. त्यांच्या संस्थेच्या शेतामध्ये सर्व प्रकारची कामे हे कुष्ठरोगी करतात. त्या शेतामधून अन्नधान्य, भाजीपाला, फळे यांचे उत्पादन काढले जाते. शेतीच्या जोडीनेच इतर काही हस्तव्यवसायही तेथे चालविले जात आहेत. बाबा आमटे यांनी महारोगी सेवा समिती स्थापन केली.
तसेच बाबा आमटे हे राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. भारतीय जनतेच्या मनात राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागावी या उद्देशाने त्यांनी इ. स. 1985-86 मध्ये शंभर दिवसांचे ‘भारत जोडो’ अभियान पार पाडले. नर्मदा नदीवर धरण बांधण्याच्या सरकारच्या योजनेमुळे गरीब आदिवासी जनता व हजारो सामान्य शेतकऱ्यांना विस्थापित होण्याचा धोका होता. त्यांची पुनर्वसनाची जबाबदारीही संबंधित राज्यांनी घेतली नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक जनतेने श्रीमती मेघा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली ‘नर्मदा बचाव’ आंदोलन उभारले. बाबा आमटे यांनी आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले त्यामुळे नर्मदा बचाव आंदोलनाला फार मोठे सामर्थ्य व नैतिक बळ प्राप्त झाले.
बाबा आमटे यांनी ज्वाला आणि फुले, उज्ज्वल उद्यासाठी, माती जागवील त्याला मत यांसारखी पुस्तके लिहिली. त्यांना 1985 मध्ये ‘रॅमन मॅगसेसे’ पारितोषिक मिळाले. इ. स. 1986 मध्ये भारत सरकारने ‘पद्मविभूषण’ हा किताब दिला. तसेच पहिला जे.डी. बिर्ला पुरस्कार, मानवी हक्क पुरस्कार, टेंपल्टन पुरस्कार, 1991 च्या राईट लाइव्हलीहूड अँवॉर्ड, 1999 मध्ये महात्मा गांधी शांतता पुरस्कार यांचे ते मानकरी ठरले.
त्यांना 19 नोव्हेंबर 2002 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून ‘डी लिट’ सन्माननीय पदवी मिळाली. असे हे महान व्यक्तिमत्त्व 9 फेब्रुवारी 2008 मध्ये अनंतात विलिन झाले.
तुम्ही काय कराल ?
तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात, तेथील परिसरात फिरताना तुम्हांला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे.
उत्तर :
आम्ही गडावरील बाटल्या व कचरा जेवढा शक्य असेल तेवढा उचलून जागा स्वच्छ करू. शिवाय ‘या परिसरात कचरा केल्यास दंड केला जाईल’ अशा मोठ्या अक्षरातील पाट्या ठिकठिकाणी लावू.
वाचा
खाली दिलेला तक्ता पूर्ण करा.
वाक्य | क्रियापद | क्रियाविशेषण | क्रि.वि.चा प्रकार |
---|---|---|---|
1) काल तो मुंबईला गेला. | |||
2) तो भरभर जेवतो. | |||
3) इथे शहाळी मिळतात. | |||
4) मी तो धडा दोनदा वाचला. |
उत्तर :
वाक्य | क्रियापद | क्रियाविशेषण | क्रि.वि.चा प्रकार |
---|---|---|---|
1) काल तो मुंबईला गेला. | गेला | काल | कालवाचक |
2) तो भरभर जेवतो. | जेवतो | भरभर | रीतिवाचक |
3) इथे शहाळी मिळतात. | मिळतात | इथे | स्थलवाचक |
4) मी तो धडा दोनदा वाचला. | वाचला | दोनदा | संख्यावाचक |
खालील वाक्यांत कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये लिहा.
(ढसाढसा, सावकाश, टपटप, आपोआप)
1) माझ्या डोळ्यातून …………………. आसवे गळू लागली.
उत्तर :
माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळू लागली.
2) मी आईच्या गळ्यात पडून …………………. रडलो.
उत्तर :
मी आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडलो.
3) रात्र होताच सगळ्यांचे डोळे ……………….. मिटू लागतात.
उत्तर :
रात्र होताच सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात.
4) पक्ष्याने आपले पंख ………………… फडफडवले.
उत्तर :
पक्ष्याने आपले पंख सावकाश फडफडवले.