मानवी शरीर व इंद्रिय संस्था स्वाध्याय इयत्ता आठवी सामान्य विज्ञान

1. माझा जोडीदार शोधा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
|---|---|
| 1. ह्रदयाचे ठोके | अ. 350 मिली |
| 2. RBC | आ. 7.4 |
| 3. WBC | इ. 37°C |
| 4. रक्तदान | ई. 72 |
| 5. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान | उ. 50 ते 60 लक्ष प्रति घ. मिली |
| 6. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू | ऊ. 5000 ते 10000 प्रति घ. मिली |
उत्तर :
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
|---|---|
| 1. ह्रदयाचे ठोके | ई. 72 |
| 2. RBC | उ. 50 ते 60 लक्ष प्रति घ. मिली |
| 3. WBC | ऊ. 5000 ते 10000 प्रति घ. मिली |
| 4. रक्तदान | अ. 350 मिली |
| 5. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान | इ. 37°C |
| 6. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू | आ. 7.4 |
2. खालील तक्ता पूर्ण करा.
| इंद्रिय संस्था | इंद्रिये | कार्ये |
|---|---|---|
| 1. श्वसनसंस्था | ||
| 2. रक्ताभिसरण संस्था |
उत्तर :

3. नामनिर्देशित सुबक आकृत्या काढा.
अ. श्वसनसंस्था
उत्तर :

आ. ह्रदयाची आंतररचना
उत्तर :

4. सकारण स्पष्ट करा.
अ. मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते.
उत्तर :
कारण – i) मानवी रक्त लोहित रक्तपेशींनी बनलेले असते.
ii) लोहित रक्तपेशीत हिमोग्लोबिन घटक असतो. हिमोग्लोबिन या घटकामुळे मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते.
आ. श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते.
उत्तर :
कारण – i) बरगड्यावर जाणे आणि श्वासपटल खाली जाणे, या दोन्ही क्रिया एकाच वेळी घडून आल्याने फुफ्फुसांवरील दाब कमी होतो व बाहेरील हवा नाकाद्वारे फुफ्फुसांमध्ये जाते.
ii) बरगड्या मूळ जागी परत आले व श्वासपटल वर गेला की फुफ्फुसावर दाब पडून त्यातील हवा नाकाद्वारे बाहेर ढकलली जाते.
iii) त्यामुळे श्वासोच्छ्वास घडून येतो व श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते.
इ. रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते.
उत्तर :
i) रक्त कोणत्याही कृत्रिम रासायनिक पद्धतीने तयार करता येत नाही.
ii) जिवंत रक्तदात्याकडूनच केवळ रक्त काढून घेता येते.
iii) एखाद्या अपघातग्रस्त माणसाचा किंवा रुग्णाचा जीव या रक्तदानामुळे वाचू शकतो. म्हणून रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते.
ई. ‘O’ रक्तगट असलेल्या व्यक्तीला ‘सार्वत्रिक दाता’ म्हणतात.
उत्तर :
कारण – i) ‘O’ रक्तगट असलेल्या व्यक्तीचे रक्त इतर रक्तगट असलेल्या व्यक्तीस देता येते.
ii) याकारणाने ‘O’ रक्तगट असलेल्या व्यक्तीला ‘सार्वत्रिक दाता’ म्हणतात.
उ. आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे.
उत्तर :
i) मिठात सोडिअम असते. हे जादा सोडिअम रक्तदाब वाढवते.
ii) उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. ही स्थिती धोकादायक असू शकते, म्हणून आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे.
5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. रक्ताभिसरण संस्थेचा श्वसन, पचन व उत्सर्जन संस्थेशी असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात लिहा.
उत्तर :
i) श्वसन, पचन व उत्सर्जन या तीन संस्था एकमेकांशी नेहमीच समन्वयात काम करीत असतात.
ii) पचन संस्था जटिल अन्नपदार्थांचे साध्या व विद्राव पोषणद्रव्यांत रूपांतर करते.
iii) ही विद्राव्य पोषणद्रव्ये वाहत्या रक्तप्रवाहात शोषून प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात.
iv) श्वसन संस्थेच्या साहाय्याने हवेतील ऑक्सिजन रक्तात शोषला जातो.
v) हिमोग्लोबिनच्या साहाय्याने हा शोषलेला ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवला जातो.
vi) त्याच वेळी चयापचयाने निर्माण झालेला कार्बन डायऑक्साइड वायूंच्या देवाणघेवाण प्रक्रियेतून शरीरातून उच्छ्वासाच्या रूपात बाहेर टाकला जातो. अशा रीतीने तिन्ही संस्था एकमेकांशी सहयोग राखून समन्वयाने कार्य करतात.
आ. मानवी रक्ताची संरचना व कार्ये लिहा.
उत्तर :

मानवी रक्ताची कार्ये – i) उतींना प्राणवायू पुरवणे.
ii) यकृताकडून ग्लुकोज, अमिनो आम्ले आणि मेदाम्ले या घटकांचा पुरवठा. यातील मेदाम्ले प्लाझमा प्रथिनाबरोबर वाहून नेली जातात. ग्लुकोज आणि अमोनिया आम्ले मात्र रक्तरसामध्ये विरघळलेली असतात.
iii) कार्बन डायऑक्साइड, युरिया आणि लॅक्टिक आम्ल अशी अवशिष्टे काढून टाकते.
iv) श्वेतपेशींच्या साहाय्याने शरीरातील आगंतुक घटकांचा शोध आणि त्याविरुद्ध प्रतिकार यंत्रणा उभी करते. प्रतिपिंड निर्मिती करते.
v) रक्त कलयन – शरीरातील स्वयं दुरुस्ती यंत्रणा. शरीरातील रक्त वाहिन्यामधून बाहेर पडले म्हणजे रक्तकलयन यंत्रणा कार्यान्वित होते. प्लेटलेट्स रक्तातील थ्राॅबिनच्या तंतूमध्ये अडकून रक्त गोठते. उदा. जखमेमधून वाहणारे रक्त थांबते.
vi) संप्रेरकाचे वहन – ही शरीराची उतींना संदेश पाठवण्याची प्रभावी यंत्रणा आहे.
vii) रक्ताचे सामू नियंत्रण.
viii) शरीराच्या गाभ्यामधील तापमान नियंत्रण.
ix) द्रवीय कार्य इत्यादी.
इ. रक्तदानाचे महत्त्व व गरज स्पष्ट करा.
उत्तर :
महत्त्व व गरज – i) मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही.
ii) कृत्रिमरित्या रक्ताची निर्मिती होत नाही.
iii) रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारे रक्ताची गरज पूर्ण होते.
iv) थॅलसिमीया, सिकलसेल, पंडू रोग आजाराने ग्रस्त बालकांना, कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना रक्ताची नियमित आवश्यकता असते.
v) कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज पडेल हे सांगता येत नाही.
vi) आपल्या रक्तदान केलेल्या एका युनिटमधून रक्त व रक्तघटक वेगळे केले जातात. अशाच प्रकारे एका व्यक्तीच्या रक्तदानाने 1 ते 3 रुग्णांचे प्राण वाचू शकतात.
6. फरक स्पष्ट करा.
अ. धमन्या व शिरा
उत्तर :
| धमन्या | शिरा |
|---|---|
| i) ह्रदयापासून उतकाकडे ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीस धमन्या/रोहिण्या म्हणतात. अपवाद-फुफ्फुस धमनी. | i) उर्तीकडून कार्बन डायऑक्साईड युक्त रक्ताचे वहन ह्रदयाकडे करणाऱ्या रक्तवाहिणीस शिरा म्हणतात. अपवाद – फुफ्फुस शिरा. |
| ii) धमन्यांच्या भित्तिका जाड असून लवचिक असतात. | ii) शिरांच्या भित्तिका पातळ असून जास्त लवचिक असतात. |
| iii) धमन्या शरीरात खोलवर स्थित असतात व त्यांना झडपा नसतात. | iii) शिरा त्वचेखाली स्थिर असतात व त्यांना झडपा असतात. |
| iv) धमन्यांमध्ये रक्तदाब जास्त असतो. (100 mm Hg) | iv) शिरांमध्ये रक्तदाब कमी असतो. (2 mm Hg) |
| v) आकारांनुसार उतरता क्रम महाधमनी – धमन्या – धमनिका. | v) आकारानुसार उतरता क्रम महाशिरा – शिरा – शिरिका |
आ. बर्हि:श्वसन व अंत:श्वसन
उत्तर :
| बर्हि:श्वसन | अंत:श्वसन |
|---|---|
| i) बर्हि:श्वसन ही भौतिक प्रक्रिया आहे. | i) अंत:श्वसन ही जैव रासायनिक प्रक्रिया आहे. |
| ii) ऑक्सिजनयुक्त हवा फुफ्फुसात प्रवेश करणे तसेच कार्बन डायऑक्साईडयुक्त हवा फुफ्फुसाबाहेर टाकली जाणे या क्रियेला बहि:श्वसन म्हणतात. | ii) ज्या प्रक्रियेमध्ये पेशीत ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा मुक्त होते त्यास पेशीश्वसन किंवा अंत:श्वसन म्हणतात. |
| iii) बर्हि:श्वसनाची क्रिया श्वास आणि उच्छवास या दोन टप्पांमध्ये पूर्ण होते. | iii) अंत:श्वसनाची क्रिया विविध सजीवांमध्ये वेगवेगळी असते परंतु पहिली पायरी सर्व सजीवात समान असते. |
| iv) या क्रियेत रक्तातील ऑक्सिजन उतींमध्ये सोडल्या जातो. | iv) या क्रियेत वायुकोशिकेतील ऑक्सिजन रक्तामध्ये सोडल्या जातो. (2 mm Hg) |
| v) रक्तातील ऑक्सिजनचा दाब 100mm Hg पासून 40mm Hg पर्यंत कमी होतो. | v) रक्तातील ऑक्सिजनचा दाब 40mm Hg पासून 100mm Hg पर्यंत वाढतो. |
7. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्याल ?
उत्तर :
रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे पुढील निकष लक्षात घेतात.
- रक्तदान करणारा व्यक्ती 18 वर्षांवरील असावा.
- वजन 45 कि. ग्र. वर असावे.
- रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमीत कमी 12.5 ग्रॅम असावे.
- मागील 3 दिवसांत कोणतेही प्रति जैविक औषध घेतले नसावे.
- मागील 3 महिन्यात मलेरिया झाला नसावा.
- मागील 1 वर्षात विषमज्वर, कावीळ किंवा श्वानदंश होऊन रेबीजची लस घेतली नसावी.
- 6 महिन्यापूर्वी मोठी शस्त्रक्रिया झाली नसावी.
- गर्भवती महिला, महिलेला 1 वर्षांखालील मूल नसल्यास किंवा तिचा 6 महिन्यात गर्भपात झाला नसावा.
8. कंसात दिलेल्या पर्यायां चा योग्य ठिकाणी वापर करा व रिकाम्या जागा भरा.
(हिमोग्लोबीन, आम्लारीधर्मी, श्वासपटल, अस्थिमज्जा, ऐच्छिक, अनैच्छिक, आम्लधर्मी)
अ. रक्तातील तांबड्या पेशीमध्ये ……………… हे लोहाचे संयुग असते.
उत्तर :
रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबीन हे लोहाचे संयुग असते.
आ. ……………… हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्या दरम्यान असते.
उत्तर :
श्वासपटल हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्या दरम्यान असते.
इ. ह्रदय स्नायू ………………….. असतात.
उत्तर :
ह्रदय स्नायू अनैच्छिक असतात.
ई. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू pH ………………. असते.
उत्तर :
ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू pH आम्लारीधर्मी असते.
उ. RBC ची निर्मिती …………………. मध्ये असते.
उत्तर :
RBC ची निर्मिती अस्थिमज्जा मध्ये असते.
9. आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा.
अ. A, O, K, AB, B
उत्तर :
K इतर सर्व रक्तगट आहेत.
आ. रक्तद्रव्य, रक्तपट्टीका, रक्तपराधान, रक्तकणिका
उत्तर :
रक्तपराधान इतर सर्व रक्ताचे घटक आहेत.
इ. श्वासनलिका, वायूकोश, श्वासपटल, केशिका
उत्तर :
केशिका इतर सर्व श्वसन संस्थेतील आवश्यक अवयव आहेत. केशिका शरीरात सर्वत्र आढळतात.
ई. न्यूट्रोफिल, ग्लोब्युलिन्स, अँल्ब्युमिनम, प्रोथ्रोम्बीन
उत्तर :
न्यूट्रोफिल इतर सर्व रक्तद्रव्याचे घटक आहेत.
10. खालील उतारा वाचा व रोग/विकार ओळखा.
आज तिचे बाळ दीड वर्षाचे झाले, पण ते निरोगी, हसरे नाही. ते सारखे किरकिर करते, दिवसेंदिवस अशक्त दिसत आहे. त्याला धाप लागते. त्याचा श्वास फार जलद आहे. त्याची नखे निळसर दिसू लागली आहेत.
उत्तर :
अस्थमा
बाळाचे ह्रदय नीट कार्य करीत नसावे. निळसर नखे म्हणजे ऑक्सिजनची कमतरता हे दिसून येते. बाळाला श्वसन संस्थेचे देखील काही विकार असण्याचा संभव आहे.
11. तुमच्या शेजाराच्या काकांचे रक्तदाबाच्या विकाराचे निदान डॉक्टरांनी केले आहे. त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी त्यांनी काय करावे बरे ?
उत्तर :
रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी काकांनी पुढील मदतदायी उपाय करावेत :
- पोटॅशिअमची अधिक मात्रा असलेले अन्न सेवन करावे.
- मद्यसेवन टाळावे.
- नियमित व्यायाम करावा.
- अतिरिक्त प्रमाणात कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम संपुरके घ्यावी.
- तंतुमय पदार्थ अधिक असलेला शाकाहारी आहार घ्यावा.
- ताण-तणाव घालवण्यासाठी उपचार करावा.
- धूम्रपान टाळावे.
- कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे.
- मधुमेहावर नियंत्रण ठेवावे.
- रक्तदाब वाढवणारी औषधे टाळावी.
- वजन कमी कारणे.
- आहारात मिठाचे प्रमाण कमी करणे.