उत्तमलक्षण स्वाध्याय

उत्तमलक्षण स्वाध्याय

उत्तमलक्षण स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी

1) आकृत्या पूर्ण करा.

अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

इ)

उत्तर :

2) खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.

उत्तर :

3) खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.

गोष्टी दक्षता
1) आळस ……………………
2) परपीडा …………………….
3) सत्यमार्ग …………………….

उत्तर :

गोष्टी दक्षता
1) आळस सुख मानू नये
2) परपीडा करू नये
3) सत्यमार्ग सोडू नये.

4) काव्यसौंदर्य

अ) खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा.

‘जनीं आर्जव तोडूं नये | पापद्रव्य जोडूं नये |

पुण्यमार्ग सोडूं नये | कदाकाळी ||’

उत्तर :

‘उत्तमलक्षण’ मध्ये संत रामदास म्हणतात की, संकटात सापडले की माणसे ते संकट आपण दूर करावे म्हणून आपल्याला विनंती करत असतात. त्यांच्या विनंतीचा अव्हेर करू नये. त्यांच्या विनंतीनुसार त्यांना जेवढी मदत करणे आपल्यास शक्य आहे तेवढी मदत आपण अवश्य करावी. दुसरे असे की वाईट मार्गाने धन जोडू नये. कुणाला लुबाडून त्याचे धन हिसकावून घेणे. मालात भेसळ करणे, लाच खाणे, कामात घोटाळे करून पैसा मिळवणे. पैशासाठी विश्वासघात करणे ह्या मार्गांनी द्रव्य जोडू नये. पुण्यमार्ग कधीही सोडू नये. असा समाजहिताचा आशय यात आला आहे.

या पद्यपंक्तीचे शैलीच्या दृष्टीने विचार करता ‘तोडू, जोडू, सांडू’ या अनुप्रासामुळे या पंक्तीला काव्यसौंदर्य प्राप्त झाले आहे.

आ) ‘सभेमध्यें लाजों नये | बाष्कळपणें बोलों नये |’, या ओळीतील विचार स्पष्ट करा.

उत्तर :

‘उत्तमलक्षण’ मध्ये संत रामदास म्हणतात की सभेमध्ये बोलताना लाजू नये. सभाधीटपणा असावा. सभेत आपले विचार निर्भयपणे मांडायला हवेत. त्याचप्रमाणे मुद्देसूद बोलावे. त्याच फालतूपणा, बाष्कळपणा नसावा. त्या दोन गोष्टी कळल्या तरच सभेवर आपला प्रभाव पाडता येईल.

इ) ‘आळसें सुख मानूं नये’, या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर :

‘उत्तमलक्षण’ मध्ये संत रामदास म्हणतात की, आळसात सुख मानू नये. वास्तविक आळसामुळे आपल्या कार्याचा नाश होत असतो. अभ्यासाचा आळस केला केला तर अभ्यासाची कटकट चुकवल्याचा तात्पुरता आनंद वाटतो पण त्यामुळेच परीक्षेत गुण कमी मिळतात व पश्चातापाची पाळी येते. अभ्यासाच्याच नव्हे तर सर्वच कामात आळसामुळे कार्य नाश होतो.

Leave a Comment