मी वाचवतोय स्वाध्याय

मी वाचवतोय स्वाध्याय

मी वाचवतोय स्वाध्याय इयत्ता नववी मराठी

प्रश्न. 1. कोष्टक पूर्ण करा.

पूर्वीचे व्यवसाय पूर्वीचे खेळ

उत्तर :

पूर्वीचे व्यवसाय पूर्वीचे खेळ
किराणा मालाची दुकाने, कल्हई करणे, लोहारकाम, कुंभारकाम, सुतारकाम, सोनारकी. विटीदांडू, लगोऱ्या, आट्यापाट्या, पिंगा, मातीतले खेळ.

प्रश्न. 2. आकृती पूर्ण करा.

अ)

उत्तर :

प्रश्न. 3. सकारण लिहा.

जुन्या गोष्टींपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी त्या गोष्टी वाचवण्याची तुमच्या मते कारणे

उत्तर :

जुन्या गोष्टींपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी त्या गोष्टी वाचवण्याची तुमच्या मते कारणे
i) ‘आई’ हा शब्द‘आई’ या शब्दामागे मराठी संस्कृती उभी आहे. तशी मम्मी या शब्दामागे नाही. ‘आई’ शब्दामागे जिव्हाळा आहे. कळकळा आहे, वात्सल्य आहे.
ii) मराठी मातृभाषेचामातृभाषेचा अभिमान हे राष्ट्राभिमानाचे अपरिहार्य अंग आहे. ‘बॉबे’ चे मुंबई, ‘मुद्रास’ चे चेन्नई होण्यामागचे कारण हेच आहे.
iii) वाढदिवसाचे संस्कारपाश्चिमात्यांच्या पद्धतीप्रमाणे आज वाढदिवस मेणबत्या विझवून साजरे केले जातात. त्याच्या जीवनात प्रकाश विझून अंधार यावा असे सूचित होते. मराठी संस्कृतीत दिवे उजळून व आरती ओवाळून वाढदिवस साजरे केले जात असत. त्याच्या जीवनात प्रकाश यावा ही अर्थपूर्ण भूमिका होती.

प्रश्न. 4. काव्यसौंदर्य

अ) तुम्हांला जाणवलेली कवीच्या मनातील खंत स्पष्ट करा.

उत्तर :

प्रस्तुत कवितेत कवि सतीश काळसेकर यांनी महानगरीय जीवनातून पूर्वीच्या अनेक गोष्टी लुप्त होऊ लागल्या आहेत. त्याची कवीला खंत वाटते. कालानुरूप जुने बदलून नवे निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण काही गोष्टी अशा असतात की त्या जुन्या असतात म्हणूनच जपून ठेवण्याची गरज आहे. कारण तीच आपली खरी संस्कृती असते. म्हणूनच कवितेतून मातृभाषेचा अभिमान, संस्कृतीच्या दृष्टीने आई शब्द, मातृभाषा या गोष्टी कवितेसोबत वाचवण्याची कवीची धडपड आहे.

आ) ‘शब्द बापुडे केवळ वारा’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य शब्दबद्ध करा.

उत्तर :

मोबाईलमुळे लेखनकला नष्ट होत चालली आहे. जे लिहायचे ते वाट्सअँपवर बोलतात. निमंत्रणपत्रिकाही वाट्सअँपवर पाठवतात. त्यामुळे लेखन आणि शब्द वाऱ्याप्रमाणे येतात आणि निघून जातात. शब्दांची शब्दबद्धताच निघून गेली आहे.

इ) सामाजिक बदलांबाबत कवितेतून व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.

उत्तर :

‘आई’ ही हाक आज हद्दपार होत आहे. सुपरमार्केटमुळे किरण्याची दुकाने लुप्त होत आहेत. कल्हईवाले दिसत नाहीत. लोहार, कुंभार, चांभार यांचे छोटे उद्योगधंदे बंद पडले आहेत. क्रिकेट आणि अन्य पाश्चात्य खेळांमुळे आज मुले खो-खो, आट्यापाट्या हे स्वदेशी खेळ खेळत नाही. मुलीही आता पिंगा किंवा मातीतले खेळ खेळत नाहीत. स्वयंपाकाच्या चुली बंद पडून गॅसच्या शेगड्या आल्या आहे. मोबाईलमुळे लेखनही बंद पडले आहे. सामाजिक बदलाबद्दल असे विचार कवितेतून व्यक्त झाले आहेत.

प्रश्न. 5. स्वमत

अ) ‘माझी बोली’ या संकल्पनेतून तुम्हांला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा.

उत्तर :

आज भाषेचे बाळकडू मातृभाषेतून न मिळता इंग्रजी भाषेतून मिळते. आजची आई आपल्या मुलावर मोठ्या कौतुकाने इंग्रजी शब्दांचा व इंग्रजी भाषेचा संस्कार करते. मुलगा-मुलगी दोन वर्षाचे होताच त्याला इंग्रजी कान्व्हेंटमध्ये टाकते. त्याला मराठी मातृभाषेचा वाराही लागू देत नाही. त्याला ‘एक’ हा शब्दही समजत नाही. एक म्हणजे ‘वन’ असे त्याला सांगावे लागते. मातृभाषेविषयीची मराठी माणसाची ही प्रचंड अनास्था दूर व्हावी व त्याला मातृभाषेचा अभिमान वाटावा, कारण मातृभाषाभिमान हे राष्ट्राभिमानाचे अपरिहार्य अंग आहे. असा ‘माझी बोली’ या शब्दांतून कवीचा दृष्टिकोन व्यक्त झाला आहे.

आ) ‘मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

उत्तर :

‘मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो’ हे मत फारसे खरे नाही. कारण मॉल दूर असतात तर छोटे दुकानदार घराच्या जवळपास असतात. म्हणून ग्राहक दूर जाण्याऐवजी जवळच्याच दुकानातून माल खरेदी करतात. शिवाय, एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत छोट्या दुकानात थोडी स्वस्त तर मॉलमध्ये महाग असते. म्हणूनच ग्राहक मॉलमध्ये न जाता दुकानात जात असतात. असा आमचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे ‘मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो’ हे विधान मान्य करता येत नाही.

Leave a Comment