विद्याप्रशंसा स्वाध्याय
विद्याप्रशंसा स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी

प्रश्न. 1. खालील आकृत्या पूर्ण करा.
अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

प्रश्न. 2. तुलना करा.
धन | विद्या |
---|---|
1) | 1) |
2) | 2) |
3) | 3) |
उत्तर :
धन | विद्या |
---|---|
1) दिले तर कमी होते. | 1) दिली तर कमी होत नाही. |
2) श्रेष्ठत्व येत नाही. | 2) श्रेष्ठत्व येते. |
3) चोरीला जाते. | 3) चोरीला जात नाही. |
प्रश्न. 3. खालील ओळींचा तुम्हांला समजेलला अर्थ लिहा.
नानविध रत्नांची, कनकांची असति भूषणें फार
परि विद्यासम एकहि शोभादायक नसे अलंकार
उत्तर :
हिरे, मोती, पुखराज, पोवळे इ. नानविध रत्नांचे खूप अलंकार असतात. ते घातल्याने माणसाचे सौंदर्य वाढते, पण विद्या या अलंकारामुळे वाढणारे सौंदर्य इतके मोठे असते की त्यासमोर सर्व अलंकार निस्तेज होतात. विद्येसारखा दुसरा एकही अलंकार नसतो.
प्रश्न. 4. ‘विद्या’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर :
जगातील सर्वश्रेष्ठ अलंकार कोणता ?
प्रश्न. 5. तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अ) कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्त्व.
उत्तर :
‘विद्याप्रशंसा’ या कवितेत कवीने विद्या गुरूसारखी उपदेश करते, असे म्हटले आहे. विद्या ही संकटाच्या काळात उपाय सुचवते. आपले मनोरथ कल्पवृक्षाप्रमाणे पूर्ण करते. सर्व प्रकारचे सुख देते. सर्व दु:खाचे निवारण करते. हे कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्त्व आहे.
आ) ‘त्या विद्यादेवीतें अनन्यभावें सदा भजा भारी’, या ओळीचा सरळ अर्थ.
उत्तर :
त्या विद्यादेवीची एकनिष्ठपणे उपासना करा.
खेळूया शब्दांशी
अ) खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा.
1) मोठेपण –
उत्तर :
मोठेपण – श्रेष्ठत्व
2) नेहमी –
उत्तर :
नेहमी – सदा
3) अलंकार –
उत्तर :
अलंकार – भूषणे
4) मनातील इच्छा –
उत्तर :
मनातील इच्छा – मनोरथ
आ) खालील शब्दांचे प्रत्येकी पाच समानार्थी शब्द लिहा.
1) मित्र –
उत्तर :
i) दोस्त, ii) सुह्रद, iii) सखा, iv) सूर्य, v) भास्कर
2) सोने –
उत्तर :
i) कनक, ii) कांचन, iii) सुवर्ण, iv) हेम, v) स्वर्ण