रोजनिशी स्वाध्याय

रोजनिशी स्वाध्याय

रोजनिशी स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी

प्रश्न. 1. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) वैभवच्या रोजनिशीतील कोणते पण तुम्हांला सर्वात जास्त आवडले ते लिहा.

उत्तर :

बसमधल्या आजोबांचे पैशांचे पाकीट कुणीतरी मारले होते. ते तिकीट काढू शकत नव्हते. कंडक्टरने त्यांना पुढल्या स्टॉपवर उतरायला सांगितले होते. ते कावरेबावरे झाले होते. त्यांची छोटीशी नात रडू लागली. अशा वेळी वैभवने आपल्या खाऊचे पैसे काढून त्यातून आजोबांनी तिकीट काढली. वैभवची ही वृत्ती मला आवडली. म्हणून 15 नोव्हेंबरचे पान मला सर्वात जास्त आवडले. कारण ते प्रेरणादायी आहे.

आ) रोजनिशी का लिहावी ? तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

मनावर परिणाम करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपण कालांतराने विसरून जातो. त्या लिहून ठेवल्या की पुढे कितीतरी वर्षांनी वाचल्यानंतरही त्या घटना आपल्या डोळ्यापुढे उभ्या राहतात. आत्मचरित्राचा जणू हा पायाच असतो. म्हणून रोजनिशी लिहावी.

प्रश्न. 2. का ते लिहा.

अ) आजोबांची नात जोराने रडू लागली.

उत्तर :

पैसे हरवल्यामुळे आजोबा बसचे तिकीट काढू शकत नव्हते. म्हणून कंडक्टरने त्यांना पुढच्या स्टॉपवर उतरायला सांगितले होते. चिडक्या आवाजातील त्यांच्या बोलण्याचा आजोबांच्या नातीच्या मनावर परिणाम झाला. म्हणून आजोबांची नात जोराने रडू लागली.

आ) वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले.

उत्तर :

तिकीट काढायला आजोबांजवळ पैसे नव्हते. कंडक्टरने त्यांना उतरायला सांगितले होते. वैभवला त्यांनी करुणा आली. म्हणून वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले.

इ) आजोबांची नात खुदकन हसली.

उत्तर :

वैभवने आजोबा व त्यांची नात यांची तिकीट काढल्यामुळे त्यांच्या प्रवासातील अडचण दूर झाली. शिवाय वैभवने त्याच्या जवळचा बिस्किटाचा पुडा तिला दिला. म्हणून आजोबांची नात डोळे पुसून खुदकन हसली.

ई) मुलांनी शेतकऱ्याची माफी मागितली.

उत्तर :

मुले नागझरीला सहलीसाठी गेले होते. रस्त्यातील एका शेतात घुसून त्यांनी हरभऱ्याचे डहाळे उपटले. त्या शेतकऱ्याची परवानगी न घेता मुलांनी असे केले म्हणून गुरुजी मुलांवर खूप रागावले. यामुळे केलेल्या चुकीबद्दल मुलांनी शेतकऱ्याची माफी मागितली.

उ) शेतकऱ्याचे मुलांना थोडेसे डहाळे दिले.

उत्तर :

शेतकऱ्याला न विचारता मुलांनी शेतातील हरभऱ्यांचे डहाळे उपटले. त्यामुळे गुरुजी मुलांवर रागावले. केलेल्या चुकीबद्दल मुलांनी शेतकऱ्याची माफी मागितली. म्हणून मुलांची इच्छा लक्षात घेऊन शेतकऱ्याचे मुलांना थोडेसे डहाळे दिले.

ऊ) वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली.

उत्तर :

वर्गातील आठ-दहा मुलांना मुख्याध्यापकांनी विशेष कामासाठी बोलावले. त्यात वैभव होता. मुलांना रांगेने जायचे होते. रांगेत सर्वात पुढे राहण्याकरिता वैभव व राजू यांच्यात ढकलाढकली व वादावादी सुरू झाली. तेवढ्यात त्यांचे सर आले. आणि त्यांच्यावर रागावून वर्गात घेऊन गेले. वैभवला मुख्याध्यापकांकडे जाता आले नाही म्हणून वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली.

खेळूया शब्दांशी

अ) खालील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा.

1) कावरेबावरे होणे.

उत्तर :

चिमुरडी नीता घरात दिसली नाही म्हणून आम्ही कावरेबावरे झालो.

2) तोंडाला पाणी सुटणे.

उत्तर :

हलवाई जिलबी काढताना पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले.

3) वादावादी होणे.

उत्तर :

वडिलांच्या इस्टेटीवरून दोन भावांत खूप वादावादी झाली.

4) खाली मान घालणे.

उत्तर :

राजूची चोरी उघडकीस आली तेव्हा तो वडिलांपुढे खाली मान घालून उभा राहिला.

आ) हरभऱ्याला डहाळा तसे खालील गोष्टींसाठी काय म्हणतात ते लिहा.

1) गहू

उत्तर :

गहू – ओंबी

2) लसूण

उत्तर :

लसूण – गाठ

3) ज्वारी

उत्तर :

ज्वारी – धांडे

4) चिंच

उत्तर :

चिंच – गोळा

5) ऊस

उत्तर :

ऊस – पेरे

प्रश्न. 4. हरभऱ्याचे डहाळे पाहून मुलांच्या तोंडाला पाणी सुटले. शिवार वा शेतातून जाताना कोणत्या वस्तू पाहिल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटते ? त्या वस्तूंची यादी करा.

उत्तर :

i) चिंच

ii) बोरे

iii) आवळे

iv) चारं

v) कवठं

प्रश्न. 5. वैभवची शाळा सुटल्यापासून तो घरी पोहोचेपर्यंत कोणकोणत्या घटना घडल्या ते क्रमवार लिहा.

उदा., शाळा सुटल्यावर बसस्टॉपवर पोहोचणे.

उत्तर :

i) वैभव बसमध्ये चढला.

ii) एक आजोबा व नात यांच्याजवळ बसायला त्याला जागा मिळाली.

iii) त्याने कंडक्टरला पास दाखवली.

iv) कंडक्टरने आजोबांना तिकीटासाठी पैसे मागितले.

v) आजोबांचे पैशाचे पाकीट कुणीतरी मारल्यामुळे ते पैसे देऊ शकत नव्हते.

vi) कंडक्टरने त्यांना पुढच्या स्टॉपवर उतरायला सांगितले.

vii) नात रडू लागली.

viii) वैभवने आपल्या जवळच्या पैशातून आजोबा व त्यांची नात यांची तिकिटे काढली.

ix) आजोबांच्या नातीला बिस्किटाचा पुडा दिला.

x) तिने डोळे पुसले व ती खुदकन हसली. वैभवची शाळा सुटल्यापासून घरी पोहोचेपर्यंत या घटना क्रमवार घडल्या.

प्रश्न. 6. तुमचे मुख्याध्यापक किंवा वर्गशिक्षक कोणकोणती विशेष कामे तुम्हांला सांगतात ? त्या कामांची यादी करा.

उत्तर :

मुख्याध्यापक किंवा वर्गशिक्षक वर्गातील कुणाचा तब्बेत अचानक बिघडली तर ते आम्हाला त्या विद्यार्थ्याला त्याच्या घरी नीट पोहचवून द्यायला सांगतात. शाळेत काही कार्यक्रम असला की ते आम्हाला प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्वागतगीताची तयारी करायला सांगतात. वाचनालयातील पुस्तके नीट लावण्याचेही विशेष काम आमच्यावर सोपवतात. एकदा मी स्वागतगीत गायलो. स्वागतगीत संपल्यावर श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या. प्रमुख अतिथींनी मला जवळ बोलावून माझ्या पाठीवर शाबासकी दिली. मुख्याध्यापकांनी व सरांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी पात्र ठरलो, हा एकच विचार माझ्या मनात घोळत होता.

प्रश्न. 7. वर्गात तुमचे काही चुकले असेल आणि ते तुम्हांला पटले असेल, त्यावेळी तुमच्या मनात कोणते विचार येतात ? तुमचा अनुभव सात-आठ ओळींत लिहा.

उत्तर :

सर वर्गात शिकवत होते. माझ्या शेजारी बसलेला राजू मला हळूच म्हणाला, ‘काल मी खूप मस्त विनोद ऐकला. मी पोट धरूनधरून हसलो. तू जरा इकडे सरक, मी तुला सांगतो.’ आम्ही दोघंही सरकून जवळ आलो. त्यानं विनोद सांगितला. दोघंही खळखळून हसलो. सरांचं आमच्याकडे लक्ष गेलं. ते ओरडले, ‘काय चाललंय तिकडे ?’ आम्ही एकदम चूप झालो. माझी चूक मला मान्य होती. सर शिकवत असताना आम्ही बोलणं चुकीचंच होतं. एकदा वाटलं, वर्गात उभं राहून सरांची माफी मागावी. पण नंतर मनात विचार आला, ‘मी का म्हणून माफी मागावी ? मुळात चूक राजूची होती. हे दोन्ही प्रकारचे विचार एकाच वेळी माझ्या मनात आले.

प्रश्न. 8. खालील गोष्टींसाठी केल्या जाणाऱ्या क्रियांना काय म्हणतात ते लिहा.

उदा., डहाळे – उपटणे

1) ज्वारीचे कणीस

उत्तर :

ज्वारीचे कणीस – तोडणे

2) भेंडी, मिरच्या

उत्तर :

भेंडी, मिरच्या – तोडणे

3) रताळी, बटाटे

उत्तर :

रताळी, बटाटे – खुरपणे

4) बाजरीचे कणीस

उत्तर :

बाजरीचे कणीस – कापणे

5) ऊस

उत्तर :

ऊस – तोडणी, कापणे

प्रश्न. 9. खालील घटना घडल्या हे पाठातील कोणत्या वाक्यांवरून समजते ?

1) वैभवची शाळा पाच वाजता सुटते.

उत्तर :

शाळेजवळच्या बसस्टॉपवरून संध्याकाळी पाच वाजता बसमध्ये चढलो.

2) आजोबांची नात खूप घाबरली.

उत्तर :

चिडलेल्या आवाजातील कंडाक्टरचा संवाद ऐकून नात जोराने रडू लागली.

3) सहलीला गेलेल्या मुलांना हरभरा आवडतो.

उत्तर :

तेथे हरभऱ्याचे डहाळे लागले होते. ते पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले.

4) सहलीतील मुलांना त्यांची चूक समजली.

उत्तर :

खरंच आमचं चुकलंच होतं.

Leave a Comment