हसरे दुःख स्वाध्याय
हसरे दुःख स्वाध्याय इयत्ता नववी मराठी

प्रश्न. 1. आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतिबंध पूर्ण करा.
1)

उत्तर :

2)

उत्तर :

प्रश्न. 2. खाली दिलेल्या घटनांचा परिणाम लिहा.
घटना | परिणाम |
---|---|
1) चार्लीने जॅक जोन्स म्हणायला सुरुवात केली. | 1) |
2) प्रेक्षागृहात वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले. | 2) |
3) प्रेक्षागृहातील आरोळ्या स्टेज मॅनेजरने ऐकल्या. | 3) |
उत्तर :
घटना | परिणाम |
---|---|
1) चार्लीने जॅक जोन्स म्हणायला सुरुवात केली. | 1) वाद्यवृंद साथ देऊ लागला. |
2) प्रेक्षागृहात वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले. | 2) जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे सारे श्रोते एकदम शांत झाले. |
3) प्रेक्षागृहातील आरोळ्या स्टेज मॅनेजरने ऐकल्या. | 3) तो धावतपळत येऊन चार्लीच्या विंगमध्ये शेजारी उभा राहिला. |
प्रश्न. 3. अ) कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यांत योग्य उपयोग करा.
(अवेहलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे)
1) आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येतात दिसताच कैऱ्या पडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली.
उत्तर :
आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येतात दिसताच कैऱ्या पडणाऱ्या मुलांचा चेहरा पांढरा फटफटीत पडला.
2) शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पाऊल टाकले.
उत्तर :
शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पदार्पण केले.
3) दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे थक्क झाले.
उत्तर :
दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे स्तिमित झाले.
4) गुणवान माणसांचा अनादर करू नये.
उत्तर :
गुणवान माणसांची अवहेलना करू नये.
ब) खालील वाक्यांतील आधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
1) तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला.
उत्तर :
तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकलीने सावरला.
2) तिच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही.
उत्तर :
त्याच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही.
3) नर्टकीचे नृत्य प्रेक्षणीय होते.
उत्तर :
नर्टकाचे नृत्य प्रेक्षणीय होते.
4) सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या गायनाने रंगला.
उत्तर :
सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायिकेच्या गायनाने रंगला.
4. स्वमत
1) चार्लीच्या तुम्हांला जाणवलेल्या गुणांचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
उत्तर :
चार्लीला स्टेज डेअरिंग होत. त्याला मॅनेजरने अचानकपणे स्टेजवर आणलं तरी तो सहजपणे उभा होता. त्याला प्रेक्षकांची यत्किंचितही भीती वाटली नव्हती. तो उत्तम गायक होता. त्याचं गाणं ऐकताना प्रेक्षक इतके भारावले की त्यांनी स्टेजवर पैशाची उधळण सुरू केली. त्याच्यात बोलण्याची धिटाई होती. तो प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला की, ‘मी आधी हे पैसे गोळा करतो. म्हणतांना त्यानं अगदी आपल्या आईसारखा आवाज काढला. सातत्य ही त्याची वृत्ती होती. चार्लीन रंगमंचावर पहिलं पदार्पण केलं ते कायमचं.
2) स्टेज मॅनेजरच्या जागी तुम्ही आहात अशी कल्पना करून त्या प्रसंगात तुम्ही कसे वागाल ते सविस्तर लिहा.
उत्तर :
स्तेज मॅनेजरच्या जागी आम्ही असतो तर प्रेक्षकांचा कल्लोळ ऐकून आम्हीही स्टेजवर धावून गेलो असतो आणि सर्वप्रथम डॉक्टरला बोलावणे पाठवले असते. नंतर चार्लीच्या पाठीवर हात फिरवून, त्याला आई गात असलेलं गाणे म्हणायला लावले असते. शिवाय पैसे गोळा करताना ते ‘तुझ्या आईला देत आहे’ असे सांगितले असते. त्यामुळे चार्लीच्या जीवाची घालमेल झाली नसती. ‘या नव्या कलावंताचे आपण टाळ्या वाजवून कौतुक करू या’ असे प्रेक्षकांना सांगून चार्लीला प्रोत्साहित केले असते.
3) ‘हसरे दुःख’ या शीर्षकाचा तुम्हांला समजलेला अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
आपला आवाज गेला यामुळे लिलीला दुःख झाले होते. पण आपली जागा चार्लीने घेतली आहे या जाणिवेने ती आपले दुःख विसरून आनंदित झाली होती. हेच हसरे दुःख होय, वेगळ्या शब्दांत सांगायचे तर ‘अश्रूंची फुले झाली होती’.