ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ स्वाध्याय
ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ स्वाध्याय इयत्ता नववी मराठी

प्रश्न. 1. आकृती पूर्ण करा.
अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

प्रश्न. 2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.
1) पहिले ऑलिंपिक व्हिलेज……………. येथे वसले.
अ) ग्रीस
आ) मेलबोर्न
इ) फ्रान्स
ई) अमेरिका
उत्तर :
पहिले ऑलिंपिक व्हिलेज मेलबोर्न येथे वसले.
2) …………… पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.
अ) 1896
आ) 1956
इ) इ. स. 776
ई) इ. स. पूर्व 394
उत्तर :
1896 पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.
प्रश्न. 3. खालील वाक्य वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखाद्या शब्दाला खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे – हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे – हे चिन्ह येईल.
1) पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.
अ. क्र. | शब्द | मूळ शब्द | शब्दजात | प्रकार | लिंग | वचन | विभक्ती |
---|---|---|---|---|---|---|---|
1) | पुरुषांसाठी | ||||||
2) | व | ||||||
3) | स्त्रियांसाठी | ||||||
4) | वेगवेगळे | ||||||
5) | सामने | ||||||
6) | होतात |
उत्तर :
अ. क्र. | शब्द | मूळ शब्द | शब्दजात | प्रकार | लिंग | वचन | विभक्ती |
---|---|---|---|---|---|---|---|
1) | पुरुषांसाठी | पुरुष | नाम | सामान्यनाम | पुल्लिंग | अनेक | चतुर्थी |
2) | व | व | अव्यय | उभयान्वयी | – | – | – |
3) | स्त्रियांसाठी | स्त्री | नाम | सामान्यनाम | स्त्रीलिंग | अनेक | चतुर्थी |
4) | वेगवेगळे | वेगवेगळा | विशेषण | गुणवाचक | – | अनेक | – |
5) | सामने | सामना | नाम | सामान्यनाम | पुल्लिंग | अनेक | प्रथमा |
6) | होतात | होणे | क्रियापद | सकर्मक | पुल्लिंग | अनेक | – |
प्रश्न. 4. स्वमत
1) ‘ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व’ ही संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर :
ऑलिंपिकच्या मैदानावर एक ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील पाच खंडाची पाच वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. दुसरे असे की विश्वबंधुत्वामुळे राजकीयदृष्ट्या शत्रू असलेल्या राष्ट्रालाही यजमानराष्ट्राला इतर राष्ट्रांप्रमाणेच समतेने वागवावे लागते. कुणालाही मज्जाव करता येत नाही. तिसरे म्हणजे पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रांतील खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. चौथे म्हणजे ‘ऑलिंपिक व्हिलेज’ सर्वासाठीच मोकळे असते. या सर्व कारणांनी ‘ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व’ हेच सिद्ध होते.