सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 2 इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-2

1. खालील तक्ता पूर्ण करा.
| अलैंगिक प्रजनन | लैंगिक प्रजनन |
|---|---|
| 1. कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. | 1. ……………………………… |
| 2. ……………………………… | 2. लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांची आवश्यकता असते. |
| 3. हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. | 3. ……………………………… |
| 4. ……………………………… | 4. या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो. |
| 5. द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती, इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते. | 5. ……………………………… |
उत्तर :
| अलैंगिक प्रजनन | लैंगिक प्रजनन |
|---|---|
| 1. कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. | 1. दोन जननपेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास लैंगिक प्रजनन म्हणतात. |
| 2. अलैंगिक प्रजननासाठी केवळ एकाच सजीवाची आवश्यकता असते. | 2. लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांची आवश्यकता असते. |
| 3. हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. | 3. हे प्रजनन सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन या दोन्हींच्या मदतीने होते. |
| 4. या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या तंतोतंत जनकासारखाच असतो. | 4. या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो. |
| 5. द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती, इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते. | 5. सर्व सजीवांमध्ये लैंगिक प्रजनन हे युग्मकनिर्मिती आणि फलन यांद्वारे घडून येते. |
2. रिकाम्या जागा भरा.
अ. मानवी शुक्रपेशींची निर्मिती ………………… या अवयवात होते.
उत्तर :
मानवी शुक्रपेशींची निर्मिती वृषण या अवयवात होते.
आ. मानवामध्ये ……………….. हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.
उत्तर :
मानवामध्ये Y हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.
इ. पुरुष आणि स्त्री जननसंस्थेमध्ये ……………….. ही ग्रंथी समान असते.
उत्तर :
पुरुष आणि स्त्री जननसंस्थेमध्ये कंद-मूत्रमार्ग ही ग्रंथी समान असते.
ई. भ्रूणाचे रोपण ……………….. या अवयवामध्ये होते.
उत्तर :
भ्रूणाचे रोपण गर्भाशय या अवयवामध्ये होते.
उ. भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय ……………….. हे प्रजनन घडून येते.
उत्तर :
भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय अलैंगिक हे प्रजनन घडून येते.
ऊ. शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन ……………….. प्रकारचे आहे.
उत्तर :
शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन खंडीभवन प्रकारचे आहे.
ए. परागकोशातील कोष्ठकांमध्ये ……………….. विभाजनाने परागकण तयार होतात.
उत्तर :
परागकोशातील कोष्ठकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात.
3. खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा.
(पितपिंडकारी संप्रेरक,गर्भाशयाचे अंत:स्तर, पुटिका ग्रंथी संप्रेरक, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन, पितपिंड)
अंडाशयातील पुटीकेची वाढ …………… संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे ……………………. ची वाढ होते/पुनर्निर्मिती होते. ……………….. संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटीकेच्या उर्वरित भागापासून ……………….. तयार होते. ते ……………….. व ……………….. ही संप्रेरके स्त्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली ……………….. च्या ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते.
उत्तर :
अंडाशयातील पुटीकेची वाढ पुटिका ग्रंथी संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे गर्भाशयाच्या अंत:स्तराची वाढ होते/पुनर्निर्मिती होते. पितपिंडकारी संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटीकेच्या उर्वरित भागापासून पितपिंड तयार होते. ते इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरोन ही संप्रेरके स्त्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंत:स्तरातील च्या ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते.
4. थोडक्यात उत्तर द्या.
अ. एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे प्रकार :
1. द्विविभाजन :

i) या प्रकारात जनकपेशीचे दोन समान भागांत सूत्री किंवा असूत्री पद्धतीने विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होतात.
ii) हे विभाजन आदिकेंद्रकी सजीव, आदिजीव आणि दृश्यकेंद्रकी पेशीमधील तंतुकणिका आणि हरितलवके या पेशी अंगकांमध्ये घडते.
विभाजन अक्षांवरून द्विविभाजनाचे पुढील प्रकार पडतात.
a) साधे द्विविभाजन : उदा. अमिबा
विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजित होतो.
b) आडवे द्विविभाजन : उदा. पॅरामेशिअम
c) उभे द्विविभाजन : उदा. युग्लीना
2. बहुविभाजन :

i) ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते त्यावेळी अमिबा आणि तत्सम एक पेशी, गोलाकार होतात आणि पेशीपटलाभोवती कठीण, संरक्षक कवच तयार करतात, अशा कोणत्याही कवचबद्ध सजीवाला ‘पुटी’ म्हणतात.
ii) प्रथमत: पुटीमध्ये फक्त केंद्रकाच्या अनेक वेळा होणाऱ्या सूत्री विभाजनाने अनेक केंद्रके तयार होतात.
iii) मग पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा त्या पुटीत तयार होतात.
iv) अनुकूल परिस्थिती आल्यानंतर पुटी फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात.
3. कलिकायन :
i) एकपेशीय किंण्व जनकपेशीमध्ये सूत्री विभाजनाने दोन नवजात केंद्रके तयार होतात.
ii) जनकपेशीच्या पृष्ठभागावर एक बारीकसा फुगवटा येतो, तो म्हणजेच कलिका होय.
iii) दोन नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करते.
iv) कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनकपेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात पेशी म्हणून वाढू लागते.
आ. IVF ही संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर :
i) IVF (In Vitro Fertilization) या तंत्रामध्ये काचनलिकेमध्ये दोन युग्मकांचे फलन घडवून आणले जाते.
ii) तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो.
iii) शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्र वापरून अपत्यप्राप्ती करता येते.
इ. लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल ?
उत्तर :
लैंगिक आरोग्य राखण्यासाठी घ्यावयाची काळजी :
i) गुप्तागांची वेळोवेळी स्वच्छता राखा.
ii) मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांनी आपल्या जननेंद्रियाची स्वच्छता ठेवावी.
iii) लैंगिक संबंधांतून संक्रमित होणाऱ्या रोगांचा संसर्ग होईल अशी धोक्याची परिस्थिती टाळावी.
iv) लैंगिकतेशी संबंधित बाबींच्या शास्त्रीय स्वरूपाच्या माहितीचा अभ्यास करावा.
ई. आर्तव चक्र म्हणजे काय ? आर्तव चक्राचे संक्षिप्त वर्णन करा.
उत्तर :
i) यौवनावस्थेनंतर स्वीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलांची दर 28-30 दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती होत असते. या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आर्तवचक्र किंवा ऋतुचक्र असे म्हणतात.
ii) आर्तव चक्राचे पुटिका ग्रंथी संप्रेरक, पितपिंडकारी संप्रेरक, इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या चार संप्रेरकांद्वारा नियंत्रण होते.
iii) पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते. ही विकसनशील पुटिका ‘इस्ट्रोजेन’ संप्रेरक स्त्रवते.
iv) इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंत:स्तराची वाढ किंवा पुननिर्मिती होते.
v) पितपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यांतील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. यालाच अंडमोचन म्हणतात.
vi) अंडाशयामध्ये फुटलेल्या रिकाम्या पुटकेपासून प्रोजेस्टेरॉननिर्मिती करणारे पितपिंड तयार होते.
vii) प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंत:स्तरातील ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात होते व असे अंत:स्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते.
viii) जर अंडपेशींचे फलन 24 तासात झाले नाही, तर पितपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रुपांतर स्त्रवणे पूर्णपणे थांबते.
ix) या संप्रेरकांच्या अभावामुळे गर्भाशयाचा अंत:स्त्रवाचा ऱ्हास होण्यास सुरूवात होऊन त्या अंत:स्तरातील ऊती आणि अफलित अँडपेशी व रक्त योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते.
x) मोठ्या प्रमाणात होणारा हा रक्तस्त्राव साधारणात: चार-पाच दिवस सुरू राहतो. यालाच ऋतुस्त्राव/मासिक पाळी असे संबोधतात.
5. लैंगिक प्रजननातील मातापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा.
उत्तर :
i) लैंगिक प्रजननात स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक अशा दोन जनकपेशींचा सहभाग असतो.
ii) नर जनकाकडून येणाऱ्या पुंयुग्मकाचा मादी जनकाकडून येणाऱ्या स्त्रीयुग्मकाशी संयोग होऊन युग्मनज तयार होतो. जो नंतर भ्रूणात विकसित होऊन नवजात जीव तयार होतो.
iii) मातापित्यांकडून जी गुणसूत्रे येतात त्यांतून त्यांचा DNA नवीन संततीत जातो. त्यामुळे त्याचे गुणधर्म मातापित्याप्रमाणेच असतात.
6. नामनिर्देशित आकृत्या काढा.
अ. मानवी पुरुष प्रजनन संस्था
उत्तर :

आ. मानवी स्त्री प्रजनन संस्था
उत्तर :

इ. आर्तव चक्र
उत्तर :

7. नावे द्या.
अ. पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके
उत्तर :
पुटिका ग्रंथी संप्रेरक, ल्युटीनायझिंग संप्रेरक, टेस्टोस्टेरॉन
आ. स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्त्रवली जाणारी संप्रेरके
उत्तर :
प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन
इ. जुळ्यांचे प्रकार
उत्तर :
एकयुग्मजी जुळे आणि द्वियुग्मजी जुळे
ई. कोणतेही दोन लैंगिक रोग
उत्तर :
सायफिलीस, गोनोऱ्हीया
8. ‘दांपत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दांपत्यातील पुरुषावर अवलंबून असते’. या विधानाची सत्यता/असत्यतता सकारण स्पष्ट करा.
उत्तर :
दांपत्याला मुलगा होणार, की मुलगी हे त्या दांपत्यातील पुरुषावर अवलंबून असते. हे विधान सत्य आहे कारण :
i) मानवी पुरुषांमध्ये 23 व्या गुणसूत्रांच्या जोडीमध्ये ‘X’ गुणसूत्र आणि ‘Y’ गुणसूत्र ही दोन असमान गुणसूत्रे असतात.
ii) स्त्रियांमध्ये, 23 व्या गुणसूत्रांच्या जोडीमध्ये दोन्ही ‘X’ गुणसूत्रे असतात.
iii) सर्व मुलांना आपल्या आईकडून अनुवंशाने ‘X’ गुणसूत्र मिळते, तर दुसरे गुणसूत्र हे पित्याकडून अनुवंशाने मिळते.
iv) फलनाच्या वेळी जर पित्याकडून अनुवंशाने ‘X’ गुणसूत्र आले, तर होणारे बाळ ही मुलगी असते. आणि जर अनुवंशाने ‘Y’ गुणसूत्र आले, तर ते बाळ मुलगा असते.

अशाप्रकारे, दांपत्याला मुलगा होणार, की मुलगी हे त्या दांपत्यातील पुरुषावर अवलंबून असते.
9. वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा.
उत्तर :
i) शाकीय प्रजनन हा वनस्पतींमधील अलैंगिक प्रजननाचा प्रकार असून त्यात मूळ, खोड, पाने आणि मुकुल यांसारख्या शाकीय भागांपासून नवजात वनस्पतींची निर्मिती होते.
ii) शाकीय प्रजननातून निर्माण झालेल्या वनस्पती या जनक वनस्पतींसारख्याच असतात कारण त्या एकाच जनकापासून निर्माण झालेल्या असतात.
iii) ही प्रक्रिया बटाट्यामध्ये दिसून येते. ज्यात बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्यापासून नवीन वनस्पती विकसित होते किंवा पानफुटीच्या पानांच्या कडांवर असलेल्या मुकुलांपासून नवीन वनस्पती विकसित होते.
iv) ऊस, गवत यांसारख्या वनस्पतींमध्ये पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन होते.
v) गांजर, मुळा या वनस्पतींमध्ये मुळांच्या मदतीने शाकीय प्रजनन होते.
10. भाडोत्री मातृत्व, काचनलिकेतील फलन, वीर्य पेढी, इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल. या विधानाचे समर्थन करा.
उत्तर :
भाडोत्री मातृत्व, काचनलिकेतील फलन (IVF), वीर्य पेढी इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानामुळे अपत्यहीन दांपत्यांना अपत्यप्राप्ती होऊ शकते.
i) भाडोत्री मातृत्व : काही स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते, अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व या आधुनिक उपचार पद्धतीद्वारे अपत्यप्राप्ती करता येते. या पद्धतीमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी मिळवली जाते. या अंडपेशीचे काचनलिकेत त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून फलन घडवून आणले जाते. यातून तयार झालेल्या भ्रूणाचे दुसऱ्या साधारण गर्भाशय असलेल्या स्त्रीच्या (भाडोत्री मातेच्या) गर्भाशयात रोपण केले जाते.
ii) काचनलिकेतील फलन (IVE) : या तंत्रामध्ये काचनलिकेमध्ये दोन युग्मकांचे फलन घडवून आणले जाते आणि तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य होत नसेल तर काचनलिकेतील फलन (IVE) हे तंत्रवापरून अपत्यप्राप्ती करता येते.
iii) वीर्य पेढी : वीर्य पेढीमध्ये इच्छुक पुरुषांच्या शारीरिक आणि इतर तपासण्यानंतर त्यांनी स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते. गरजवंत दांपत्याची इच्छा असेल, तर या रेताचा वापर करून दांपत्यातील स्त्रीची अंडपेशी IVF तंत्राने फलित केली जाते आणि त्यातून तयार झालेल्या भ्रूणाचे संबंधित स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. कायद्यानुसार वीर्यदात्याचे नाव गुप्त ठेवले जाते.
11. वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा.
उत्तर :

i) वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.
ii) फुलात पुमंग हे पुल्लिंगी दल, तर जायांग हे स्त्रीलिंगी दल असते.
iii) फुलाचे स्त्रीलिंगी प्रजनन अवयव ज्यातून स्त्रीयुग्मकाची निर्मिती होते त्याला स्त्रीकेसर असे म्हणतात. प्रत्येक स्त्रीकेसराच्या मुळाशी एक अंडाशय असते. या अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात. प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोष तयार होतो.
iv) पुंकेसर हा फुलाचा पुल्लिंगी प्रजननांग असून त्यातून पुंयुग्मकाची निर्मिती होते.
v) वनस्पतीतील लैंगिक प्रजननात परागीभवन/परागण ही प्रमुख बाब असून यामध्ये परागकोशामध्ये परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात.
vi) परागणाच्या वेळी कुक्षी चिकट बनलेली असते.
vii) या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर ते अंकुरित होतात आणि त्यापासून एक दीर्घ परागनलिका तयार होते.
viii) परागनलिका दोन पुंयुग्मक वाहून नेते व भ्रूणकोषातील अंडपेशीजवळ सोडते.
ix) त्यातील एक पुंयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते आणि युग्मनज तयार होतो, तर दुसरे पुंयुग्मक दोन ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावून भ्रूणपोष तयार होतो, म्हणून या द्विफलन म्हटले जाते.
x) फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. फळ फुटून बीज जमिनीवर पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये त्याची वाढ होऊन नवीन रोपटे तयार होते.