असा रंगारी श्रावण स्वाध्याय
असा रंगारी श्रावण स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी
प्रश्न. 1. खालील चौकटी पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न. 2. प्रश्न तयार करा.
अ) ‘श्रावण’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर :
रंग उधळीत येणारा असा रंगारी कोण ?
आ) ‘इंद्रधनुष्याचा बांध’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर :
श्रावण आकाशाला काय घालतो ?
प्रश्न. 3. अर्थ लिहा.
अ) रंगारी
उत्तर :
रंगारी – रंग देणारा
आ) सृष्टी
उत्तर :
सृष्टी – निसर्ग
इ) झूला
उत्तर :
झूला – पाळणा
ई) खेळगा
उत्तर :
खेळगा – खेळगडी
प्रश्न. 4. आकृती पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न. 5. स्वमत
अ) ‘जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत’, या ओळीतील कवीची कल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
जेवणाच्या पंक्तीत येणाऱ्या लोकांचा पोशाख वेगवेगळ्या रंगांचा असतो आणि ते सर्व एका रांगेत जेवत असतात. एकच वाढणारा सर्वाना वेगवेगळे पदार्थ वाढतो. त्याचप्रमाणे एकच श्रावण सृष्टीतील सर्व वस्तुंना वेगवेगळे रंग वाढतो. झाडांना हिरवा, झऱ्यांना पांढरा, आकाशाला इंद्रधनुष्याचे सात रंग आणि फुलांना तर अनगणित रंग वाढत असतो.
आ) ‘नागपंचमी’ आणि ‘गोकुळाष्टमी’ या सणांचा कवितेतून व्यक्त होणारा संदर्भ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
श्रावण मुलींना झुलता यावे असे झुले झाडांना टांगतो. मुली झोके घेतात. ‘चल गं सये वारुळाला…………. नागोबाला पूजायाला’ अशी गाणी नागपंचमीला गातात. श्रावण त्यांच्या गाण्याला लय देतो. गोकुळाष्टमीत श्रावण पोरांमध्ये खेळायला त्यांचा सवंगडी होतो आणि दहीहांडी फोडताना त्या गोपाळांबरोबर ओला होतो.
इ) कवितेतून व्यक्त झालेला ‘रंगारी श्रावण’ तुम्हांला का आवडतात ते तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर :
श्रावणावर अनेक नामवंत कवींनी कविता केल्या आहेत. त्याची मनोवेधक वर्णने केली आहेत. ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे | क्षणात सरसर शिरवे येती क्षणात फिरुनी ऊन पडे |’ अशा मनात ऊर्जा घालणाऱ्या ओळी लिहिल्या आहेत. ‘रंगारी श्रावण’ मुळे अजून त्यात भर पडली आहे. हिरवा देखावा रेखाटणारा सृष्टीचा चित्रकार, चित्रांची पंगत मांडणारा कारागीर, रंग उधळत येणारा रंगारी अशी श्रावणाची विविध रूपे या कवितेत व्यक्त झाली आहेत. म्हणून रंगारी श्रावण आम्हाला आवडला.
खेळूया शब्दांशी
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा.
1) नदीशी –
उत्तर :
नदीशी – झाडांशी
2) लाजल्या –
उत्तर :
लाजल्या – सजल्या
3) झाडाला –
उत्तर :
झाडाला – गाण्याला
4) बांधतो –
उत्तर :
बांधतो – लपतो
चला संवाद लिहूया
झोका व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
उत्तर :
झोका : आता मुली येतील आणि माझ्या सोबत छान झुलतील.
झाड : ठाऊक आहे मला.
झोका : तुला ती गंमत नाही अनुभवता यायची.
झाड : अनुभवता येते.
झोका : कशी ?
झाड : तुम्ही सारे माझ्याच फांदीचा आधार घेता म्हणून.
झोका : हे खरं आहे, पण …………
झाड : पण काय ?
झोका : तुला मुलींचा प्रत्यक्ष सहवास कुठं लाभतो ?
झाड : प्रत्यक्ष नसेल लाभत. पण त्यांच्या भावनांशी मीच ……
झोका : मीच काय ?
झाड : मीच एकरूप झालेला असतो. मी हललो की त्या घाबरतात.
झोका : हे खरे आहे.
झाड : शरीराने एकरूप होण्यापेक्षा मनाने एकरूप होण्यात अधिक आनंद असतो.