आपल्या समस्या आपले उपाय स्वाध्याय
आपल्या समस्या आपले उपाय स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी
तुमच्या शब्दांत उत्तरे सांगा.
अ) तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का ?
उत्तर :
होय, कारण आजकाल शहरातील रस्त्यावर नेहमीच गर्दी असते.
आ) रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते ?
उत्तर :
ऑफिस सुरू होण्यापूर्वी आणि ऑफिस सुटायच्या वेळी जास्त गर्दी असते.
इ) नेमक्या त्या वेळेलाच जास्त गर्दी का होते असे तुम्हांला वाटते ?
उत्तर :
लोकांना ऑफिसात जायचे असते आणि ऑफिस सुटल्यावर घरी जायचे असते म्हणून या वेळेला जास्त गर्दी होते.
ई) वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात ?
उत्तर :
वाहतूक कोंडीमुळे रेल्वेगाडी किंवा बस चुकू शकते. रुग्णाला वाहतूक कोंडीमुळे डॉक्टरकडे न्यायला उशीर झाल्यामुळे त्याच प्राण धोक्यात येऊ शकतात.
उ) वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून काय काय केले पाहिजे असे तुम्हांला वाटते ?
उत्तर :
वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रस्त्यांचे रुंदीकरण केले पाहिजे. उड्डाण पुले वाढवली पाहिजेत. भुयारी रस्तेही केले पाहिजेत.
ऊ) वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते ?
उत्तर :
वाहतूक कोंडीमुळे वायुप्रदूषण व ध्वनीप्रदूषण वाढते.
ए) हे प्रदूषण कमी व्हावे, म्हणून काय काय करता येईल ? आईवडिलांशी, मित्रांशी, शिक्षकांशी चर्चा करा व सांगा.
उत्तर :
हे प्रदूषण कमी व्हावे म्हणून धूर सोडणाऱ्या वाहनांवर कायद्याने बंदी आणता येईल. मागच्या मोटारीनी हॉर्न वाजवण्यावर बंदी आणता येईल.
चौकाचौकांत वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिस उभे असतात. प्रदूषणाचा त्यांना किती त्रास होत असेल, याचा विचार करा. चौकाचौकांतील ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण कमी करण्यासाठी उपाय सुचवा.
उत्तर :
चौकाचौकांतील प्रदूषण कमी करण्यासाठी धूर सोडण्याऱ्या वाहनांवर आणि मागच्या मोटारींनी हॉर्न वाजवण्यावर कायद्याने बंदी आणता येईल.
खालील वाक्ये वाचा. तुम्हांला योग्य वाटत असेल, तर ✓अशी खूण करा आणि अयोग्य वाटत असेल, तर ✗अशी खूण करा.
1. एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे. तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे.
उत्तर :
✗
2. ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास, भर रस्त्यात वाहन उभे करून गप्पा मारणे.
उत्तर :
✗
3. दुकानात वस्तू आणायला गेल्यावर, आपले वाहन पार्किगच्या ठिकाणी लावणे.
उत्तर :
✓
4. गर्दीमधून जाताना जोरजोराने हॉर्न वाजवणे.
उत्तर :
✗
तुमच्या मनाने उत्तरे सांगा.
अ) आपण कचरा कशाला म्हणतो ?
उत्तर :
निरुपयोगी व टाकाऊ वस्तूंना आपण कचरा असे म्हणतो.
आ) घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात ?
उत्तर :
घरातील कचऱ्यात औषधांच्या रिकाम्या बाटल्या, दात तुटलेले कंगवे, कापलेले केस, तेलाच्या रिकाम्या बाटल्या, पतंगांचे फाटलेले कागद, बाटल्यांनी वेष्टने, संपलेल्या रिफील्स, घरातल्या केर, फळांची साले, सडलेली भाजी इत्यादी वस्तू असतात.
इ) तुमच्या घरातील कचऱ्यामधील ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करा.
उत्तर :
ओला कचरा – फळांची साले, सडलेली फळे, सडलेली भाजी, आंबलेला भात, आंबलेले वरण, स्वयंपाकातील टाकावू खाद्यपदार्थ.
सुका कचरा – वरील ‘ओला कचरा’ सोडून इतर सर्व कचरा.
ई) तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता ते सांगा.
उत्तर :
आमच्या घरी कचरा जमा करायला रिकाम्या बादल्या आहे. त्यात आम्ही सर्व कचरा टाकतो. रोज सकाळी कचरा जमा करणारी गाडी प्रत्येकांच्या दाराजवळ येते. त्यात आम्ही तो कचरा टाकतो. अशी आम्ही आमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावतो.
उ) कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टींवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात ?
उत्तर :
फुटलेला आरसा आरसेवाल्याकडे नेऊन व्यवस्थित कापून घेतला तर लहान आरसे तयार होऊ शकतात. नारळाच्या कवटीवर सुंदर चित्रे काढून आकर्षक कलाकृती तयार होऊ शकते. आईस्क्रीमधले लाकडी चमचे आपण कचऱ्यात फेकून देतो. पण ते एकत्र गोळा करून त्यापासून सुंदर फ्लॉवरपॉट तयार होऊ शकतो.
ऊ) तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात ?
उत्तर :
आमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये फाटलेले कागद, शाई संपलेल्या रिफील्स, यूज अँड थ्रो पेन्स, पेन्सिलचे तुकडे, शार्पनरमुळे झालेल्या पेन्सिलच्या लाकडांचे बारीक तुकडे ह्या वस्तू असतात.
ए) वर्गात कचरा होऊ नये, म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल ?
उत्तर :
वर्गात कचरा होऊ नये म्हणून वर्गाच्या कोपऱ्यात कचरापेटी ठेवू आणि फेकवयाच्या वस्तू कचरापेटीतच टाकावा अशी शिक्षकांकडून सर्व विद्यार्थ्याना सक्ती करू.
ऐ) कचराकुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही, तर आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याचा विचार करा. आईवडिलांशी, मित्रांशी चर्चा करून सांगा.
उत्तर :
कचराकुंडीतला कचरा उंचलून नेलाच नाही तर भयंकर असह्य दुर्गध पसरेल. त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येईल.
वरील विषयावर चर्चा करा. याविषयी तुम्हाला पडणारे प्रश्न लिहा.

उत्तर :
कुत्रा घराचे व शेताचे रक्षण करतो. म्हणून घरात किंवा शेतात कुत्रा पाळणे योग्य आहे. पण रस्त्यावर कुत्रे का फिरतात हा आम्हांला पडलेला पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा की नगरपालिका अशा कुत्र्यांचा बंदोबस्त का करत नाही ?