इयत्ता दहावी भूगोल प्रश्नपत्रिका 2026

iyatta dahavi bhugol prashnapatrika 2026

दहावी भूगोल परीक्षेत नकाशा प्रश्न, आलेख वाचन, भौगोलिक कारणे आणि भारत-ब्राझील तुलनात्मक अभ्यास यांचा नियमित सराव करा. नमुना प्रश्नपत्रिका आणि सोप्या उत्तरलेखन पद्धतींसह 2026 बोर्ड परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा!

1. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :

1) वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन …………………. आहे.

i) रस्तेमार्ग

ii) जलमार्ग

iii) हवाईमार्ग

iv) रेल्वेमार्ग

उत्तर :

वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन जलमार्ग आहे.

2) भारताच्या मध्यातून गेलेल्या …………………. पर्यंत सूर्य किरणे लंबरूप पडतात.

i) विषुवृत्त

ii) मकरवृत्त

iii) कर्कवृत्त

iv) रेखावृत्त

उत्तर :

भारताच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्त पर्यंत सूर्य किरणे लंबरूप पडतात.

3) ब्राझीलमधील …………………. वनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो.

i) पानझडी

ii) काटेरी झुडपी

iii) सदाहरित वर्षा

iv) हिमालयीन

उत्तर :

ब्राझीलमधील सदाहरित वर्षा वनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो.

4) भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण ………………….

i) कमी राष्ट्रीय उत्पन्न

ii) प्रचंड लोकसंख्या

iii) मोठे कुटुंब

iv) अन्नधान्य कमतरता

उत्तर :

भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण प्रचंड लोकसंख्या

2. वेगळा घटक ओळखा :

1) ब्राझीलमधील राज्ये :

i) सावो पावलो

ii) पाराना

iii) बाहिया

iv) उरुग्वे

उत्तर :

ब्राझीलमधील राज्ये : उरुग्वे

2) पठारी प्रदेश :

i) महाराष्ट्र

ii) पॅटानल

iii) कर्नाटक

iv) तेलंगना

उत्तर :

पठारी प्रदेश : पॅटानल

3) भारतातील जास्त पर्जन्याची ठिकाणे :

i) मौसिनराम

ii) चेरापुंजी

iii) जैसलमेर

iv) महाबळेश्वर

उत्तर :

भारतातील जास्त पर्जन्याची ठिकाणे : जैसलमेर

4) ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार :

i) चीन

ii) जर्मनी

iii) अमेरिकेची संयुक्त संस्थाने

iv) कॅनडा

उत्तर :

ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार : कॅनडा

3. चूक की बरोबर सांगा (कोणतेही चार) :

1) नळदुर्ग किल्ला डोंगरी किल्ला आहे.

उत्तर :

चूक

2) ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत.

उत्तर :

बरोबर

3) गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य नाही.

उत्तर :

चूक

4) ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झाले आहे.

उत्तर :

बरोबर

5) पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे.

उत्तर :

बरोबर

4. अ) ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा (कोणतेही चार) :

1) ब्राझीलमधील कोळसा उत्पादन क्षेत्र

2) रिओ दी जनेरीओ

3) ब्राझीलमधील काटेरी झुडपी वने

4) विषुववृत्त

5) पॅराग्वे नदी

6) सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे राज्य

उत्तर :

आ) खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही चार) :

प्रश्न :

1) भारतातील अती उत्तरेकडील सरोवराचे नाव लिहा.

उत्तर :

वुलर सरोवर

2) मध्य भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या ?

उत्तर :

नर्मदा आणि तापी

3) कावेरी नदीचे उगमस्थान कुठे आहे ?

उत्तर :

ब्रम्हगिरी

4) मनास ही कोणत्या नदीची उपनदी आहे ?

उत्तर :

ब्रम्हपुत्रा

5) वरील नकाशा काय दर्शवितो ?

उत्तर :

वरील नकाशा भारतातील ‘प्रमुख नद्या व सरोवरे’ दर्शवतो.

5. भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही दोन) :

1) ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.

उत्तर :

i) सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशांत ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते, त्याचप्रमाणे एखादया देशातील समुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो.

ii) ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून, ते उष्ण कटिबंधात आहे.

iii) याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.

2) भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.

उत्तर :

i) पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ २.४१ टक्के भूभाग भारताने व्यापला आहे.

ii) याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १७.५ टक्के लोकसंख्या भारतात आढळते.

iii) भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.

3) पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.

उत्तर :

i) मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शेती व इतर अनेक उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक असते.

ii) पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही. अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही.

iii) पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो. अशा प्रकारे, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीत चालना देणारा प्रमुख घटक आहे.

4) भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.

उत्तर :

i) मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सह-अस्तित्व असते.

ii) भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युतनिर्मिती, लोह व पोलाद उद्योग इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाने नियंत्रण आहे.

iii) भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उद्योजक व शासन यांत विभागलेले आहे. अशा प्रकारे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.

6. अ) दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

भारत – साक्षरता प्रमाण (टक्केवारी)

वर्षेसाक्षरता प्रमाण
198140.8
199148.2
200161.0
201169.3

उत्तर :

प्रश्न :

1) 2011 साली साक्षरतेचे प्रमाण किती आहे ?

उत्तर :

2011 साली साक्षरतेचे प्रमाण 69.3 % आहे.

2) 1991 ते 2001 या काळात साक्षरता किती टक्क्यांनी वाढली ?

उत्तर :

1991 ते 2001 या काळात 12.8 % ने साक्षरता वाढली.

3) 40.8% साक्षरतेचे प्रमाण कोणत्या वर्षी होते ?

उत्तर :

40.8% साक्षरतेचे प्रमाण 1981 या वर्षी होते.

किंवा

आ) खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न :

1) वरील आलेखाचा प्रकार कोणता ?

उत्तर :

जोड स्तंभालेख

2) या आलेखात कोणत्या बाबी दाखविल्या आहेत ?

उत्तर :

पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या व एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान

3) कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे ?

उत्तर :

ब्राझील

4) भारतात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या किती टक्के आहे ?

उत्तर :

9.2 %

5) भारत व ब्राझीलमध्ये पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येत किती टक्क्यांचा फरक आहे ?

उत्तर :

1.2 %

6) एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता ?

उत्तर :

भारत

7. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) :

1) ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागते ?

उत्तर :

ब्राझीलल व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे :

i) वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना निर्वनीकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे.

ii) दोन्ही देशांतील वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे.

iii) वाढते प्रदूषण, निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

iv) पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशांतील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

2) भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा.

उत्तर :

अ) भारत : 1) अक्षवृत्तीय विस्तार : भारताच्या मुख्यभूमीचा विस्तार ८°४’ उत्तर अक्षवृत्त ते ३७°६’ उत्तर अक्षवृत्त आहे. अदंमान व निकोबार या बेटांच्या समूहातील ६°४५’ अक्षावरील ‘इंदिरा पॉइंट’ हे भारताचे अतिदक्षिण टोक आहे.

2) रेखावृत्तीय विस्तार : भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७’ पूर्व रेखावृत्त ते ९७°२५’ पूर्व रेखावृत्त आहे.

ब) ब्राझील : 1) अक्षवृत्तीय विस्तार : ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५°१५’ उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५’ दक्षिण अक्षवृत्त आहे.

2) रेखावृत्तीय विस्तार : ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार ३४°४५’ पश्चिम रेखावृत्त ते ७३°४८’ पश्चिम रेखावृत्त आहे.

3) ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ?

उत्तर :

i) जनजागृती : जनजागृती मोहिमा, शालेय शिक्षण आणि प्रसारमाध्यमांद्वारे लोकांना ऐतिहासिक स्मारकांच्या मूल्याबद्दल शिक्षित केले पाहिजे. जेव्हा लोकांना त्यांचे महत्त्व समजते, तेव्हा ते त्यांचे संरक्षण करण्याची शक्यता जास्त असते.

ii) योग्य देखभाल आणि पुनर्संचयित करणे : ऐतिहासिक स्मारकांची नियमित स्वच्छता, दुरुस्ती आणि वैज्ञानिक तंत्रांचा वापर करून जतन केले पाहिजे. यामुळे हवामान, प्रदूषण आणि वाढत्या वयामुळे होणारे नुकसान रोखण्यास मदत होते.

iii) पर्यटनावर नियंत्रण : गर्दी मर्यादित करून, योग्य सोयीसुविधा पुरवून आणि जबाबदार वर्तनाला प्रोत्साहन देऊन पर्यटनाचे व्यवस्थापन केले पाहिजे, जेणेकरून स्मारकांचे नुकसान होणार नाही.

iv) कडक कायदे आणि संरक्षण : भिंतींवर लिहिणे, वास्तूंचे नुकसान करणे किंवा वारसा स्थळांजवळ बेकायदेशीर बांधकाम करणे यांसारख्या कृत्यांविरुद्ध सरकारने कडक कायदे लागू केले पाहिजेत. कठोर दंडामुळे या ठिकाणांचे संरक्षण होण्यास मदत होऊ शकते.

v) लोकसहभाग : संवर्धन कार्यात स्थानिक समु दायांना सामील करून घेतले पाहिजे, कारण ते जवळच्या ऐतिहासिक ठिकाणांचे संरक्षण आणि देखभाल करण्यात मदत करू शकतात.

vi) तंत्रज्ञानाचा वापर : सीसीटीव्ही (CCTV) पाळत, डिजिटल मॉनिटरिंग आणि ३ डी मॅपिंग यांसारखे आधुनिक तंत्रज्ञान ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी मदत करू शकते.

Leave a Comment