तोडणी स्वाध्याय

तोडणी स्वाध्याय

तोडणी स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी

प्रश्न. 1. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

अ) मीराने वसंतला ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ चा सांगितलेला अर्थ.

उत्तर :

तम म्हणजे अंधार. ज्योति म्हणजे प्रकाश, गमय म्हणजे जाणे. अंधारातून प्रकाशाकडे जाणे. अज्ञान हा अंधार होय. शिक्षण म्हणजे प्रकाश होय. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाणे असा अर्थ मीराने वसंताला सांगितला.

आ) वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ.

उत्तर :

वसंतच्या मनात शिक्षणाची विलक्षण ओढ आहे. शाळा शिकायची नाही. असे त्याचे वडील त्याला म्हणाले त्या दिवशी तो उपाशीच झोपला. त्याला सडकेवर पडलेला कागद दिसलां. कागदावर काहीतरी लिहिले. ते वाचण्याची त्याने धडपड केली. मीराकडून ते वाचून घेतले आणि त्याचा अर्थ समजावून घेतला. वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ अशी होती.

इ) ‘अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार?’ या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ.

उत्तर :

वसंत ऊसतोडणीवर काम करुन पैसे मिळवत होता. त्याने असेच काम करुन पैसे मिळावेत असं त्याचे वडील शंकर यांना वाटतं. वसंतनं शाळेत जाऊ नये असं त्यांनी बजावलं, वसंतचं शिक्षण वडिलांनी बंद केल. म्हणून रस्त्यावर सापडलेला कागद आपल्याला वाचता येत नाही असे तो त्याची बहीण मीरा हिला दुःखाने म्हणाला.

प्रश्न. 2. वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.

उत्तर :

वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये – i) “दादा मले साळात कवा धाडणार ?”

ii) “शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशीच झोपला.”

iii) तारानं वसंतपाशी जाऊन त्याला गाडीत बसवलं सडकेवर पडलेल्या कागदावर वसंताची नजर खिळली. तसा वसंतानं कागद उचलून हातात धरला.

iv) तो मीराला म्हणाला, काही झालं तरी मी शिकणारच.

v) वडिलांनी त्याला शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला तेव्हा वसंतनं लगेच मित्रांना गाठलं,

vi) ‘आता म्या साळेला येणार,’ असं वसंता सगळ्यांना सांगत सुटला. पाठातील सर्व वाक्यातून वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दिसून येते.

प्रश्न. 3. खालील आकृतीत योग्य शब्द लिहा.

अ) बैलांचे खाद्य

उत्तर :

सरमड

आ) ऊसतोडणी कामगारांच्या मुलांची शाळा

उत्तर :

सखारशाळा

प्रश्न. 4. तुम्हांला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडते ? सकारण सांगा.

उत्तर :

या कथेतील ‘वसंत’ हे पात्र मला सर्वात जास्त आवडते. कारण i) तो या कथेचा नायक आहे. सर्व कथा त्याच्याभोवती फिरते.

ii) त्याची शिक्षणाची तळमळ मनाला स्पर्श करुन जाते.

iii) सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो परिस्थितीपुढे लाचार होत नाही. त्याच्या अंगी परिस्थितीला वाकवण्याची धमक आहे. तो मीराला म्हणतो, “ताई, काही झालं तरी मी शिकणारच.”

प्रश्न. 5. खालील आकृतीत पूर्ण करा.

उत्तर :

खेळूया शब्दांशी

प्रश्न. 1. गटात न बसणारा शब्द शोधून लिहा.

अ) श्रीमंत, धनवान, गरीब, लखपती

उत्तर :

गरीब

आ) रात्र, निशा, प्रभात, यामिनी

उत्तर :

प्रभात

इ) अशिक्षित, निरक्षर, अंगठाबहाद्दर, शिक्षित

उत्तर :

शिक्षित

ई) गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे,

उत्तर :

हरवणे

प्रश्न. 2. कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रुपात योग्य बदल करून वाक्ये पुन्हा लिहा.

(आनंदाला पारावर न उरणे, हबकून जाणे, हातभार लावणे, आबाळ होणे)

अ) वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची …………..

उत्तर :

वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची आबाळ झाली.

आ) गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या ………………….

उत्तर :

गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावार उरला नाही.

इ) सिमरन आईला घरातल्या कामांसाठी ………………

उत्तर :

सिमरन आईला घरातल्या कामांसाठी हातभार लावते.

ई) रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा ……………..

उत्तर :

रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हबकून गेली.

प्रश्न. 3. खालील शब्दांना ‘पर’ हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा.

उत्तर :

प्रश्न. 4. खालील शब्दांत लपलेला अर्थ शोधून लिहा.

अ) तांबड फुटलं

उत्तर :

सकाळ झाली

आ) गाडी रुळावर आली.

उत्तर :

योग्य वळण घेतले.

इ) अंधाराकडून उजेडाकडे

उत्तर :

अज्ञानाकडून ज्ञानाकडे

ई) चूल शिलगावली

उत्तर :

चूल पेटवली

प्रश्न. 5. खालील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा.

अ) ‘पोरा, मले तरी कुटं वाचता येतंच.’

उत्तर :

‘पोरा, मला तरी कुठं वाचता येत.’

आ) “अवं समदी लेकरं साळंला गेली अन् तुपलं ?”

उत्तर :

अग सगळी मुलं शाळेला गेली आणि तुझं ?

इ) “आता तुमी समदीच म्हत्यात तर म्या तरी कशाला आडवा येवू ?”

उत्तर :

“आता तुम्ही सगळेच म्हणता तर मी तरी कशाला आडवा येऊ ?”

ई) ‘आता म्या साळंला येणार.’

उत्तर :

‘आता मी शाळेत येणार.’

प्रश्न. 6. खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा.

उत्तर :

प्रश्न. 1. साखरशाळा कोणत्या मुलांसाठी असते ?

उत्तर :

साखरशाळा ऊस कामगारांच्या मुलांसाठी असते.

प्रश्न. 2. ही शाळा कोठे भरते ?

उत्तर :

ऊस कामागार वस्तीच्या जवळपास भरते.

प्रश्न. 3. साखरशाळा कशासाठी सुरू झाल्या आहेत ?

उत्तर :

ऊस कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी.

प्रश्न. 1. शेतीच्या खालील कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची माहिती घ्या व नावे लिहा.

लिहिते होऊया

प्रश्न. 1. साखरशाळेत जाणाऱ्या राजेशला तुम्ही अभ्यासाबाबत कोणती मदत कराल ?

उत्तर :

राजेश साखरशाळेत जातो म्हणजेच गरीब आहे. आम्ही त्याला आमच्या पैशातून जुनी पुस्तकं विकत घेऊन देऊ. आम्हाला ट्युशन आहे. त्याला नाही. म्हणून सुट्यांमध्ये कधीकधी त्याच्याकडे जाऊन त्याला जे समजले नसेल ते नीट समजावून सांगू.

Leave a Comment