पुस्तके स्वाध्याय

पुस्तके स्वाध्याय

पुस्तके स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी

प्रश्न. 1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) पुस्तके कोणाकोणाच्या गोष्टी सांगतात, असे कवितेत म्हटले आहे ?

उत्तर :

पुस्तके पाखरांच्या व निर्झराच्या गोष्टी सांगतात. परीकथाही ऐकवतात. पुस्तके युगायुगांच्या, माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, जिंकल्या हरल्याच्या, प्रेमाच्या आणि कटुतेच्या गोष्टी सांगतात, असे कवितेत म्हटले आहे.

आ) पुस्तके तुमच्याजवळ का राहू इच्छितात ?

उत्तर :

पुस्तके आमच्याजवळ राहू इच्छितात कारण पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, विज्ञानाचा मंत्र आहे आणि ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. ती त्यांना आम्हांला द्यायची असते. म्हणून पुस्तके आमच्याजवळ राहू इच्छितात.

इ) आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे, असे कवीला का वाटते ?

उत्तर :

पुस्तकांच्या विश्वात आपण जायला हवे असे कवीला वाटते कारण पुस्तकांच्या विश्वात मनोरंजनाबरोबरच ज्ञान आणि विज्ञानही आहे.

प्रश्न. ‘पुस्तके’ या कवितेतील खालील गोष्टी काय करतात, ते लिहा.

उदा., पाखरं – चिवचिवतात

अ) आखरं –

उत्तर :

आखरं – सळसळतात

आ) निर्झर –

उत्तर :

निर्झर – गुणगुणतात

प्रश्न. कवितेच्या ओळी पूर्ण करा.

अ) पुस्तक सांगतात ………………

………… भूतकाळाच्या

उत्तर :

पुस्तकं सांगतात गोष्टी

युगायुगांच्या.

माणसांच्या जगाच्या,

वर्तमानाच्या – भूतकाळाच्या

आ) तुम्ही नाही का ………….

…………. इच्छितात.

उत्तर :

तुम्ही नाही का ऐकणार

गोष्टी पुस्तकांच्या ?

पुस्तके काही करू इच्छितात,

तुमच्याजवळ राहू, इच्छितात.

इ) पुस्तकांत ………………

……….. ऐकवतात.

उत्तर :

पुस्तकांत पाखरं चिवचिवतात.

पुस्तकांत आखरं सळसळतात.

पुस्तकांत निर्झर गुणगुणतात.

पुस्तकं परिकथा ऐवकतात.

ई) पुस्तकात रॉकेटचे…………

……………. भरारी आहे !

उत्तर :

पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे,

पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे.

पुस्तकांची दुनिया न्यारी आहे,

ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे.

प्रश्न. 4. पुस्तकांचे जग वेगळे असते, याबद्दल शिक्षक, पालक, मित्रांशी चर्चा करा. लिहा.

उत्तर :

पुस्तकांचे जग कधी ज्ञानवर्धक असते, कधी प्रेरणा देणारे असते तर कधी काल्पनिक असते. पुस्तकातील घोडा चंद्रापर्यत उडतो आणि चंद्राला त्याच्या पायाचा खूर लागल्यामुळे चंद्रावर डाग पडतो. पुस्तकांच्या जगात पशुपक्षी माणसाप्रमाणे बोलतात. पुस्तकांचे जगच वेगळे असते.

प्रश्न. 5. तुमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे, यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल ?

उत्तर :

आमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे, म्हणून आम्ही पुस्तकाला कव्हर लावू आणि पुस्तक काळजीपूर्वक हाताळू.

प्रश्न. 6. पुस्तक तुमच्याशी बोलते आहे, अशी कल्पना करा. आठ ते दहा वाक्ये लिहा.

उत्तर :

एकदा पुस्तक माझ्याशी बोलले. ते म्हणाले, “मी तुला ज्ञान देतो. तुझी करमणूक करतो. तरी तू माझी आबाळ करतोस. एकदा तुला तुझ्या मित्राचा राग आला तेव्हा तू मला त्याच्यावर फेकून मारलेस. त्यामुळे माझी पाने फाटली. तू नेहमी माझ्या पृष्ठावरील शब्दांवर आणि वाक्यांवर रेघोट्या ओढत असतोस. त्यामुळे मी कसातरीच दिसू लागतो. परीक्षेच्या वेळीही पुष्कळदा मला तू घेऊन जातोस. पण माझा अभ्यास करायला नव्हे तर तुझ्या उत्तरपत्रिकेत माझी कॉपी करायला. तू मला विकत घेतलेस हे खरे पण माझा नीट सांभाळ कर. मला गुलामाप्रमाणे वागवू नकोस.”

प्रश्न. 7. तुम्हांला कोणत्या प्रकारच्या गोष्टींची पुस्तके वाचायला आवडतात त्यांची यादी करा.

i) शौर्यकथा ii) साहसकथा iii) चातुर्यकथा iv) अद्भुतकथा v) विनोदी कथा, याप्रकारच्या गोष्टींची पुस्तके वाचायला मला आवडतात.

प्रश्न. 8. तुम्ही वाचलेल्या किमान पाच पुस्तकंसंबंधी खालील मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात माहिती लिहा.

उत्तर :

पुस्तकाचे नावलेखकविषयआवडलेली वाक्येनवे शब्द
रोमांचक बोधकथाडॉ. मनोहर रोकडे कथा आपल्या भाग्यात काहीही असू द्या, आपल्या बुद्धिने व कर्तृत्वाचे आपण ते भाग्य वळवू शकतो.शेराला सव्वाशेर
तेनालीरामच्या गोष्टी संजय कोल्टकर चातुर्यकथा समृद्धी व संस्कृती यांचे अतूट नाते असते. अपशकुनी
इसाननीती सौ. रेचलगडकर बोधकथा स्वार्थी प्राणी दुसऱ्याचे उपकार जाणत नसतात. अचर
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन क्षिपा शहाणे चरित्र समाजाचे स्वराज्य म्हणजे लोकशाही नव्हे. ज्ञानयज्ञ
111 भारतीय महामानव डॉ. ज्ञानेश्वर तांदळे चरित्र महामानव हे मानवी संस्कृतीला उजाळा देणारे दीपस्तंभ आहेत. दीपस्तंभ

विचार करा. तुमचे मत सांगा.

1. छापलेले पुस्तक व ई-पुस्तक यांपैकी तुम्हांला कोणते पुस्तक वाचायला आवडेल ? का ?

उत्तर :

छापलेले पुस्तक व ई-पुस्तक यांपैकी आम्हांला छापलेले पुस्तक वाचायला आवडेल, कारण छापलेले पुस्तक वाचनात एकाग्रता अधिक होत असते.

2. तुम्हांला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल, की ई-पुस्तकांच्या मदतीने ? का ?

उत्तर :

आम्हांला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल. कारण शिक्षकांचा जिव्हाळा समजून देण्याची हातोटी व वक्तृत्व ई-पुस्तकात नसते.

3. तुमचे पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांचा वाचायला द्यावे की नाही ? का ?

उत्तर :

आपलं पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यावं कारण त्यामुळे त्याच्याही ज्ञानात भर पडेल. पण पुस्तक विशिष्ट वेळेच्या आत परत करण्याची अट घालावी.

खालील चित्रांना दोन-दोन विशेषणे लावा.

उत्तर :

Leave a Comment