अश्मयुग दगडाची हत्यारे स्वाध्याय

अश्मयुग दगडाची हत्यारे स्वाध्याय

अश्मयुग दगडाची हत्यारे स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 2

1. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

अ) ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात, त्या काळाला आपण ………………….. असे म्हणतो.

(ताम्रयुग, लोहयुग, अश्मयुग)

उत्तर :

ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात, त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो.

आ) महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिकजवळचे ………………….. हे स्थळ प्रसिद्ध आहे.

(गंगापूर, सिन्नर, चांदवड)

उत्तर :

महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिकजवळचे गंगापूर हे स्थळ प्रसिद्ध आहे.

2. खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा.

अ) राजस्थान – बागोर

आ) मध्य प्रदेश – भीमबेटका

इ) गुजरात – लांघणज

ई) महाराष्ट्र – विजापूर

उत्तर :

ई) महाराष्ट्र – विजापूर

3. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

अ) आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला ?

उत्तर :

i) एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाने छिलके काढणे यालाच ‘आघात तंत्र’ असे म्हणतात.

ii) या आघात तंत्राने बनविलेल्या हत्यारांच्या एकाच बाजूला थोडीशी धार असे. त्यांचा उपयोग फक्त कठीण कवचांची फळे किंवा हाडे फोडण्यासाठी करणे शक्य होते.

आ) बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली ?

उत्तर :

बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात पुढील क्रांती केली.

i) बुद्धिमान मानवाने दगडांपासून लांब, पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले.

ii) या लांब पात्यांपासून सुरी, तासणी, टोच्या, छिन्नी यांसारखी विविध प्रकारची हत्यारे त्याने बनवली.

iii) तो हत्यारे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड, हस्तिदंत यांसारख्या वस्तूंचा उपयोग करू लागला होता.

4. पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या तीन कालखंडांतील हत्यारांची तुलना करा.

उत्तर :

पुराश्मयुगीन हत्यारेमध्याश्मयुगीन हत्यारेनवाश्मयुगीन हत्यारे
i) पुराग्मयुगातील सुरुवातीची हत्यारे ओबडधोबड होती. त्या हत्यारांच्या एकाच बाजूला थोडीशी धार असे. i) मध्याश्मयुगातील बुद्धिमान मानवाने वजनाने हलक्या आणि दीर्घकाळ टिकतील अशी हत्यारे तयार केली. i) नवाश्मयुगात घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे घडवली गेली.
ii) पुराश्मयुगीन हत्यारांमध्ये हातकुऱ्हाड, लांब पात्यांपासून सुरी, तासणी, टोच्या, छिन्नी यांसारखी विविध प्रकारच्या हत्यारांचा समावेश होतो. ii) मध्याश्मयुगातील मानवाने लाकडाला किंवा हाडाला खाच करून त्या नखाएवढी छोटी पाती ओळीने घट्ट बसतील अशी हत्यारे तयार केली. या हत्यारांमध्ये दातेरी सुरी, विळा, मासेमारीचे गळ, सूक्ष्मास्त्रे यासारख्या हत्यारांचा समावेश होत असे. ii) नवाश्मयुगीन हत्यारांमध्ये गुळगुळीत केलेल्या दगडांची हत्यारे व उपकरणे, दगडी नांगर, कुदळ यांसारख्या वस्तू वापरत असे.
iii) पुराश्मयुगीन हत्यारे ओबडधोबड दगडांपासून तयार केली होती. iii) मध्ययुगीन हत्यारे अणकुचीदार दगडांपासून तयार केली होती. iii) नवाश्मयुगीन हत्यारे दगडांना चमकदार व गुळगुळीत करून त्यापासून तयार केली होती.
iv) कठीण कवचांची फळे किंवा हाडे फोडण्यासाठी तोडहत्यारे वापरीत व दगडाचे धारधार छिलके कातड्याला चिकटलेले मांस खरवडण्यासाठी तसेच मांसाचे व इतर अन्नपदार्थाचे तुकडे करणे, काठी तासणे यासाठी वापरीत असे. iv) या युगातील मानवाला शिकार, मासेमारी, कापणी, तोडणी अशा अनेक प्रकारच्या कामासाठी वजनाने हलकी व दीर्घकाळ टिकणाऱ्या हत्यारांचा उपयोग करीत असे. iv) या युगातील मानव शेती व शिकार करण्यासाठी नव्या प्रकारच्या हत्यारांचा उपयोग करीत असे.

5. पुढीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो ?

अ) मिक्सर

आ) पिठाची चक्की

इ) मसाला कांडप यंत्र

उत्तर :

पिठाची चक्की

6. भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील स्थळे दाखवा.

अ) पुराश्मयुगीन महाराष्ट्रातील एक स्थळ

उत्तर :

नाशिकजवळचे गंगापूर

आ) नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आढळणाऱ्या नदीचे खोरे

उत्तर :

गंगा नदीचे खोरे

इ) मध्याश्मयुगीन अवशेष आढळलेले मध्य प्रदेशातील एक स्थळ

उत्तर :

भीमबेटका

Leave a Comment