अभियंत्यांचे दैवत स्वाध्याय इयत्ता नववी मराठी
अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या स्वाध्याय इयत्ता नववी मराठी
प्रश्न. 1. समर्पक उदाहरण लिहा.
अ) विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम –
उत्तर :
हैदराबादच्या मुसा नदीने रौद्ररूप धारण केले होते. सारे शहर पाण्याखाली जाण्याचा जबरदस्त धोका निर्माण झाला होता. विश्वेश्वरय्या यावेळी युरोपच्या दौऱ्यावर होते. हैदराबादच्या निजमांनी त्यांना ‘ताबडतोब या’ अशी तार करून बोलावले. युरोपचा दौरा अर्धवट सोडून विश्वेश्वरय्या हैदराबादला आले. तब्बल सहा महिने कठोर परिश्रम घेऊन मुसा नदी मानवाच्या ताब्यात राहील अशी त्यांनी कायमची व्यवस्था केली.
आ) माणुसकीचे दर्शन –
उत्तर :
विश्वेश्वरय्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळत होती. त्यांनी गरजेपुरते पैसे ठेवून ठेवून सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली. इच्छा एकच आपल्यासारख्या कोणी प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत असेल तर त्याला प्रोत्साहन लाभावे! मानवतेचे मूल्य कृतीने जोपासणाऱ्या विश्वेश्वरय्यांनी माणुसकीचे असे लोभस दर्शन घडवले.
प्रश्न. 2. खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होतो ते लिहा.
1) आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली.
उत्तर :
सावधानता
2) सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व देणे.
उत्तर :
वैचारिकता
3) शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले.
उत्तर :
कठोर परिश्रम
4) अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले.
उत्तर :
हुशारी
5) वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल एवढे उत्साही होते.
उत्तर :
उत्साहपणा
6) सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी खर्च केली.
उत्तर :
माणुसकी
प्रश्न. 3. माहिती लिहा.
1)
उत्तर :
2)
उत्तर :
प्रश्न. 4. खालील शब्दांच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्यांचा स्वतंत्र वाक्यांत उपयोग करा.
अ) आव्हान – आवाहन
उत्तर :
वा. उ. – 1) कुस्तीगीर एकमेकांना कुस्तीचे आव्हान देतात.
2) पंतप्रधानांची जनतेला स्वच्छतेचे आवाहन केले.
आ) कृतज्ञ – कृतघ्न
उत्तर :
वा. उ. – 1) मी शिक्षकांचा कृतज्ञ आहे.
2) आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकणारे कृतघ्न असतात.
इ) आभार – अभिनंदन
उत्तर :
वा. उ. – 1) मला पुस्तक आणण्यासाठी पैसे दिल्यामुळे मी ताईचा आभारी आहे.
2) आम्ही क्रिकेटमध्ये जिंकलो म्हणून सरांनी आमचे अभिनंदन केले.
ई) विनंती – तक्रार
उत्तर :
वा. उ. – 1) आमचे काम त्वरित करण्याबद्दल मी अधिकाऱ्यांना विनंती केली.
2) आम्हाला नियमित पाणीपुरवठा होण्याबद्दल नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार केली.
प्रश्न. 5. खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा.
He is an engineer of integrity, character and broad outlook.
उत्तर :
ते प्रामाणिकपणा, चारित्र्य आणि व्यापक दृष्टिकोन असलेले अभियंता आहे.
प्रश्न. 6. स्वमत
अ) विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हांला होणारा बोध लिहा.
उत्तर :
सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम आणि प्रचंड आशावाद ही आपल्या जीवनाची पंचसूत्री विश्वेश्वरय्या यांनी सांगितली आहे. आपले ध्येय कितीही कठीण असले तरी ते या पंचसूत्रीने साध्य होतेच हा बोध मिळतो.
आ) ‘स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यांत पाणी आले’, या वाक्याचा भावार्थ स्पष्ट करा.
उत्तर :
सक्करकरांच्या लोकांना सिंधू नदीचे वाळूमिश्रित गढूळ घाणेरडे पाणी प्यायला मिळत होते. विश्वेश्वरय्यांनी आपल्या कल्पकतेने नदी प्रवाहाखाली विहीर खणून लोकांना शुद्ध, स्वच्छ व अमृततुल्य पाणी पुरवले. स्वप्नातही मिळणार नाही असे अमृततुल्य पाणी घरबसल्या मिळाल्यामुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले.
इ) विश्वेश्वरय्यांमधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तर :
विश्वेश्वरय्यांनी आपली पेन्शन, आवश्यक तेवढे पैसे ठेवून, गरीब विद्यार्थ्याकरिता दिली. या माणुसकीचा माझ्यावर विशेष प्रभाव पडला. हैदराबादच्या निजामांनी त्यांना तातडीने बोलावले म्हणून युरोपचा दौरा अर्धवट सोडून ते हैदराबादला आले. या त्यांच्या देशभक्तीचा माझ्यावर प्रभाव पडला. रेल्वेच्या आवाजाची लय चुकल्याची त्यांना जाणीव झाल्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले. माणसाने नेहमी सावध असावे या गुणाचाही माझ्यावर प्रभाव पडला.
ई) ‘झिजलात तरी चालेल पण गंजू नका’, या विचारातून तुम्हांला मिळालेला संदेश सविस्तर लिहा.
उत्तर :
आपल्या स्वीकृत कार्यात कधीकधी खूप अडचणी व संकटे येतात. त्यामुळे अनेकदा कार्यकत्र्याच्या कार्याची धार बोथट होते. असे होऊ देऊ नका. आपली वाताहत झाली तरी चालेल पण कार्यात शिथिलता येऊ नये. कार्याची धार कायम राहावी. असा आम्हाला उपरोक्त वाक्यातून संदेश मिळतो.