अण्णा भाऊंची भेट स्वाध्याय
अण्णा भाऊंची भेट स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी
प्रश्न. 1. नातेसंबंध लिहा.
अ) विठ्ठल उमप – भिकाजी तुपसौंदर
उत्तर :
मित्र
आ) जयवंता बाय – अण्णा भाऊ साठे
उत्तर :
अण्णा भाऊची मालकीण
इ) अण्णा भाऊ – गॉर्की
उत्तर :
अण्णांचे मानलेले गुरु
प्रश्न. 2. आकृत्या पूर्ण करा.
अ)
उत्तर :
आ)
उत्तर :
प्रश्न. 3. एका शब्दांत उत्तरे लिहून चौकट पूर्ण करा.
अ) अण्णा भाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण
उत्तर :
चिराग नगरीतील झोपडी
आ) विठ्ठल उमप यांच्यासमोर अण्णा भाऊंना मिळालेले कथेचे मानधन
उत्तर :
एक ट्रान्झिस्टर
इ) अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झाले ते शहर
उत्तर :
मॉस्को
प्रश्न. 4. उत्तरे लिहा.
अ) अण्णा भाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
उत्तर :
अण्णा भाऊ चिरागनगरीतील एका किरायाच्या झोपडीत राहत होते. त्यांचा गंजीफ्रॉक (बनियान) मळकी होती. अण्णा साडेचार फूट उंचीचे व काळेसावळे होते. त्यांच्या घरी चहाचीही सोय नव्हती म्हणून त्यांनी लेखकाला हॉटेलमध्ये नेऊन चहा दिला. ते तुटक्या खुर्चीत बसून मोडक्या टेबलावर लिहीत असत. एकच तांब्या, एकच जर्मनचं ताट, एक डेचकी एवढाच त्यांचा संसार होता.
आ) अण्णा भाऊंसाठी असलेल्या सुदिनाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
विठ्ठल उमप आणि अण्णा भाऊ साठे यांची भेट हा अण्णा भाऊंसाठी सुदिन होता. अण्णा भाऊ कलाकारांना कसे जवळ घेत असत, त्यांचे कसे कौतुक करत असत, त्यांच्याशी कशी मनापासून मैत्री करत असत, त्यांच्या कलेबद्दल कसे मनापासून बोलत असत, हे या सुदिनातून कळते. हेच या सुदिनाचे महत्त्व होय.
इ) पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचित्र रेखाटा.
उत्तर :
विठ्ठल उमप हे प्रसिद्ध लोकशाहीर आहेत. आकाशवाणीवर त्यांचे कार्यक्रम होतात. ते ऐकूनच अण्णा भाऊंनी त्यांना आपल्या घरी बोलावले होते. उपम विनम्र वृत्तीचे आहेत. अण्णा भाऊसारख्या शाहिराने आपल्याला बोलावले, याचा त्यांना खूप आनंद झाला होता. ते अण्णांना म्हणालेही, “आज आपल्या दर्शनाने मी धन्य झालो.” अण्णांनी रशियात मिळवलेला पैसा तिथेच न ठेवता इकडे आणावा व बंगला बांधावा, असे ही त्यांना वाटत होते.
ई) प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णांविषयी कोणते विचार आले, ते लिहा.
उत्तर :
अण्णा भाऊ श्रेष्ठ कलाकार व लेखक होते हे सर्वानाच ठाऊक आहे. पण त्याहीपेक्षा ते अधिक श्रेष्ठ आहेत. कारण त्यांच्या लेखनात काल्पनिकता अजिबात नाही. जे वास्तव सत्य आहे तेच त्यांनी लिहिले. यासाठी त्यांनी पैशाचा त्याग केला, संसारसुखाचा त्याग केला, सत्यासाठी जीवनाचा होम करणारे ते ‘क्रांतिकारक’ लेखक आहेत, असे विचार माझ्या मनात आले.
खेळूया शब्दांशी
खालील वाक्यांत विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
1) जुई रेहाना जॉर्ज सहलीला निघाले
उत्तर :
जुई, रेहाना, जॉर्ज सहलीला निघाले.
2) अबब केवढा हा साप
उत्तर :
अबब ! केवढा हा साप !
3) आई म्हणाली सर्वानी अभ्यासाला बसा
उत्तर :
आई म्हणाली, “सर्वानी अभ्यासाला बसा.”
4) आपला सामना किती वाजता आहे
उत्तर :
आपला सामना किती वाजता आहे ?
5) उद्या किंवा परवा मी गावी जाईन
उत्तर :
उद्या किंवा परवा मी गावी जाईन.
आपण समजून घेऊया
कर्मणी प्रयोग
खालील वाक्ये वाचा. निरीक्षण करा व कृती पूर्ण करा.
अ) 1) तुषारने आंबा खाल्ला.
2) स्वातीने आंबा खाल्ला.
3) मुलांनी आंबा खाल्ला.
4) मुलींनी आंबा खाल्ला.
कृती – कर्त्याचे लिंग, वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का ?
उत्तर :
नाही
आ) 1) तुषारने आंबे खाल्ले.
2) स्वातीने चिंच खाल्ली.
3) मुलांनी चिंचा खाल्ल्या.
4) मुलींनी टरबूज खाल्ले.
कृती – कर्त्याचे लिंग, वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का ?
उत्तर :
होय
भावे प्रयोग
खालील वाक्ये वाचा, निरीक्षण करा व कृती पूर्ण करा.
1) शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले.
2) शिक्षिकेने विद्यार्थ्याना शिकवले.
3) त्यांनी विद्यार्थ्याना शिकवले.
4) मी विद्यार्थिनीला शिकवले.
कृती – i) वरील वाक्यांतील क्रियापदात बदल आढळतो का ?
उत्तर :
नाही.
ii) कर्ता आणि कर्म यांचे लिंग व वचन प्रत्येक वाक्यात बदलले आहे का ?
उत्तर :
होय
पुढील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
1) त्याने मागे वळून बघितले.
उत्तर :
भावे प्रयोग
2) विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली.
उत्तर :
कर्मणी प्रयोग
3) तो नेहमी नवे संकल्प करतो.
उत्तर :
कर्तरी प्रयोग
कर्तरी, कर्मणी व भावे या प्रयोगांची प्रत्येकी पाच-पाच वाक्ये तयार करा.
उत्तर :
कर्तरी प्रयोग – 1) तो पुस्तक वाचतो.
2) ती चंद्र पाहते.
3) राम भरभर पळतो.
4) मी आंबा खातो.
5) ते हळूहळू चालतात.
कर्मणी प्रयोग – 1) त्याने पुस्तक वाचले.
2) तिने आंबा खाल्ला.
3) भारताने सामना जिंकला.
4) मंदाने गूळ विकला.
5) रामूने बोरे विकत घेतली.
भावे प्रयोग – 1) शिक्षकांनी कुत्र्याला मारले.
2) रामाने हनुमानाला बोलावले.
3) त्याने वर पाहिले.
4) सरांनी मला शिकवले.
5) वासंतीने माकडाला नाचवले.