अरण्यलिपी स्वाध्याय

अरण्यलिपी स्वाध्याय

अरण्यलिपी स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी

प्रश्न. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) अरण्यलिपी म्हणजे काय ?

उत्तर :

वन्य प्राण्यांच्या जंगलातील खाणाखुणा म्हणजे अरण्यलिपी होय.

आ) वाघांची गणती कशावरून केली जाते ?

उत्तर :

वाघांच्या पावलांच्या ठशावरून वाघांची गणती केली जाते.

इ) जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात ?

उत्तर :

जंगलात हरिण, सांबर व काळवीट हे प्राणी धोक्याची सूचना देतात.

प्रश्न. 2. खालील प्रश्नांची तीन – चार वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) ‘वाघाचे क्षेत्र’ कशावरून ओळखता येते ?

उत्तर :

वाघाच्या पावलांचे ठसे इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असतो. वाघ आपला आवाज होऊ नये, यासाठी पालापाचोळ्यातून चालणे टाळतो. तो पाऊलवाटेवरून, नदीनाल्यांच्या पात्रातून, वाळूवरून चालतो. तेथील ओल्या मातीत, देतील वाघाचे ठसे आढळतात. त्यावरून ‘वाघाचे क्षेत्र’ ओळखता येते.

आ) वाघ-वाघिणींच्या ठशांमध्ये काय फरक असतो ?

उत्तर :

वाघाच्या ठशावरून तो वाघाचा आहे का वाघिणीचा आहे, हे ही ओळखता येते. वाघ व वाघिणी दोघांचेही पुढचे पाय चौकोनी असतो. त्याची लांबी-रुंदी सारखीच असते. वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा आयताकृती असतो. रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते. वाघ-वाघिणींच्या ठशामध्ये असा फरक असो.

इ) शिकार झालेला प्राणी कोणता होता, हे कशावरून ओळखता येते ?

उत्तर :

काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस, नखे व हाडे आढळून येतात. वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे. शिकार करण्याची पद्धत, त्यांचे विविध आवाज इत्यादी निरीक्षणावरून शिकार झालेला प्राणी कोणता होता हे ओळखता येते.

खेळूया शब्दांशी

1) मूळ शब्द ठसा. या शब्दाचे सामान्यरूप होताना ‘स’ चा ‘श’ होतो. उदा., ठशावरून, ठशात, ठशांचा इत्यादी. याप्रमाणे पैसा, म्हैस या शब्दांची सामान्यरूपे लिहा.

उत्तर :

आधी सामान्यरूप म्हणजे काय ते लक्षात घ्या. नामाला जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा मूळ नामात फरक करावा लागतो. हा फरक म्हणजे सामान्यरूप होय.

पैसा – पैशाला, पैशाने, पैशाहून, पैशाचे, पैशात इ.

म्हैस – म्हशीला, म्हशीने, म्हशीहून, म्हशीचे, म्हशीत इ.

2) या पाठात पालापाचोळा, झाडेझुडूपे, नदीनाले हे जोडशब्द आले आहेत. यासारखे तुम्हांला माहीत असलेले आणखी जोडशब्द लिहा.

उत्तर :

i) पाऊसपाणी

ii) लाठीकाठी

iii) दुलईरजई

iv) गूळसाखर

3) ‘मजा’ या शब्दाला ‘शीर’ शब्द लागून ‘मजेशीर’ हा शब्द तयार झाला आहे. यासारखे आणखी शब्द शोधा. त्यांचा संग्रह करा.

उत्तर :

i) हवेशीर

ii) आरामशीर

वरील परिच्छेदात अधोरेखित केलेली सर्वनामे कोणासाठी वापरली आहेत, ते त्या शब्दांसमोर लिहा.

उदा., त्याला – सुभाषसाठी

अ) त्याचा –

उत्तर :

त्याचा – सुभाषसाठी

आ) तो –

उत्तर :

तो – सुभाषसाठी

इ) तुला –

उत्तर :

तुला – समीरसाठी

ई) तू –

उत्तर :

तू – समीरसाठी

उ) मला –

उत्तर :

मला – सुभाषसाठी

ऊ) तो –

उत्तर :

तो – सुभाषसाठी

ए) त्याच्या –

उत्तर :

त्याच्या – सुभाषसाठी

ऐ) त्याने –

उत्तर :

समीरसाठी

खाली काही वाक्ये दिली आहेत. त्यांतील नामे ओळखून त्यांसाठी योग्य ती सर्वनामे वापरा.

अ) हसीना खूप हुशार आहे. ……………. रोज शाळेत जाते.

उत्तर :

नाम – हसीना, रिकाम्या जागी – ती

आ) पक्षी उडत उडत लांब गेले. …………… दिसेनासे झाले.

उत्तर :

नाम – पक्षी, रिकाम्या जागी – ते

इ) बाई मुलांना खाऊ वाटत होत्या. ………….. मुलांशी गप्पा मारत होत्या.

उत्तर :

नाम – बाई, रिकाम्या जागी – त्या

ई) भाऊ घरात गेला. ……………. काही सुचेना.

उत्तर :

नाम – भाऊ, रिकाम्या जागी – त्याला

खालील वाक्यांतील सर्वनामे अधोरेखित करा.

अ) ते बाजारात गेले.

उत्तर :

ते बाजारात गेले.

आ) तुला त्यांनी हाका मारल्या.

उत्तर :

तुला त्यांनी हाका मारल्या.

इ) आम्ही जेवत होतो.

उत्तर :

आम्ही जेवत होतो.

ई) त्याचा आवाज गोड आहे.

उत्तर :

त्याचा आवाज गोड आहे.

उ) मी स्वतः झाडून घेतले.

उत्तर :

मी स्वतः झाडून घेतले.

ऊ) आपण प्रकल्प पूर्ण करूया.

उत्तर :

आपण प्रकल्प पूर्ण करूया.

या पाठातील सर्वनामे शोधा व लिहा.

उत्तर :

आपण, आपल्याला, त्यांच्या, तुम्हाला, तुम्हांस, तो, त्याचे, ते, त्यांची.

Leave a Comment