प्राचीन भारत आणि जग स्वाध्याय
प्राचीन भारत आणि जग स्वाध्याय इयत्ता सहावी इतिहास

1. ओळखा पाहू.
1) रोमन बनावटीच्या वास्तू सापडलेली ठिकाणे.
उत्तर :
रोमन बनावटीच्या वास्तू सापडलेली ठिकाणे महाराष्ट्रातील कोल्हापूर, तमिळनाडूतील अरिकामेडू हे आहेत.
2) कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला ती शैली.
उत्तर :
कुशाण काळात भारतामध्ये गांधार कलाशैलीचा उदय झाला.
3) महावंस आणि दीपवंस या ग्रंथांची भाषा.
उत्तर :
महावंस आणि दीपवंस या ग्रंथांची पाली भाषा आहे.
4) प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश.
उत्तर :
प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया हे देश आहेत.
2. विचार करा आणि लिहा.
1) आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीवर ठसा उमटलेला दिसतो.
उत्तर :
i ) आग्नेय आशियातील इतर देशांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची छोटी राज्ये उदयाला आली होती.
ii) या राज्यांमुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये होत राहिला.
iii) आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यांवर भारतीय संस्कृतीला ठसा उमटलेला दिसतो.
2) चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली.
उत्तर :
i) इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चिनी सम्राट ‘मिंग’ याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्मपमातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले.
ii) त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत रूपांतर केले.
iii) त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली.
3. तुम्ही काय कराल ?
तुमच्या आवडत्या छंदाला चालना मिळाली, तर तुम्ही काय कराल ?
उत्तर :
माझा आवडता छंद वस्तूंचा संग्रह करणे आहे. या छंदाला चालना मिळाली तर मी माझ्या घरात एक छोटेसे वस्तुसंग्रहालय तयार करील. ते पूर्ण झाल्यावर शाळेतील स्नेहसंम्मेलनात त्या वस्तूंचे प्रदर्शन भरवील.
4. चित्र वर्णन करा.
आपल्या पाठातील अफगाणिस्तानमधील हड्डा येथील स्तूपावरच्या गांधार शैलीच्या शिल्पांचे निरीक्षण करून चित्रवर्णन करा.
उत्तर :
अफगाणिस्तानमधील हड्डा येथील स्तूपावरच्या गांधार शैलीतील मूर्तीची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळतीजुळती आहे. या शिल्पांवरील चित्रांमध्ये ग्रीक लोकांचा पोशाख आहे. तसेच अँफेरा म्हणजे एक प्रकारचा कुंभ व तेथील काही लोकांच्या हातात वाद्ये दिसत आहेत.
5. अधिक माहिती मिळवा.
1) गांधार शैली
उत्तर :
i) ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला आहे. त्याला गांधार कला असे म्हणतात.
ii) गांधार कला शैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या. या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या, म्हणून त्या शैलीस ‘गांधार शैली’ असे म्हटले जाते.
iii) या शैलीतील मूर्तीची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळतीजुळती आहे. तसेच गांधार कलेतील ग्रीक शैलीत रोमन शैलीच्या छटाही दिसतात. गांधार शिल्प शैलाला ‘इण्डोग्रीक’ ‘ग्रीको बुद्धिस्ट’ आणि ‘इण्डोहेलोनिक’ अशी ही नावे दिली गेली आहेत.
2) रेशीम मार्ग
उत्तर :
i) चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात ‘चीनांशुक’ असे नाव होते. चीनांशुकाला भारतात मोठी मागणी होती.
ii) प्राचीन भारतातील व्यापारी हे चीनांशुक पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत. हा व्यापार खुश्कीच्या मार्गाने होत असे त्या मार्गाला ‘रेशीम मार्ग’ असे म्हणतात.
iii) भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली होती.
6. पाठात उल्लेख केलेले आग्नेय आशियातील देश नकाशा आराखड्यात दाखवा.
उत्तर :