वस्त्र आपली गरज स्वाध्याय
वस्त्र आपली गरज स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 1
1. खालीलपैकी ज्या वस्तू तुमच्याकडे असाव्यात असे वाटते, त्या वस्तूंची नावे वहीत लिहा.
1) पाण्याची बाटली 2) चेंडू 3) गोट्या 4) लॅपटॉप 5) फ्लॉवरपॉट 6) मोबाइल 7) सायकल 8) स्कूटर 9) फोटो फ्रेम 10) जेवणाचा डबा
यांपैकी कोणत्या वस्तू तुम्ही स्वत: वापरणार आहात ?
उत्तर :
1) पाण्याची बाटली 2) चेंडू 3) सायकल 4) जेवणाचा डबा
2. पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी तुम्ही कोणकोणत्या कपड्यांची निवड कराल, त्याची नोंद वहीत करा.
उत्तर :
पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी आम्ही महाराष्ट्रीयन वेशभूषेची निवड करू. मुलींकरिता लुगडे, चोळी, महाराष्ट्रीयन अलंकार (ठुसी, मंगळसूत्र, मोहनमाळ, मुखरा, पाटल्या, काचेच्या बांगड्या) इत्यादी तर मुलांसाठी धोतर, सदरा, दुप्पटा इत्यादी.
3. खालील तक्त्यात आपल्या देशातील काही राज्यांची नावे दिलेली आहेत. तेथील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार तक्त्यात लिहा.
राज्याचे नाव | वस्त्र |
---|---|
महाराष्ट्र | |
ओडिशा | |
पश्चिम बंगाल | |
कर्नाटक | |
गुजरात | |
पंजाब |
उत्तर :
राज्याचे नाव | वस्त्र |
---|---|
महाराष्ट्र | साडी, लुगडे, धोतर, पायजामा, सदरा, पॅट, शर्ट, बंगाली इत्यादी |
ओडिशा | साडी, पॅट, शर्ट |
पश्चिम बंगाल | साडी, पॅट, शर्ट, धोतर, बंगाली |
कर्नाटक | साडी, पॅट, शर्ट, लुंगी |
गुजरात | घागरा चोली, पायजामा, साडी, पॅट, शर्ट |
पंजाब | सलवार, सूट, बंगाली, पायजामा, शेरवानी |