धोंडा स्वाध्याय
धोंडा स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी

प्रश्न. 1. खालील आकृत्या पूर्ण करा.
अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

इ)

उत्तर :

प्रश्न. 2. हे केव्हा घडले ते लिहा.
अ) राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली.
उत्तर :
पहिल्यांदा राजूने तो धोंडा फारसे बल न लावता फेकला. पण अपेक्षेपेक्षा तो फार दूर गेला. म्हणून त्याने तो उचलून पूर्वीपेक्षा फारच कमी बलाने फेकला तेव्हा तो धोंडा पूर्वीपेक्षाही उंच उड्या मारत गेला व थांबला. तेव्हा राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली.
आ) प्रखर प्रकशातही राजूचे आईबाबा झोपले होते.
उत्तर :
मध्यरात्र झाली होती. राजूनं जिथं तो धोंडा ठेवला होता तो ड्रॉवर उघडलं. ड्रॉवर उघडताच ती खोली प्रकशानं झळकून गेली. धोंडा एखाद्या हिऱ्यासारखा चमकत होता. त्याच्यापासून विशिष्ट प्रकारच्या लहरी निघत होत्या. त्यावेळी त्या प्रखर प्रकशातही राजूचे मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला.
इ) राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला.
उत्तर :
प्रकाश फेकणारा धोंडा, वेडावाकडा होऊ लागला आणि त्याच्यापासून दुसऱ्या एका धोंड्याची निर्मिती झाली. आता राजूला दोन प्रकाशमय धोंडे स्पष्ट दिसू लागले. मग धोंड्याचा प्रकाश हळूहळू लुप्त होऊ लागला तेव्हा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला.
प्रश्न. 3. चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मन:स्थिती, याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
राजूला चकाकणारा दगड सापडल्यानंतर त्याचं कुतूहल जागृत झालं होतं. मध्यरात्री तो गडबडून उठला. त्यानं आईला हलवून उठवलं तरी ती उठली नाही. याचं त्याला आश्चर्य वाटलं होतं. प्रखर प्रकशातही आईबाबा झोपलेले पाहून तो गांगरला होता. इतर सर्व झोपले आणि आपण तेवढे जागे हे त्याच्या आकलनापलीकडचं होतं. प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहारला त्या धोंड्यापासून दुसऱ्या धोंड्याची निर्मिती झालेली पाहून तो घाबरला होता. लहान धोंड्याची हालचाल पाहून राजूला भीतिमिश्रित गंमत वाटली. सकाळी हे दोन धोंडे पाहून त्याचं हृदय धडधडलं. राजूची अशी मन:स्थिती झाली होती.
प्रश्न. 4. राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा.
उत्तर :
राजूला दगड सापडला. त्याने ती घरी आणला. बाबा रागावले. त्यांनी तो फेकून दिला. राजूने तो दगड पुन्हा घरी आणला. ड्रॉवरमध्ये ठेवून दिला. त्याला मध्यरात्री खडखडून जाग आली. आईला हलवूनही ती उठली नाही. दगडाचा प्रखर प्रकाश खोलीभर पसरला. त्या प्रकशातही आईबाबा गाढ झोपले होते. धोंड्याने दुसरा धोंडा निर्माण केला. ते दोन्ही धोंडे राजूने शाळेत नेले. राजूच्या सरांनी त्याला व त्याच्या बाबांना शास्त्राज्ञाकडे नेले. राजूची शास्त्रज्ञांशी भेट झाली.
प्रश्न. 5. चौकसपणा व जिज्ञासूवृत्ती हे गुण तुम्हांला महत्त्वाचे वाटतात का ? का ते सांगा.
उत्तर :
चौकसपणा व जिज्ञासूवृत्ती हे गुण आम्हांला महत्त्वाचे वाटतात. कारण हेच गुण सर्व वैज्ञानिक शोधांची जननी आहे.
खेळूया शब्दांशी
कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा.
(करडा, विचारशृंखला, अस्वस्थता, घालमेल)
अ) लेखकांनी…………….. तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला.
उत्तर :
लेखकांनी विचारशृंखला तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला.
आ) शिक्षकांचा ……………… कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले.
उत्तर :
शिक्षकांचा करडा कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले.
इ) वार्षिक परीक्षेला निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड ……………. होत होती.
उत्तर :
वार्षिक परीक्षेला निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड घालमेल होत होती.
ई) रामरावांची ……………… बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले गेले.
उत्तर :
रामरावांची अस्वस्थता बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले गेले.
खेळ खेळूया
खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.

उत्तर :

लिहिते होऊया
राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला, त्याप्रमाणे तुम्हांला कधी वेगळ्या वस्तू सापडल्या का ? त्या कोणत्या ?
उत्तर :
मला दोन अनोख्या गोष्टी सापडल्या.
सोनचाफ्याला लागलेले गुलाबाचे फूल आणि कण्हेरीला लागलेला मोगरा.
नंतर माळ्याने सांगितले की ह्या झाडांवर बडिंग केलेले आहे.
विद्यार्थ्यानो, तुम्हांला आवडलेल्या राजूच्या कथेचा शेवटचा भाग हा काल्पनिक विज्ञानकथेचा भाग आहे. या पाठाचा शेवट बदलून वेगळ्या प्रकारे कथा पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा.
उत्तर :
शास्त्रज्ञ पंडितांना त्या धोंड्याच्या हालचालीवरून त्याची भाषा अवगत होती. शास्त्रज्ञ पंडित त्याला निरखून पाहू लागले आणि आम्हाला सांगू लागले की त्या धोंड्याने त्यांच्या भाषेत त्याच्या ग्रहावर संदेश पाठवला आहे की, “या ग्रहावरती मुले खूप चांगली आहेत. त्यांनी मला अजिबात त्रास दिला नाही. शक्य झालं तर या ग्रहावरच्या मुलांशी मैत्री जोडा.” नंतर पंडित म्हणाले, “आपणही त्यांना शांतीचा व मैत्रीचा संदेश पाठवू या. तो मला पाठवता येईल.”
दोन शास्त्रज्ञ व राजू यांच्यात काय बोलणे झाले असेल, ते संवादरूपाने लिहा.
उत्तर :
राजू – सर, मी हे दोन धोंडे आणले आहेत. ते साधे धोंडे नाहीत.
डॉ. पंडित – दाखव पाहू ! अरे आम्ही ओळखतो यांना.
राजू – ओळखता ? काय आहेत हे ?
डॉ. कसबे – हे परग्रहावरचे सजीव प्राणी आहेत.
राजू – काय ? हे कशासाठी इथं आलेत ?
डॉ. पंडित – पृथ्वीला गिळंकृत करायला ? त्यांची शक्ती फार मोठी आहे.
राजू – मग आता तुम्ही काय करणार ?
डॉ. कसबे – यांचा नायनाट करू.
डॉ. पंडित – आमच्याकडेही अणुशक्ती आहे. दोन्ही धोंड्याचा नायनाट करावाच लागेल.
डॉ. कसबे – ते धोंडे आम्ही घेऊन जातो. तू निर्धास्त राहा.
आपण समजून घेऊया
खालील चित्रांची नावे लिहा.

उत्तर :

तुम्हांला कोणता न कोणता तरी खेळ खेळायला नक्कीच आवडत असेल. खाली काही मुद्दे दिले आहेत. त्या आधारे तुमचे विचार लिहा.
उत्तर :
