10th geography question paper in marathi 2025 pdf
1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा :
1) भारत व ब्राझील या देशाची राजवट ……………….. प्रकारची आहे.
i) लष्करी
ii) साम्यवादी
iii) प्रजासत्ताक
iv) अध्यक्षीय
उत्तर :
भारत व ब्राझील या देशाची राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे.
2) हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे ………………. वारे अडविले जातात.
i) अतिथंड
ii) अतिउष्ण
iii) उष्ण व कोरडे
iv) बाष्पयुक्त
उत्तर :
हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडविले जातात.
3) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ………………. व्यवसायावर अवलंबून आहे.
i) प्राथमिक
ii) द्वितीयक
iii) तृतीयक
iv) चतुर्थक
उत्तर :
ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे.
4) ब्राझीलचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात …………….. क्रमांक आहे.
i) पाचवा
ii) सातवा
iii) सहावा
iv) चौथा
उत्तर :
ब्राझीलचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात पाचवा क्रमांक आहे.
2. वेगळा घटक ओळखा :
1) क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य :
i) प्रश्नावली
ii) कॅमेरा
iii) संगणक
iv) नोंदवही
उत्तर :
संगणक
2) ब्राझीलमधील नद्या :
i) अँमेझाॅन
ii) पॅराग्वे
iii) उरुग्वे
iv) गंगा
उत्तर :
गंगा
3) प्राथमिक व्यवसाय :
i) शेती
ii) खाणकाम
iii) पर्यटन
iv) मत्स्य व्यवसाय
उत्तर :
पर्यटन
4) वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी प्रमुख घटक :
i) पाण्याची उपलब्धता
ii) प्रतिकूल हवामान
iii) सुपीक जमीन
iv) अनुकूल हवामान
उत्तर :
प्रतिकूल हवामान
3. चूक की बरोबर ते सांगा (कोणतेही चार) :
1) भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे.
उत्तर :
बरोबर
2) ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकावेळी समान ऋतू असतात.
उत्तर :
चूक
3) मॅनॉस हे निग्रो व अँमेझाॅन या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे.
उत्तर :
बरोबर
4) ब्राझीलमध्ये लिंगगुणोत्तर जास्त आहे.
उत्तर :
बरोबर
5) ब्राझील हा वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश आहे.
उत्तर :
चूक
4. अ) तुम्हास पुरविलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा व चिन्हांची सूची तयार करा (कोणतेही चार) :
1) पंपास
2) माराजॉ बेट
3) ब्राझीलची राजधानी
4) पिको दी नेब्लीना
5) पॅराना नदी
6) मारान्हाओ राज्य
उत्तर :

आ) दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (कोणतेही चार) :

प्रश्न :
1) वरील नकाशा काय दर्शवितो ?
उत्तर :
भारताचे स्थान व विस्तार
2) भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते ?
उत्तर :
इंदिरा पॉइंट
3) भारतातील पूर्व-पश्चिम अंतर किती आहे ?
उत्तर :
3000 किमी
4) भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली आहे ?
उत्तर :
82°30′ पूर्व रेखावृत्त
5) भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?
उत्तर :
अरबी समुद्र
5. भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही दोन) :
1) हिमालयातील नद्या बारमाही वाहतात.
उत्तर :
i) हिमालयातील बहुतांश नदया अतिउंचावरील बर्फाच्छादित पर्वतशिखरांमधून उगम पावतात.
ii) उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते.
iii) पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूत पाणीपुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नदया बारमाही स्वरूपाच्या आहेत.
2) ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
उत्तर :
i) ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही.
ii) या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते.
iii) या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
3) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.
उत्तर :
i) ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.
ii) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ 600 मिमी आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.
iii) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात. म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.
4) ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही.
उत्तर :
i) ब्राझीलमधील बहुतांश नद्यांतील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे.
ii) ब्राझीलमधील बहुतांश नद्यांतील विसर्गाचा वेग जास्त आहे.
iii) ब्राझीलमध्ये नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात उंचसखल भूभाग आहेत. त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत. म्हणून, ब्राझीलमध्ये (अंतर्गत) जलमार्गाचा विकास झालेला नाही
6. अ) खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरए लिहा :
भारत – साक्षरता प्रमाण (1981 ते 2016)
| वर्ष | साक्षरता (टक्केवारी) |
|---|---|
| 1981 | 40.8 |
| 1991 | 48.2 |
| 2001 | 61.0 |
| 2011 | 68.3 |
| 2016 | 72.2 |

प्रश्न :
1) वरील आलेख काय दर्शवितो ?
उत्तर :
वरील आलेख भारतातील साक्षरता प्रमाण (1981 ते 2016) दर्शवितो.
2) 1991 साली भारताची साक्षरता किती होती ?
उत्तर :
1991 साली भारताची साक्षरता 48.2% होती.
3) 1991 ते 2001 या दशकात भारताच्या साक्षरतेत किती टक्क्यांनी वाढ झाली आहे ?
उत्तर :
1991 ते 2001 या दशकात भारताच्या साक्षरतेत 12.8% वाढ झाली आहे.
किंवा
आ) दिलेल्या आकृतीचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

प्रश्न :
1) प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे ?
उत्तर :
प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारत देशात जास्त आहे.
2) स्थूल आंतरदेशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान जास्त आहे ?
उत्तर :
स्थूल आंतरदेशीय उत्पादनात ब्राझील देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान जास्त आहे.
3) स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांना हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे ?
उत्तर :
स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांना हिस्सा ब्राझील देशात जास्त आहे.
4) ब्राझीलमध्ये कोणत्या व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे ?
उत्तर :
ब्राझीलमध्ये तृतीयक व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे.
5) स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा कितीने जास्त आहे ?
उत्तर :
स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा 10 % ने जास्त आहे.
6) भारतात तृतीयक क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी किती ?
उत्तर :
भारतात तृतीयक क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी 26.9% आहे.
7. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) :
1) क्षेत्रभेट म्हणजे काय ? क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी कराल ?
उत्तर :
क्षेत्रभेट म्हणजे नित्याच्या वर्गखोलीबाहेर जाऊन, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी किंवा एखाद्या विशिष्ट स्थळी भेट देऊन व्यावहारिक अनुभव मिळवण्यासाठी, संशोधनकार्यासाठी अथवा एखाद्या विषयाचा वास्तविक जीवनातील उपयोग समजून घेण्यासाठी आयोजित केलेली शैक्षणिक अथवा व्यावसायिक सहल होय. भूगोल, पर्यावरणशास्त्र, समाजशास्त्र, व्यवसाय व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी यांसारख्या विषयांच्या अभ्यासात अशा क्षेत्रभेटींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
i) स्थळनिश्चिती व पूर्वनियोजन : क्षेत्रभेट आयोजित करण्यापूर्वी योग्य ठिकाणाची निवड करणे, प्रवासाची व्यवस्था लावणे, वेळापत्रक आखणे आणि संपूर्ण कार्यक्रमाची आखणी करणे अत्यावश्यक असते.
ii) उद्दिष्टांची स्पष्टता : शिक्षकांनी या भेटीमागील हेतू आणि तिचा अभ्यासक्रमाशी असलेला संबंध विद्यार्थ्यांना स्पष्टपणे समजावून सांगावा. उदाहरणार्थ, इस्रोसारख्या अवकाश संशोधन संस्थेला भेट दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञान, रॉकेट तंत्रज्ञान व पृथ्वीसंबंधी कुतूहल जागृत होऊ शकते, तसेच भविष्यातील करिअर निवडीसाठीही उपयुक्त मार्गदर्शन मिळू शकते.
iii) कागदपत्रांची पूर्वतयारी : आवश्यक नकाशे, परवानगीपत्रे व इतर महत्त्वाची कागदपत्रे अगोदरच तयार ठेवणे गरजेचे असते. उदाहरणार्थ, एखाद्या कारखान्यास भेट द्यायची झाल्यास, त्या कारखान्याच्या प्रशासनाकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक ठरते.
iv) प्रवासाचे नियोजन : विद्यार्थ्यांना प्रवासाचे साधन, अंदाजित खर्च, सोबत न्यावयाच्या वस्तू, भोजन-व्यवस्था, योग्य पोशाख आणि आवश्यक साहित्य यांबाबत आधीच माहिती द्यावी, जेणेकरून संपूर्ण प्रवास विनाअडथळा पार पडेल.
v) आपत्कालीन सज्जता : प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या तसेच समूहाच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे. शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, अनोळखी परिसरात एकट्याने फिरू नये, आणि स्थानिक निसर्ग व संस्कृतीचा आदर राखावा. स्थानिक नागरिकांशी संवाद साधल्यास अतिरिक्त उपयुक्त माहिती मिळू शकते. याशिवाय, प्रथमोपचार पेटी सोबत बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
vi) प्रश्नावलीची निर्मिती : विद्यार्थ्यांनी निरीक्षणासाठी उपयोगी ठरतील असे खुल्या स्वरूपाचे प्रश्न आधीच तयार करावेत, जेणेकरून त्यांचा शिकण्याचा अनुभव अधिक समृद्ध होईल. तसेच, भेटीदरम्यान केलेली निरीक्षणे व त्यातून निघालेले निष्कर्ष नोंदवण्यासाठी स्वतंत्र नोंदवही जवळ बाळगणे फायदेशीर ठरते.
2) स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले ?
उत्तर :
स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले :
I) ब्राझील : स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध वित्तीय संकटांना सामोरे जावे लागले.
भारत : i) स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षांत भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले.
ii) स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतांतील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले.
iii) स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले.
3) ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते ?
उत्तर :
ब्राझीलला व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे :
i) वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना निर्वनीकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे.
ii) दोन्ही देशांतील वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे.
iii) वाढते प्रदूषण, निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
iv) पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशांतील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.