प्राण्यांचे वर्गीकरण स्वाध्याय इयत्ता दहावी

प्राण्यांचे वर्गीकरण स्वाध्याय इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2

1. ओळखा पाहू, मी कोण ?

अ. मी द्विस्तरीय प्राणी असून मला देहगुहा नाही. मी कोणत्या संघातील प्राणी आहे ?

उत्तर :

सिलेंटराटा किंवा निडारिया प्राणीसांघ

आ. माझे शरीर अरिय सममिती दाखवते. माझ्या शरीरात (जलसंवहनी) जलाभिसरण संस्था आहे. मी मासा नसतानाही मला मासा संबोधतात. माझे नाव काय ?

उत्तर :

तारामासा

इ. मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल ?

उत्तर :

गोलकृमी प्राणीसंघ

ई. मी बहुपेशीय प्राणी असूनसुद्धा माझ्या शरीरात ऊती नाहीत. माझ्या प्राणीसंघाचे नाव सांगा.

रंध्रीय प्राणीसंघ

2. प्रत्येकाची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.

i) रोहू मासा :

उत्तर :

वर्गीकरण :

सृष्टी : प्राणी

विभाग : समपृष्ठरज्जू

संघ : समपृष्ठरज्जू

उपसंघ : पृष्ठवंशीय प्राणी

वर्ग : मत्स्य

उपवर्ग : अस्थिमत्स्य

लक्षणे :

पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी

अवयवसंस्था स्तर शरीर संघटन

द्विपार्श्वसममित शरीर

त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर

ii) नाकतोडा

उत्तर :

वर्गीकरण :

सृष्टी : प्राणी

विभाग : असमपृष्ठरज्जू

संघ : संधिपाद

वर्ग : कीटक

लक्षणे :

पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी

अवयवसंस्था स्तर शरीर संघटन

द्विपार्श्वसममित शरीर

त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर

iii) हत्ती

उत्तर :

वर्गीकरण :

सृष्टी : प्राणी

विभाग : समपृष्ठरज्जू

संघ : समपृष्ठरज्जू

उपसंघ : पृष्ठवंशीय प्राणी

वर्ग : सस्तन

लक्षणे :

पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी

अवयवसंस्था स्तर शरीर संघटन

द्विपार्श्वसममित शरीर

त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर

iv) पेंग्विन

उत्तर :

वर्गीकरण :

सृष्टी : प्राणी

विभाग : समपृष्ठरज्जू

संघ : समपृष्ठरज्जू

उपसंघ : पृष्ठवंशीय प्राणी

वर्ग : पक्षी

लक्षणे :

पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी

अवयवसंस्था स्तर शरीर संघटन

द्विपार्श्वसममित शरीर

त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर

v) सुसर

उत्तर :

वर्गीकरण :

सृष्टी : प्राणी

विभाग : समपृष्ठरज्जू

संघ : समपृष्ठरज्जू

उपसंघ : पृष्ठवंशीय प्राणी

वर्ग : सरीसृप

लक्षणे :

पेशीभित्तीका नसलेले बहुद्देशीय प्राणी

अवयवसंस्था स्तर शरीर संघटन

द्विपार्श्वसममित शरीर

त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर

vi) टोड

उत्तर :

वर्गीकरण :

सृष्टी : प्राणी

विभाग : समपृष्ठरज्जू

संघ : समपृष्ठरज्जू

उपसंघ : पृष्ठवंशीय प्राणी

वर्ग : उभयचर

लक्षणे :

पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी

अवयवसंस्था स्तर शरीर संघटन

द्विपार्श्वसममित शरीर

त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर

vii) उडणारा सरडा

उत्तर :

वर्गीकरण :

सृष्टी : प्राणी

विभाग : समपृष्ठरज्जू

संघ : समपृष्ठरज्जू

उपसंघ : पृष्ठवंशीय प्राणी

वर्ग : सरीसृप

लक्षणे :

पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी

अवयवसंस्था स्तर शरीर संघटन

द्विपार्श्वसममित शरीर

त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर

viii) हुक वर्म

उत्तर :

वर्गीकरण :

सृष्टी : प्राणी

विभाग : असमपृष्ठरज्जू

संघ : गोल कमी

लक्षणे :

पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी

अवयवसंस्था स्तर शरीर संघटन

द्विपार्श्वसममित शरीर

त्रिस्तरीय व आभासी देहगुहा असलेले शरीर

ix) जेलीफिश

उत्तर :

वर्गीकरण :

सृष्टी : प्राणी

विभाग : असमपृष्ठरज्जू

संघ : सिलेंटराटा / निडारिया

लक्षणे :

छत्रीच्या आकाराचा पेशीभित्तीका नसलेला बहुपेशीय प्राणी

ऊती स्तर शरीर संघटन

अरिय सममित शरीर

द्विस्तरीय, देहगुहाटीन शरीर

x) गोम

उत्तर :

वर्गीकरण :

सृष्टी : प्राणी

विभाग : असमपृष्ठरज्जू

संघ : संधिपाद

लक्षणे :

पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी

अवयवसंस्था स्तर शरीर संघटन

द्विपार्श्वसममित शरीर

त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर

3. प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कशा बदलत गेल्या आहेत ?

उत्तर :

i) वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला.

ii) ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी सर्वांत पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, अधिवास यासारख्या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केले होते.

iii) विज्ञानातील प्रगतीनुरूप पुढे संदर्भ बदलत गेले व त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्देसुद्धा बदलते.

iv) ॲरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला ‘कृत्रिम पद्धत’ म्हणतात.

v) त्यांच्या व्यतिरिक्त थेओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला होता.

vi) कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला.

vii) वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धतही सजीवांचे शरीररचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यांवर आधारित होती.

viii) कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अमलात आणली गेली.

ix) डाॅब्झंस्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले.

x) अलीकडच्या काळात कार्ल वुज यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. अशाप्रकारे वर्गीकरणाच्या पद्धती बदलत गेल्या.

4. रचनात्मक संघटन व सममिती यांमध्ये नेमका काय फरक आहे ? उदाहरणांसहित स्पष्ट करा.

उत्तर :

a) रचनात्मक संघटन हे शरीरातील सर्वात लहान घटक (पेशी) ते सर्वांत मोठा घटक (अवयव) यांची रचना स्पष्ट करते, तर सममिती हे शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता शरीराचे किती समान भाग होतात हे स्पष्ट करते.

b) वरील फरक पुढील उदाहरणांवरून स्पष्ट होतो.

i) निडारिया संघातील प्राण्यांच्या शरीरात पेशी एकत्र येऊन ऊती तयार होतात व त्या शारीरिक क्रिया पार पाडतात. यालाच पेशी-ऊती स्तर संघटन म्हणतात. तर निडारिया संघातील प्राणी हे अरिय सममिती दर्शवतात, म्हणजेच जेव्हा त्याच्या शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतल्यास दोन समान भाग मिळतात.

ii) चपट्या कृमींमध्ये ऊती अवयव स्तर संघटन दिसून येते. यामध्ये काही ऊती एकत्र येऊन ठरावीक अवयव तयार झालेले असतात. तर चपट्या कृमींचे शरीर द्विपार्श्व सममिती दर्शवते म्हणजेच त्यांच्या शरीराच्या फक्त एकाच अक्षातून काल्पनिक छेद घेतल्यास शरीराचे दोन समान भाग होतात.

5. थोडक्यात उत्तरे द्या.

अ. शार्कचे ‘वर्गापर्यंत’ शास्त्रीय वर्गीकरण लिहा.

उत्तर :

शार्कचे वर्गीकरण :

सृष्टी : प्राणी

संघ : समपृष्ठरज्जू

उपसंघ : पृष्ठवंशीय प्राणी

वर्ग : मत्स्य

उपवर्ग : कास्थिमत्स्य

आ. कंटकचर्मी संघाचे चार गुणधर्म लिहा.

उत्तर :

i) कंटकचर्मी प्राणीसंघातील प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शिअम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून यांना कंटकचर्मी प्राणी म्हणतात.

ii) या संघातील प्राणी फक्त समुद्रातच आढळतात.

iii) या संघातील प्राण्यांचे शरीर त्रिस्तरी, देहगुहायुक्त आणि पंचअरिय सममिती दर्शवते; मात्र, अळी अवस्थेमध्ये त्यांच्यात द्विपार्श्व सममिती दिसून येते.

iv) हे प्राणी प्रचलन करण्यासाठी, तसेच अन्न पकडण्यासाठी नलिकापादांचा उपयोग करतात.

v) या प्राण्यांमध्ये पुनर्निर्मितीची क्षमता चांगली असते.

इ. फुलपाखरू व वटवाघूळ यांतील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करा.

उत्तर :

फुलपाखरूवटवाघूळ
i) फुलपाखरू हे उपसृष्टी असमपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले जाते.i) वटवाघूळ हे उपसृष्टी समपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले जाते.
ii) संधिपाद संघातील कीटकवर्गात याचा समावेश केला जातो.ii) पृष्ठवंशीय प्राणी या उपसंघातील सस्तन वर्गात याचा समावेश केला जातो.
iii) फुलपाखराला पायांच्या तीन जोड्या आणि दोन पंखांच्या जोड्या असतात. हे पंख कायटीनयुक्त असतात.iii) वटवाघळाला पायाची एक जोडी असते आणि पंखांप्रमाणे भासणारे चर्मपर असतात. यात हाडे असतात.
iv) फुलपाखरू दिवसा आढळणारा कीटक आहे.iv) वाटवाघूळ सस्तन निशाचर प्राणी आहे.
v) फुलपाखरू अंडी घालते. अंड्यातून अळी, अळीचा कोश व कोशातून फुलपाखरू अशी स्थित्यंतरे होतात.v) वटवाघूळ जरायुज असतात. ते पिल्लांना जन्म देऊन त्यांचे स्वत:च्या दुधाने पोषण करतात.

ई. झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे ? उत्तर सकारण स्पष्ट करा.

उत्तर :

a. झुरळ हा संधिपाद संघातील प्राणी असून त्याचा समावेश कीटक वर्गात केलेला आहे.

b. झुरळ संधिपाद असण्याची कारणे पुढीलप्रमाणे :

i) शरीरावर कायटीनच्या बाह्य कंकालाचे आच्छादन.

ii) छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे. जसे : तीन पायांच्या जोड्या.

iii) द्विपार्श्व सममित, त्रिस्तरीय, सत्य देहगुहायुक्त आणि खंडीभूत शरीर.

iv) श्वसनासाठी श्वासरंध्र व श्वसनलिकांचे जाळे.

6. शास्त्रीय कारणे द्या.

अ. कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.

उत्तर :

i) कासव सरीसृप असते. ते जमिनीवर राहते त्या वेळी फुफ्फुसाने श्वसन करते.

ii) ते पाण्यात पोहते तेव्हाही प्रत्येक श्वासाला नाक पाण्याबाहेर काढून श्वासोच्छवास करते. या दोन्ही अधिवासांत त्याला फुफ्फुसानेच श्वसन करता येते.

iii) उभयचर प्राण्याचे असे नसते. तो जमिनीवर फुफ्फुसाच्या साहाय्याने आणि पाण्यात त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतो.

iv) तसेच कासवाच्या अंगावर बाह्यकंकालही असतो. म्हणून उभयचर या वर्गामध्ये कासवाचा समावेश करता येत नाही.

आ. जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो.

उत्तर :

i) जेलीफिशच्या शरीरात दंशपेशीयुक्त शुंडके असतात.

ii) जेलीफिशला या शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी किंवा संरक्षणासाठी होतो.

iii) जेव्हा आपले शरीर जेलीफिशच्या संपर्कात येते, तेव्हा शुंडकातील दंशपेशी आपल्या शरीरात विषाचे अंत:क्षेपण करतात व त्यामुळे आपल्या शरीराचा दाह होतो.

इ. सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू आहेत, पण सर्व समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय नाहीत.

उत्तर :

i) पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या पृष्ठरज्जूचे रूपांतर नंतरच्या काळात पाठीच्या कण्यात किंवा कशेरुस्तंभात होते त्यामुळे पृष्ठवंशीय प्राणी कधी ना कधी समपृष्ठरज्जू असतात.

ii) मात्र काही समपृष्ठरज्जू, पृच्छसमपृष्ठरज्जू व शीर्षसमपृष्ठरज्जू प्राण्यांच्या पृष्ठरज्जूचे रूपांतर कशेरुस्तंभात होत नाही. त्यामुळे ते पृष्ठवंशीय ठरले जात नाहीत.

अशाप्रकारे, सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू आहेत, पण सर्व समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय नाहीत.

ई. बॅलॅनोग्लॉससला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांमधील दुवा म्हणतात.

उत्तर :

i) बॅलॅनोग्लॉससमध्ये असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी या दोन्हींचे गुणधर्म आढळून येतात.

ii) बॅलॅनोग्लॉससमध्ये पाठीचा कणा किंवा चेतारज्जू नसणे, तसेच शरीर कृमीसारखे असणे असे असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे गुणधर्म आढळून येतात.

iii) तसेच, बॅलॅनोग्लॉससमध्ये पृष्ठरज्जू असणे, ग्रसनी कल्लाविदरे असणे असे समपृष्ठरज्जू प्राण्यांचे गुणधर्म आढळून येतात.

म्हणून, बॅलॅनोग्लॉससला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांमधील दुवा म्हणतात.

उ. सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.

उत्तर :

i) सरीसृप प्राणी हे शीतरक्ती असून त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते.

ii) त्यामुळे परिसराचे तापमान जसे वर खाली होते तसे सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमानही वरखाली होते.

म्हणून, सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.

7. योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.

अ. रंध्रीय प्राण्यांच्या (स्पॉजेस) शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात ?

1. कॉलर पेशी

2. निडोब्लास्ट

3. अंतर्जनस्तर पेशी

4. बहिर्जनस्तर पेशी

उत्तर :

कॉलर पेशी

स्पष्टीकरण : रंध्रीय प्राणी हे पाण्यामध्ये राहणारे प्राणी आहेत. पाण्याला प्रवाहित करण्यासाठी यांच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात.

आ. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर द्विसममिती दाखवते ?

1. तारामासा

2. जेलीफिश

3. गांडूळ

4. स्पॉज

उत्तर :

गांडूळ

स्पष्टीकरण : गांडूळाच्या शरीराचा एकच अक्ष असा असतो की, त्या अक्षातून काल्पनिक छेद घेतल्यास शरीराचे दोन समान भाग होतात, म्हणून गांडूळ द्विपार्श्व सममिती दर्शवितो.

इ. खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुननिर्मिती करू शकतो ?

1. झुरळ

2. बेडूक

3. चिमणी

4. तारामासा

उत्तर :

तारामासा

स्पष्टीकरण : तारामाशामध्ये पुनर्निर्मितीची क्षमता असल्यामुळे तो आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो.

ई. वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो ?

1. उभयचर

2. सरीसृप

3. पक्षी

4. सस्तन

उत्तर :

सस्तन

स्पष्टीकरण : वटवाघळामध्ये दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असतात त्यामुळे त्यांचा समावेश सस्तन वर्गात होतो.

8. खालील तक्ता पूर्ण करा.

देहगुहाजननस्तरसंघ
नसते———रंध्रीय प्राणीसंघ
नसतेस्त्रिस्तर———
आभासी———गोलकृमींचा संघ
असते———संधिपाद प्राणीसंघ

उत्तर :

देहगुहाजननस्तरसंघ
नसतेद्विस्तररंध्रीय प्राणीसंघ
नसतेस्त्रिस्तरचपट्या कृमींचा संघ
आभासीत्रिस्तरगोलकृमींचा संघ
असतेत्रिस्तरसंधिपाद प्राणीसंघ

9. तक्ता पूर्ण करा.

प्रकारवैशिष्ट्येउदाहरणे
चक्रमुखी
कल्ल्याद्वारे श्वसन
उभयचर
देवमासा
शीतरक्ती

उत्तर :

प्रकारवैशिष्ट्येउदाहरणे
चक्रमुखीजबडेविरहित चूषीमुखपेट्रोमायझाॅन
मत्स्यकल्ल्याद्वारे श्वसनशार्क
उभयचरबाह्यकंकाल नाहीबेडूक
सस्तनदूध स्त्रवणाऱ्या ग्रंथीदेवमासा
सरीसृपशीतरक्तीपाल

11. आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.

हायड्रा, जेलीफिश, प्लॅनेरीया, गोलकृमी, फुलपाखरू, गांडूळ, ऑक्टोपस, तारामासा, शार्क, बेडूक, पाल, कबुतर

उत्तर :

11. आकृतीस योग्य नावे द्या.

उत्तर :

Leave a Comment