चोच आणि चारा स्वाध्याय

चोच आणि चारा स्वाध्याय

चोच आणि चारा स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी

चोच आणि चारा या पाठावरती MCQ टेस्ट द्यायची असे तर पुढील लिंक वरती क्लिक करा.

https://swadhyaybooks.com/2025/01/choch_ani_chara_question_answer/

प्रश्न. 1. खालील आकृती पूर्ण करा.

अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

इ)

उत्तर :

प्रश्न. 2. एका शब्दांत उत्तर लिहा.

अ) चोचीचा वरचा भाग –

उत्तर :

मॅक्सिला

आ) चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग –

उत्तर :

एग टूथ

इ) चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिल्या क्रमांकाचा पक्षी –

उत्तर :

गुलाबी फ्लेमिंगो

ई) ‘एग टूथ’ नसलेला पक्षी –

उत्तर :

किवी पक्षी

प्रश्न. 3. कोण ते लिहा.

अ) ‘अग्निपंख’ हे नाव सार्थ करणारा पक्षी –

उत्तर :

फ्लेमिंगो

आ) चोचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी –

उत्तर :

पोपट

इ) ‘शक्करखोरा’ म्हणून ओळखले जाणारे पक्षी –

उत्तर :

शिंजीर

ई) घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी –

उत्तर :

सुगरण किंवा बाया

प्रश्न. 4. फरक लिहा.

किवी पक्षी इतर पक्षी
1)1)
2)2)

उत्तर :

किवी पक्षी इतर पक्षी
1) एग टूथ नसतो. 1) एग टूथ असतो.
2) अंड्याचे कवच लाथा मारून फोडतात. 2) अंड्याचे कवच एग टूथ ने फोडतात.

प्रश्न. 5. पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.

अ) ‘चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात’ या विधानाचा अर्थ.

उत्तर :

सापापासून ते सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या घार या पक्ष्यांची, शिकार घट्ट धरून ठेवता यावी व तिचे तुकडे करता यावेत, यासाठी चोच अणुकुचीदार व टोकाजवळ बाकदार असते. शिंजीर पक्षी चिमणीपेक्षा लहान व नाजूक असतो. त्याला पाकळीवर बसून मध शोषून घेता यावा म्हणून त्याची चोच पातळ, लांब व बाकदार असते. उडता उडता माश्या, टोळ पकडता यावेत, यासाठी वेडा राघू या पक्ष्याची चोच सरळ व लांब असते. सुतार व हुप्पो या पक्ष्यांची चोच सरळसोट असते. अशा चोचींमुळे जमिनीवरचे किडे व झाडाच्या खोडामधले किडे शोधून काढणे त्या पक्ष्यांना सुलभ बनते. अशा प्रकारे जसे भक्ष्य तशी चोच, हे समीकरण तयार झाले आहे.

आ) पक्ष्यांच्या चोचपुरणातून तुम्हांला मिळालेली नवीन माहिती.

उत्तर :

पक्ष्यांच्या पिल्लांना ‘एग टूथ’ असतो, हे तर मला आत्ताच कळले. पक्ष्यांच्या चोचीजवळची छिद्रे म्हणजे त्यांचे नाकच, माणसांचे नाक त्यांच्या तोंडाच्या वर असते. पक्ष्यांचे नाक त्यांच्या चोचीच्या वर असते. माणसाची अन्ननलिका व श्वासनलिका घशामध्ये एकत्र येतात. पक्ष्यांमध्येही अशीच रचना असावी, असे मला वाटू लागले आहे. पक्षी चोचीने अन्न खातात, हे मला दिसत होते. चोचीने ते आणखीही काही कृती करतात, हेही दिसायचे. पण खास लक्ष गेले नव्हते. हा पाठ वाचल्यावर लक्षात आले की, चोच म्हणजे त्यांचा हातच.

इ) ‘ज्याने चोच दिलीय तो चाराही देतो’ या म्हणीचा अर्थ.

उत्तर :

पक्ष्याचे जसे खाद्य असते तशा प्रकारची चोच त्याला मिळालेली आहे. चोचीचा आकार वेगवेगळा असल्यामुळे सगळ्यांचे खाद्य वेगवेगळे ठरले. सगळ्यांचे खाद्य एकच असते, तर त्यांना खाद्य अपुरे पडले असते. त्यांची उपासमार झाली असती. गॅलापॅगोस या बेटावरील फिंच पक्ष्यांची माहिती खूप महत्त्वाची आहे. त्या बेटावर या एकाच प्रकारचे पक्षी आहेत. त्यांची उपासमार होऊ नये म्हणून निसर्गाने त्या पक्ष्यांना वेगवेगळ्या आकाराच्या चोची दिल्या. त्यामुळे एकच परिसर असूनही त्या पक्ष्यांना पुरेसे खाद्य मिळू शकते. म्हणजेच त्याच्या चोचीना निसर्गाने चारा दिला. अन्न दिले. हाच त्या म्हणीचा अर्थ आहे.

प्रश्न. 6. खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे अधोरेखित करा.

अ) सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात.

उत्तर :

सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात.

आ) बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं.

उत्तर :

बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं.

इ) तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा.

उत्तर :

तुम्ही पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करा.

ई) घार आपली शिकार घट्ट पडकते.

उत्तर :

घार आपली शिकार घट्ट पडकते.

प्रश्न. 7. पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्याचे वैशिष्ट्य लिहा.

उत्तर :

i) हॉर्न बिल – सर्वात अधिक वैशिष्टपूर्ण चोच.

ii) फ्लेमिंगो – चोच मधेच वाकडी

iii) गरुड, घार, ससाणा – अणकुचीदार चोच

iv) सुतार, हुप्पो – सरळसोट चोच

v) सनबर्डस् – फुलांमधला मधुरस चोखतात.

vi) पोपट – चोचीचा उपयोग पायासारखा करतो.

vii) खंड्या व वेडा राघू – चोच सरळसोट

viii) सुगरण – कलात्मक घरटे विणते.

ix) शिंपी – चोच सुईसारखी पातळ व टोकदार

x) फिंच – तेरा जाती आणि त्यांच्या चोचींचे अन्नाप्रमाणे आकार व प्रकार वेगळे असतात.

खेळूया शब्दांशी

अ) खाली दिलेल्या चित्रांसाठी योग्य विशेषणे सुचवा व त्याखालील चौकटीत लिहा.

उत्तर :

आपण समजून घेऊया.

1) अव्ययीभाव समास

खालील उदाहरणे अभ्यासा व सामाजिक शब्द अधोरेखित करा.

अ) गरजूंना यथाशक्ती मदत करावी.

उत्तर :

गरजूंना यथाशक्ती मदत करावी.

आ) त्या शहरात जागोजागी वाचनालये आहेत.

उत्तर :

त्या शहरात जागोजागी वाचनालये आहेत.

इ) क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले.

उत्तर :

क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले.

खालील विग्रहापासून सामासिक शब्द तयार करा.

1) प्रत्येक गावी –

उत्तर :

प्रत्येक गावी – गावोगावी

2) जन्मापासून –

उत्तर :

जन्मपासून – आजन्म

3) प्रत्येक पावलावर –

उत्तर :

प्रत्येक पावलावर – पावलोपावली

2) तत्पुरुष समास

खालील सामाजिक शब्दांचा विग्रह करा.

1) राजपुत्र –

उत्तर :

राजपुत्र – राजाचा पुत्र

2) क्रीडांगण –

उत्तर :

क्रीडांगण – क्रीडेकरिता अंगण

3) अष्ठकोन –

उत्तर :

अष्ठकोन – आठ कोनांचा समूह

4) अयोग्य –

उत्तर :

अयोग्य – योग्य नव्हे

भाषासौंदर्य

खालील म्हणी पूर्ण करा.

1) मूर्ती लहान पण ……………..

उत्तर :

मूर्ती लहान पण कीर्ती महान.

2) शितावरून …………….

उत्तर :

शितावरून भाताची परीक्षा.

3) सुंठीवाचून ……………..

उत्तर :

सुंठीवाचून खोकला गेला.

4) ……………. सोंगे फार.

उत्तर :

रात्र थोडी सोंगे फार.

5) ……………… खळखळाट फार.

उत्तर :

उथळ पाण्याला खळखळाट फार.

6) दोघांचे भांडण ……………..

उत्तर :

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.

7) …………….. सव्वालाखाची.

उत्तर :

झाकली मूठ सव्वालाखाची.

8) ……………. चुली.

उत्तर :

घरोघरी मातीच्या चुली.

9) ……………… आंबट.

उत्तर :

खाता येईना द्राक्षे आंबट.

10) अंथरूण पाहून ……………….

उत्तर :

अंथरूण पाहून पाय पसरावे.

11) इकडे आड ……………….

उत्तर :

इकडे आड तिकडे विहीर.

12) ……………… गावाला वळसा.

उत्तर :

काखेत कळसा गावाला वळसा.

13) ……………… तळे साचे.

उत्तर :

थेंबे थेंबे तळे साचे.

14) ……………. उपाशी.

उत्तर :

खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी.

15) …………….. आरसा कशाला ?

उत्तर :

हातच्या कंकणाला आरसा कशाला ?

Leave a Comment