पोषण आणि आहार स्वाध्याय
पोषण आणि आहार स्वाध्याय इयत्ता सहावी सामान्य विज्ञान
1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
अ. अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियेला ………………. म्हणतात.
उत्तर :
अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात.
आ. शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नतील घटकांना ………………. म्हणतात.
उत्तर :
शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नतील घटकांना पोषकतत्वे म्हणतात.
इ. कर्बोदके व ………………. पासून शरीराला ………………. मिळते.
उत्तर :
कर्बोदके व स्निग्धपदार्था पासून शरीराला ऊर्जा मिळते.
ई. संतुलित आहारात ……………….. पोषकतत्त्वांचा ………………. प्रमाणात समावेश असतो.
उत्तर :
संतुलित आहारात सर्व पोषकतत्त्वांचा योग्य प्रमाणात समावेश असतो.
उ. अन्न पिरॅमिडमध्ये तृणधान्यांना सर्वात मोठी जागा देतात कारण त्यांच्यामुळे आपली ………………… गरज भागते.
उत्तर :
अन्न पिरॅमिडमध्ये तृणधान्यांना सर्वात मोठी जागा देतात कारण त्यांच्यामुळे आपली कर्बोदाकांची गरज भागते.
ऊ. गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने ………………… येतो.
उत्तर :
गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने लठपणा येतो.
२. खनिजे व जीवनसत्त्वांच्या तक्त्यांपासून ही माहिती शोधून काढा.
अ. लिंबूवर्गीय फळांमधील पोषकतत्त्वे.
उत्तर :
जीवनसत्त्व C
आ. दुधापासून मिळणारे खनिजे/जीवनसत्त्वे
उत्तर :
खनिजे – कॅल्शिअम व फॉस्फरस
जीवनसत्त्व – A1, B1, D
इ. रातांधळेपणा, स्कर्व्ही, मुडदूस, बेरीबेरी या आजारांची कारणे व लक्षणे.
उत्तर :
i) रातांधळेपणा – जीवनसत्त्व A ची कमतरता.
लक्षणे – कमी उजेडात पाहू न शकणे, अंधत्व.
ii) स्कर्व्ही – जीवनसत्त्व C ची कमतरता.
लक्षणे – हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे.
iii) मुडदूस – जीवनसत्त्व D ची कमतरता.
लक्षणे – हाडे मऊ होणे, त्यामुळे वेदना होणे, हाड मोडणे.
iv) बेरीबेरी – जीवनसत्त्व B1 ची कमतरता.
लक्षणे – चेतातंतुचा आजार.
ई. वरील आजार टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ.
उत्तर :
i) रातांधळेपणा – गाजर, दूध, लोणी, गडद, हिरव्या, भाज्या, रताळे, गडद पिवळी फळे व भाज्या.
ii) स्कर्व्ही – आवळा, कीवी, संत्री, व इतर लिंबूवर्गीय फळे तसेच कोबी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या.
iii) मुडदूस – सूर्यप्रकाशात बसणे, दूध, मासे, अंडी, लोणी.
iv) बेरीबेरी – दूध, मासे, मांस, तृणधान्ये, कवचफळे, डाळी.
उ. अँनिमिया होण्याची कारणे.
उत्तर :
लोह खनिजाची कमतरता आणि जीवनसत्त्व B9 आणि B12 ची कमतरता. त्यामुळे लाल रक्त पेशी तयार होत नाही.
ऊ. दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिज.
उत्तर :
दात व हाडांच्या आरोग्यसाठी कॅल्शिअम व फॉस्फरस आवश्यक खनिज आहे.
ए. A जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा ज्ञानेंद्रियांवर होणारा परिणाम
उत्तर :
A जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा संभवतो. त्यामुळे अंधत्व येते. म्हणजे डोळ्यावर परिणाम होतो.
3. योग्य पर्याय निवडा.
अ. डाळींपासून पुढील पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात मिळतात.
१) कर्बोदके
२) स्निग्ध पदार्थ
३) प्रथिने
४) खनिजे
उत्तर :
प्रथिने
आ. या पदार्थापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते.
१) तृणधान्ये
२) पालेभाज्या
३) पाणी
४) आवळा
उत्तर :
तृणधान्ये
इ. या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो.
१) लोह
२) कॅल्शिअम
३) आयोडीन
४) पोटॅशिअम
उत्तर :
आयोडीन
ई. याचा जंक फूडमध्ये समावेश होतो.
१) संत्री
२) दूध
३) भाकरी
४) चॉकलेट
उत्तर :
चॉकलेट
४. अन्न पिरॅमिडचा वापर करून खाण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे तीन दिवसांसाठी अन्नपदार्थ निवडा.
अटी –
१) तिन्ही दिवसांचा आहार संतुलित असावा.
२) तिन्ही दिवसांच्या आहारात विविधता असावी.
उत्तर :
i) दिवस पहिला : भाकरी, पनीर, पापड, मटकी, केळी.
ii) दिवस दूसरा : पोळी, वरण, दही, तूप, पालक, संत्री.
iii) दिवस तिसरा : भात, ताक, लोणी, पपई, हरभरा.