समाजातील विविधता स्वाध्याय
समाजातील विविधता स्वाध्याय इयत्ता सहावी नागरिकशास्त्र
1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
1) विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे …………………. अनुभवणे होय.
उत्तर :
विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय.
2) भारत हे जगातील एक महत्त्वाचे …………………. राष्ट्र आहे.
उत्तर :
भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.
3) सहकार्यामुळे समाजातील …………………. अधिक निकोप होते.
उत्तर :
सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते.
2. खालील प्रश्नांची प्रत्येकी एक वाक्यात उत्तरे लिहा.
1) सहकार्य म्हणजे काय ?
उत्तर :
परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे म्हणजे सहकार्य होय.
2) धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व आपण का स्वीकारले आहे ?
उत्तर :
आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारले आहे.
3. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
1) भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते ?
उत्तर :
i) भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत.
ii) विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत. त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे.
iii) आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे. यातून भारतीय समाजातील एकता दिसून येते.
2) समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात ?
उत्तर :
i) समाजातील व्यक्ती-व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात.
ii) तसेच एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते. अशा वेळी समाजात संघर्ष निर्माण होऊ शकतात.
3) सहकार्यामुळे कोणते फायदे होतात ?
उत्तर :
i) सहकार्यामुळे आपला विकास होतो. दैनंदिन जीवनही सुरळीत होईल.
ii) तसेच समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते, समाजातील सर्वाना सामावून घेता येते. सहकार्यामुळे हे फायदे होतात.
4) तुमच्या समोर दोन मुले भांडत आहेत, तर तुम्ही काय कराल ?
उत्तर :
जर दोन मुले भांडत आहेत, तर प्रथम त्यांच्या भांडणाचे कारण विचारू. त्यानंतर सामजस्याने त्या दोघांचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करू. भांडण नाही मिटले तर त्यासाठी मोठ्या व्यक्तींची मदत घेऊ.
5) तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात तुम्ही कोणकोणती कार्ये कराल ?
उत्तर :
मी शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहे. मी पुढील कार्य करील.
i) शाळेचा परिसर व वर्गखोलीची स्वच्छता करून घेईल.
ii) शाळेच्या ग्रंथालयात आवश्यक सगळी पुस्तके आहेत की नाही याचे अवलोकन करील.
iii) शाळेत खेळायचे सर्व साहित्य आहे की नाही याची नोंद करेल.
iv) शाळेतील गरजू विद्यार्थ्यासाठी शाळेत नि:शुल्क प्रवेश करण्याची तरतूद करील.
v) गरजू विद्यार्थ्याना मोफत गणवेश, वह्या, पुस्तके, लेखन साहित्य यांची सोय करून देईल.
vi) शाळेत लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी बससेवा पुरविण्याची सोय करण्यास सांगेन.
vii) शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविण्याचे कार्यक्रम हाती घेईल.
viii) शाळेत मुलांसाठी पोषक आहाराची व्यवस्था करील.
ix) शाळेतील शिक्षणप्रणाली कडे लक्ष देईल. जर त्यात काही सुधारणा करायची गरज असल्यास ती करून घेईल.
x) शाळेतील सर्व नियमांचे पालन करणे सर्वाना बंधनकारक करील.
xi) शाळेत मुलांना काही आकस्मीत अपघात झाल्यास प्राथमिक उपचाराची योग्य सोय करील.