गोमू माहेरला जाते स्वाध्याय

गोमू माहेरला जाते स्वाध्याय

गोमू माहेरला जाते स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी

प्रश्न. 1. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा.

कवितेचे कवीकवितेचा विषयकवितेतील पात्रकवितेत वर्णन केलेल्या गोष्टी

उत्तर :

कवितेचे कवीकवितेचा विषयकवितेतील पात्रकवितेत वर्णन केलेल्या गोष्टी
ग. दि. माडगूळकरगोमू माहेरला जातेगोमू, तिचा नवरा, नाखवाखाडी, झडी, फुलांचा ताटवा, कोकणची माणसे, माड, वारा

प्रश्न. 2. एका शब्दात उत्तरे लिहा.

अ) गोमूचे माहेर –

उत्तर :

गोमूचे माहेर – कोकण

आ) कोकणची माणसं –

उत्तर :

कोकणची माणसं – साधी भोळी

प्रश्न. 3. खालील आकृती पूर्ण करा.

अ)

उत्तर :

आ) खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

अ) काळजात त्यांच्या भरली शहाळी

उत्तर :

काळजात त्यांच्या भरली शहाळी → कोकणातल्या माणसांचं ह्रदय शहाळीप्रमाणे मधुर असते.

आ) झणी धरणीला गलबत टेकवा

उत्तर :

झणी धरणीला गलबत टेकवा → गलबत जमिनीला लवकर लागावे म्हणून गलबताचा वेग वाढवा.

प्रश्न. 4. कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर :

गलबताच्या शिडात वारे शिरले तरच गलबत चालते. म्हणून कवी वाऱ्याला विनंती करतात की तू अवखळपणा आणि तुझ्या साऱ्या खोड्या सोडून दे व शिडात शिडात शीर.

खेळूया शब्दांशी

अ) कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.

1) नाखवा –

उत्तर :

नाखवा – दाखवा

2) खाडी –

उत्तर :

झाडी

3) भोळी –

उत्तर :

भोळी – शहाळी

4) साऱ्या –

उत्तर :

साऱ्या – वाऱ्या

आ) खालील शब्दांचे तुम्हांला माहीत असणारे अर्थ लिहा.

1) शीड –

उत्तर :

वारा बांधण्यासाठी गलबातावरील कापडाचे साधन

2) माड –

उत्तर :

नारळाप्रमाणे उंच असलेले एक झाड

3) खाडी –

उत्तर :

समुद्राचे पाणी भूमीत शिरते तो भाग

4) शहाळी –

उत्तर :

गोड पाणी असलेली नारळाची एक जात

5) झणी –

उत्तर :

ताबडतोब, त्वरेने

6) गलबत –

उत्तर :

होडी, नाव

विचार करा. सांगा.

तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही तुमच्या गावातील कोणकोणती स्थळे दाखवाल, त्या स्थळांचे थोडक्यात वर्णन करा.

उत्तर :

अंबाझरी तलाव – हा तलाव फार मोठा. नागनदीचा उगम याच तलावातून झाला. संध्याकाळी तेथील सूर्यास्त पाहायला अनेक लोक येत असतात. तेथे अंबाझरी बगिचा आहे. कॉंग्रेसच्या अधिवेशनाला आले असताना पं. नेहरू याच बागेतील खास बांधलेल्या बंगल्यात उतरले होते.

महाराजबाग – ही प्राणिसंग्रहालय आहे. यात सिंह, वाघ, हत्ती, अस्वले इ. विविध प्राणी पाहायला मिळतात. प्रेक्षकांना बसण्यासाठी गवताचे हिरवेगार गालिचे आहेत.

अजबघर – हे ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय आहे. यात ऐतिहासिक नाणी, हत्यारे अशा अनेक वस्तू पाहायला मिळतात. शिवाय काही वस्तूंतून प्राचीन संस्कृतीचेही दर्शन घडते.

माहिती मिळवूया

आपल्या देशातील कोणकोणत्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे, ट्या राज्यांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा.

उत्तर :

आपल्या भारत देशाला तीनही बाजूने समुद्र किनारा लाभला आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे.

समुद्रकिनारा लाभलेले राज्य

i) गुजरात

ii) महाराष्ट्र

iii) गोवा

iv) कर्नाटक

v) केरळ

vi) तमिळनाडू

vii) आंध्रप्रदेश

viii) उडिसा

ix) पश्चिम बंगाल

आपल्या राज्यातील कोणकोणत्या शहरांना, गावांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या गावांच्या शहरांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा.

उत्तर :

आपल्या महाराष्ट्र राज्यातील समुद्रकिनारा लाभलेल्या शहरांची व गावाची नावे पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्याला पश्चिमेकडील अरबी समुद्र लाभला आहे.

i) पालघर – केळवे – माहीम

ii) मुंबई शहर

iii) मुंबई उपनगर

iv) रायगड – अलिबाग, जंजिरा, श्रीवर्धन

v) रत्नागिरी – हर्णे, गुहाघर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी

vi) सिंधुदुर्ग – विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्ग

खालील उभयान्वयी अव्ययांचा वाक्यांत उपयोग करा.

उत्तर :

i) की – गुरुजी म्हणाले की खोटं बोलू नये.

ii) म्हणून – पाऊल आला म्हणून शेतकऱ्यांना आनंद झाला.

iii) पण – तू खेळायला जा पण लवकर घरी ये.

iv) परंतु – ती परत आली खरी परंतु तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता.

v) अथवा – हा प्रश्न सोडवा अथवा तो सोडवा.

vi) म्हणजे – तू नागपूरला ये म्हणजे आपण खूप मजा करू.

खालील वाक्यांतील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.

अ) सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली.

उत्तर :

सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली.

आ) आईने काटकसर केली; पण काही शिल्लक उरले नाही.

उत्तर :

आईने काटकसर केली; पण काही शिल्लक उरले नाही.

इ) ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे.

उत्तर :

ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे.

Leave a Comment