पेशीविज्ञान व जैव तंत्रज्ञान स्वाध्याय इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-2

1. खालील रिकाम्या जागा भरून विधाने पूर्ण लिहा.
अ. कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने ……………… साठी केला जातो.
उत्तर :
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने पशुसंवर्धना साठी केला जातो.
आ. ……………….. ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतीकारी घटना होय.
उत्तर :
मूलपेशी संशोधन ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतीकारी घटना होय.
इ. इन्शुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ……………… होय.
उत्तर :
इन्शुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे मधुमेह होय.
ई. ……………….. या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादनवाढीकरिता प्रोत्साहन दिले आहे.
उत्तर :
मत्स्यशेती या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादनवाढीकरिता प्रोत्साहन दिले आहे.
2. जोड्या जुळवा.
| अ. इंटरफेरॉन | 1. मधुमेह |
| आ. फॅक्टर | 2. ठेंगूपणा |
| इ. सोमॅटोस्टॅटीन | 3. विषाणूसंक्रमण |
| ई. इंटरल्युकीन | 4. कॅन्सर |
| 5. हिमोफिलीया |
उत्तर :
| अ. इंटरफेरॉन | 3. विषाणूसंक्रमण |
| आ. फॅक्टर | 5. हिमोफिलीया |
| इ. सोमॅटोस्टॅटीन | 2. ठेंगूपणा |
| ई. इंटरल्युकीन | 4. कॅन्सर |
3. खालील चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा.
अ. गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकांमध्येच बदल घडवून आणला जातो.
उत्तर :
गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी किंवा ऊतीमध्ये बदल घडवून आणला जातो.
आ. बॅसिलस थुरींजाएंसिस या जीवाणूमधील जनुक काढून ते सोयाबीनच्या बियाण्यामध्ये टाकतात.
उत्तर :
बॅसिलस थुरींजाएंसिस या जीवाणूमधील जनुक काढून ते कापसाच्या जनुकाला टाकतात.
4. टिपा लिहा.
अ. जैवतंत्रज्ञान : व्यवहारिक उपयोग
उत्तर :
i) पीक जैवतंत्रज्ञान : कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवण्यासाठी केला जातो.
ii) संकरित बियाणे : दोन वेगवेगळ्या पिकांची जनुके एकत्र करून विविध पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या जातात. फळांसाठी हे मोठ्या प्रमाणावर उपयोगी आहे.
iii) जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके : बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. या पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या, रोगप्रतिकारक, क्षमता प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जातात.
iv) बीटी कापूस : बॅसिलस थुरीनजाएनसीस या जीवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून तो कापसाच्या जनुकाला जोडला. यामुळे बोंडअळीला घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडामध्ये तयार होऊ लागले. बोंड अळीने कापसाची पाने खाल्ली तर हे विष तिच्या शरीरातील अन्ननलिका उद्ध्वस्त करून टाकते व त्यामुळे अळी मरते.
v) बीटी वांगे : बॅसिलस थुरीनजाएनसीस या जीवाणूंपासून मिळवलेले जनुक वापरून बी. टी. वांगे तयार केले जाते . बी. टी. कापसाप्रमाणेच हे वांग्याचे सुधारित वाण कीडीचा नाश करते.
vi) गोल्डन राईस : तांदळाच्या या जातीमध्ये जीवनसत्त्व अ निर्माण करणारे जनुक टाकण्यात आले. 2005 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या गोल्डन राईस-2 मध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटिन सापडते.
vii) तणनाशकरोधी वनस्पती : तणांमुळे मुख्य पिकांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. तणांचा नाश करण्यासाठी तणनाशकांचा वापर केल्यास त्याचा विपरित परिणाम हा मुख्य पिकांवर होतो. त्यामुळे तणनाशकरोधी वनस्पती निर्माण करण्यात येत आहेत. यातून बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे तणांचे नियंत्रण सहज शक्य आहे.
viii) जैविक खते : रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर केल्यास पिकांची नायट्रोजन स्थिरीकरणाची तसेच फॉस्फेट विरघळवण्याची क्षमत वाढते. यामध्ये प्रामुख्याने ऱ्हायझोबिअम, अझोटोबॅक्टरम, नोस्टॉक, अँनाबीना या जीवाणूंचा तसेच अझोला या वनस्पतींचा वापर करण्यात येतो.
आ. औषधी वनस्पतींचे महत्त्व
उत्तर :
i) आयुर्वेदात नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्तीचे प्रयत्न केले जातात. भारताला आयुर्वेदाचा फार मोठा वारसा आहे.
ii) यासाठी लागणाऱ्या औषधी वनस्पती पूर्वी जंगलांतून गोळा केल्या जात असत.
iii) महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची लागवड आता मोठ्या प्रमाणावर केली जाते.
iv) जगभरात तुळस, अडुळसा, ज्येष्ठमध अशा काही वनस्पतींचा वापर केला जातो.
v) अँलोपॅथीच्या औषधात देखील वनस्पती वापरल्या जातात.
vi) रसायनांनी तयार केलेल्या औषधांपेक्षा वनस्पतींपासून मिळवलेल्या औषधांचे दुष्परिणाम कमी असतात. त्यामुळे अशी औषधे वापरणे कधीही हितावह असते.
5. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आलेल्या कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या जीवनात वापरता ?
उत्तर :
i) सर्वांत साध्या आणि सोप्या वस्तू म्हणजे दही-ताक या घरच्या घरी बनवलेले किण्वनाने तयार केलेले अन्नपदार्थ होय.
ii) इडली, डोसा, ढोकळा असे पदार्थ देखील किण्वन करून बनवले जातात. हे सर्वांत प्राथमिक स्वरूपाचे जैवतंत्रज्ञान आहे.
iii) अलीकडच्या काळात निरनिराळे चीज, पनीर, योगर्ट, एनर्जी ड्रिंक्स असे खाद्यपदार्थ जैवतंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले जातात.
iv) बिनबियांची द्राक्षे, पपया आणि कलिंगडे बाजारात मिळतात. त्यांचा वापर घरी केला जातो.
v) जांभळा कोबी, पिवळ्या आणि लाल भोपळी मिरच्या आणि सलॅडसाठी वापरल्या जाणाऱ्या विलायती भाज्या या जैवतंत्रज्ञानाने बनवण्यात येतात.
vi) विविध लसी, प्रतिजैविके आणि मानवी इन्सुलिन यांसारखी संप्रेरके घरोघरी वापरली जातात.
आ. कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल ?
उत्तर :
i) कीडनाशके ही एक प्रकारची रासायनिक विषे आहेत. त्याचा अनिर्बंध वापर केल्यामुळे ही रासायनिक विषे पाणी व अन्न यामार्फत अन्नजाळ्यांमध्ये पसरतात.
ii) D.D.T., मेलॅथिऑन, क्लोरोपायरिफॉस अशी कीडकनाशके जैविक विषवृद्धीने अन्नसाखळीत पसरतात. अशी कोणतीही कीडनाशके फवारणार नाही.
iii) कीडनाशक फवारणीसाठी केवळ सेंद्रिय कीडनाशके वापरू.
iv) फवारणीच्या वेळी आपले नाक, डोळे आणि त्वचा यांचे संरक्षण करू.
v) जनावरांच्या आणि लहान मुलांच्या संपर्कात कीडनाशके येणार नाहीत याची काळजी घेऊ.
vi) अतिप्रमाणातील वापर टाळू.
इ. मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत ?
उत्तर :
i) मानवी शरीर निरनिराळ्या अवयवांच्या कार्यांनुसार चालत असते.
ii) मेंदू, वृक्क, फुफ्फुसे, ह्रदय, यकृत असे काही अवयव जिवंत राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच आपली ज्ञानेंद्रिये – विशेषत: डोळे हे बहुमोल आहेत.
iii) या अवयवांचे कार्य बिघडले, तर आरोग्याला धोका निर्माण होतो. मेंदूसारख्या अवयवात तर पुनर्जननाची क्षमता देखील नसते.
iv) काही अवयवांची डागडुजी शस्त्रक्रियेने करता येते. परंतु अशा अवयवांची कार्यक्षमता कमी झाली, तर जगणे असह्य होते. म्हणून अशा अवयवांना बहुमोल म्हटले जाते.
ई. फलप्रक्रिया उद्योगाचे मानवी जीवनातील महत्त्व विषद करा.
उत्तर :
i) फलप्रक्रिया उद्योग हा फळे अधिक काळासाठी साठवून ठेवण्यासाठीची प्रक्रिया करण्याचा उद्योग आहे. हा शेतीपूरक व्यवसाय आहे तसेच यासाठी मोठे कारखानेही असतात.
ii) फळांपासून बनविलेली अनेक प्रकारची उत्पादने आपण दैनंदिन जीवनात वापरत आहोत. उदा. चॉकलेट, सरबते, जॅम, जेली इत्यादी या सर्व वस्तू फळांवर प्रक्रिया करून मिळविल्या जातात.
iii) प्रक्रिया केल्यामुळे फळे बिगर हंगामात उपलब्ध होतात. त्यामुळे त्यांची वर्षभर चव चाखता येते.
iv) ज्या भागात फळे पिकत नाहीत अशा ठिकाणी त्या उपलब्ध करून देता येतात.
v) बाजारपेठेत फळांची आवक वाढून दर घसरतो. अशा स्वस्त फळांवर प्रक्रिया करून चांगली किंमत मिळविता येते.
vi) प्रक्रियायुक्त फळे निर्जंतुक केल्यामुळे खाण्यासाठी सुरक्षित असतात.
vii) आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रक्रियायुक्त डबाबंद फळे व त्यापासून तयार झालेले पदार्थ यांचा उपयोग होतो.
viii) विशिष्ट फळे ज्या देशात पिकत नाहीत, अशा ठिकाणी निर्यात करून परकीय चलन मिळविता येते.
उ. लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा.
उत्तर :
i) लसीकरण म्हणजे लस देणे. लस हे प्रतिजन असते. विशिष्ट रोगजंतूच्या अथवा रोगाच्या प्रतिकारासाठी कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक्षमता मिळावी म्हणून ही लस देण्यात येते.
ii) पूर्वीच्या काळी रोगजंतूंचा वापर करूनच लस तयार केली जात असे. ही लस रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून बनवली जाई. परंतु त्यातून काही जणांना त्या आजाराची लागण होण्याची शक्यता असे.
iii) हे होऊ नये म्हणून शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरीत्या लसी तयार केल्या. त्यांनी रोगजंतूचे जे प्रथिन प्रतिजन म्हणून काम करते. त्याचे जनुक मिळवून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेत ते प्रतिजन तयार केले.
iv) अशा प्रतिजनाचा वापर लस म्हणून केला, तर सुरक्षितरीत्या रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होते. व्यक्तींना रोगमुक्त ठेवण्यासाठी अशा लसी देणे म्हणजेच लसीकरण करणे होय.
v) प्रतिकारी प्रथिने टोचणे अतिसुरक्षित आहे. त्यामुळे अधिक क्षमतेच्या आणि तापस्थिर लसी देऊन, लसीकरणाच्या मदतीने पोलिओ, हिपॅटायटिस असे रोग दूर ठेवता येतात.
6. खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तर :

7. रिकाम्या वर्तुळात योग्य उत्तर लिहा.

उत्तर :

8. सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
अ. इन्सुलिन : मधुमेह :: इंटरल्युकीन : ……………..
उत्तर :
इन्सुलिन : मधुमेह :: इंटरल्युकीन : कॅन्सर
आ. इंटरफेराॅन : …………….. :: इरिथ्रोपॉयटीन : अँनेमिआ
उत्तर :
इंटरफेराॅन : विषाणू संक्रमण :: इरिथ्रोपॉयटीन : अँनेमिआ
इ. …………….. : ठेंगूपणा :: फॅक्टर VIII : हिमोफेलिआ
उत्तर :
सोमॅटोस्टॅटिन : ठेंगूपणा :: फॅक्टर VIII : हिमोफेलिआ
ई. श्वेक्रांती : दुग्ध उत्पादन :: नीलक्रांती : ………………
उत्तर :
श्वेक्रांती : दुग्ध उत्पादन :: नीलक्रांती : मत्स्य उत्पादन
9. जैवतंत्रज्ञान जसे उपयुक्त आहे तसेच काही प्रमाणात हानीकारकही आहे, यावर तुलनात्मक लेखन करा.
उत्तर :
i) जैवतंत्रज्ञानाने मानवजातीला अन्नधान्य विपुल प्रमाणात प्राप्त झाले. त्यामुळे या शास्त्राला उपयुक्त म्हणता येते. आरोग्य आणि औद्योगिक उत्पादनांचे अनेक प्रश्न सहज सोडवले आहेत. पूर्वीच्या काळी अकस्मात रोगराईच्या साथी पसरत. अनेक लोक त्यात मृत्युमुखी पडत. अन्नाचा तुटवडा तर नेहमीच असे. दुष्काळ आणि त्यामुळे होणारी उपासमार यांत मानवजात होरपळून निघत होती. साधारण चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी दुधाची उपलब्धता फार कमी होती. धान्योत्पादनाच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण नव्हता.
ii) पण जैवतंत्रज्ञानाचा उदयानंतर धान्य आणि इतर अन्न यांबाबत आपण खूप प्रगती केली आहे. आरोग्याचे अनेक प्रश्न आता सोपे झाले आहेत. दुर्धर मधुमेहासारख्या रोगांसाठी आता मानवी इन्सुलिनच्या साहाय्याने शर्करा-नियंत्रण करणे सोपे झाले आहे.
iii) विविध लसी तयार झाल्यामुळे रोगांच्या साथींवर नियंत्रण आलेले आहे.
iv) प्रदूषण-नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापन आणि इंधनाचे प्रश्न आता वेगळ्या पद्धतीने हाताळता येत आहेत.
v) हे असे छान चित्र असले तरी जैवतंत्रज्ञानाच्या प्रयोगात एक कृत्रिमता असते. जनुकीय बदल निसर्गाच्या विरुद्ध जाऊन केले जातात. जीवाणू-विषाणूच्या जिनोममध्ये मानवी जनुके घालून ईप्सितच साधले जाते.
vi) क्लोनिंगसारख्या तंत्राला तर नैतिक विरोध आहे. मानवी प्रजननाच्या पद्धतीत देखील जैवतंत्रज्ञानाचा वापर करून क्लोनिंग केल्यास येणाऱ्या पिढ्यांना माता असेल पण पित्याची जरुरी लागणार नाही. कृत्रिमतेने पृथ्वीवरच्या सजीवांच्या जनुकांचे मानवाने त्याच्या फायद्यासाठी फेरबदल केले तर निसर्ग-नियमात ते बसणारे नाही. त्याचे दूरगामी परिणाम भयानक असतील. त्यामुळे जैवतंत्रज्ञान हानीकारक देखील होऊ शकते.