बदलते जीवन भाग 2 इतिहास स्वाध्याय इयत्ता नववी

बदलते जीवन भाग 2 इतिहास स्वाध्याय इयत्ता नववी

१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

१) भारताने …………… च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.

अ) सुनील गावसकर

ब) कपिल देव

क) सय्यद किरमाणी

ड) संदीप पाटील

उत्तर :

भारताने कपिल देव च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.

२) जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात ………………… भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.

अ) पंजाबी

ब) फ्रेंच

क) इंग्रजी

ड) हिंदी

उत्तर :

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात इंग्रजी भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.

२. दिलेल्या सुचनेप्रमाणे कृती करा.

खालील तक्त्यातील माहितीपुढील तक्ता पूर्ण करा.

१.भारतातील महत्त्वाच्या भाषा…………..
२.ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदकप्राप्त खेळाडू…………..
३.तुम्ही पाहिलेले बालचित्रपट…………..
४.विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नावे…………..

उत्तर :

१.भारतातील महत्त्वाच्या भाषाहिंदी, आसाम, बंगाली, गुजराथी, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगु, उर्दू, कोंकणी, मणिपुरी, नेपाळी, सिंधी, इत्यादी
२.ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदकप्राप्त खेळाडूनॉर्मन प्रितचार्ड, खाशाबा जाधव, लिएंडर पेस, करनाम मल्लेश्वरीम राजवर्धन सिंघ राठौर, अभिनव बिंद्रा, सुशिल कुमार, विजेंद्रसिंग, गगन नारंग, विजय कुमार, सायना नेहवाल, मेरी कोम, योगेश्वर दत्त, पी. व्हि. सिंधू, साक्षी मलिक
३.तुम्ही पाहिलेले बालचित्रपटअंजली, मोगली, बालशिवाजी, तारे जमीन पर, फेरारी की सवारी, श्यामची आई, बाल हनुमान, बालगणेश, श्रावणबाळ
४.विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नावेIBN लोकमत, झी न्यूज, आजतक, सी. डब्लू. न्यूज. इंडिया टूडे, रिपब्लिक टीव्ही, टाईम्स नाऊ, सी. व्ही. आर. न्यूज, न्यूज इंडिया 18, इंडिया टिव्ही, तेज, दूरदर्शन न्यूज. ए. बी. पी न्यूज

३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

१) भारतात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले.

उत्तर :

कारण – i) १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आणि खेळाला देशभरात मोठी लोकप्रियता मिळाली.

ii) याच वर्षी सुनील गावसकर यांनी कसोटींमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला.

iii) १९८५ मध्ये भारताने ‘बेन्सन अँड हेजेस’ क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले. त्यामुळे भारतात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले.

२) चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे.

उत्तर :

कारण – i) चित्रपटाच्या क्षेत्रात कृष्णधवल चित्रपटांच्या नंतर रंगीत चित्रपटांचे युग आले. मनोरंजन क्षेत्रातील हिंदी चित्रपटांचे स्थान अतुलनीय आहे.

ii) हिंदी चित्रपट जागतिक चित्रपटांशी स्पर्धा करू लागले. हिंदी चित्रपट जगभर पोहचले. राजकारण, समाजकारण, उद्योग, तंत्रज्ञान यांचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये उमटू लागले.

iii) पूर्वी ३-४ तास चालणारा सिनेमा दीड तासांवर येऊ लागला.

iv) एकच पडदा आणि एकच सिनेमा १०० आठवडे चालण्याचे प्रमाण संपून एकत् चित्रपट एकाच वेळी देशा-परदेशांत हजारो चित्रपटगृहांमध्ये दिसू लागला. त्यामुळे चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे.

४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

१) भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे.

उत्तर :

i) भारतीय भाषा या आपल्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे भांडार आहेत, या भाषांची प्रत्येक बोली स्वत:च अद्वितीय आहे आणि समाजाची प्रतिनिधी आहे.

ii) भारतात हिंदी, आसामी, बंगाली, गुजराथी, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, मराठी, उडिया, पंजांबी, संस्कृत, तमिळ, तेलुगु, उर्दू, कोंकणी, मणिपुरी, नेपाळी आणि सिंधी या भाषा महत्त्वाच्या आहेत.

iii) त्या भारतीय भाषांच्या बोलीभाषासुद्धा आहेत.

iv) बोलीभाषे ऐवजी भारतात इंग्रजी भाषा लोकप्रिय होत आहे. घराघरांत इंग्रजी भाषेचे स्थान रुजत चालले आहे. तसेच शिक्षण चित्रपट सार्वजनिक व्यवहार इत्यादींपासून भारतीयांच्या जवळपास सर्वच क्षेत्रात वर्चस्व गाजवत आहे.

v) त्यामुळे स्वत:च्या बोलीभाषेचा विसर पडत चालला आहे. त्या वेळीच जपायला हव्यात अन्यथा. एक चांगला ठेवा नष्ट होईल. त्यासाठी भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे आवश्य आहे.

२) वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा.

उत्तर :

i) बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव वृत्तपत्रांवर आणि प्रसारमाध्यमांवर पडला आहे.

ii) पूर्वी वृत्तपत्रे कृष्णधवल रंगांत छापली जात होती. पुढे काळ बदलला आणि वृत्तपत्रे रंगीत झाली.

iii) पूर्वी तालुका किंवा जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांना खूप मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या पत्रांशी स्पर्धा करावी लागत आहे.

iv) वृत्तपत्रे आता अधिक सक्रीय होऊ लागली आहेत. अशा प्रकारे वृत्तपत्राचे स्वरूप बदलले आहे.

३) दूरदर्शन या माध्यमात कोणते बदलत झाले आहेत.

उत्तर :

दूरदर्शन या माध्यमात पुढील बदल झाले आहेत.

i) भारतात स्वातंत्र्योत्तर कालखंडात दूरदर्शनचे आगमन झाले. सुरुवातीला कृष्णधवल असणारे दूरदर्शन पुढे रंगीत झाले.

ii) सुरुवातीला मोजकेच कार्यक्रम आणि ठरावीक वेळ मनोरंजन असे दूरदर्शनचे स्वरूप होते. पुढे शैक्षणिक उपक्रम, वार्तापत्रे, बातम्या असे एक-एक उपक्रम वाढत गेले.

iii) १९९१ च्या इराक युद्धाचे जिवंत दृश्य वार्तांकन सीएनएन वाहिनीचे जगभर दाखवले. या टप्प्यावर भारतातील वृत्तवाहिन्यांचे विश्वच बदलून गेले.

iv) १९९८ मध्ये सॅटेलाइट टेलिव्हिजन एशिया रिजन हा खाजगी उद्योगसमूह भारतात आला. यामुळे भारतातील सुरुवातीच्या काळातील नीरस, एकसुरी, प्रचारकी स्वरुपाच्या बातम्यांचे विश्वच बदलून गेले.

v) भाषा, सादरीकरणाचे तंत्र, तंत्रसज्ज स्टुडिओ आणि आउटडोअर ब्रॉडकास्टिंग व्हॅन्सचा वापर यांमुळे या वाहिन्यांनी विस्तार घडवून आणला.

Leave a Comment