नैसर्गिक प्रदेश स्वाध्याय

नैसर्गिक प्रदेश स्वाध्याय इयत्ता सातवी भूगोल

प्रश्न. 1. खालील विधाने लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा.

1) पश्चिम युरोपीय लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात.

उत्तर :

हे विधान चूक आहे.

दुरुस्त विधान – पश्चिम युरोपीय प्रदेशांतील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही असतात.

2) प्रेअरी प्रदेशाला ‘जगातील गव्हाचे कोठार’ असे म्हणतात.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

3) भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते.

उत्तर :

हे विधान चूक आहे.

दुरुस्त विधान – भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.

4) उष्ण वाळवंटी प्रदेशात ‘उंट’ हा महत्त्वाचा प्राणी आहे, कारण तो अन्नपाण्याशिवाय दीर्घकाळ राहतो, तसेच वाहतुकीसाठी उपयोगी आहे.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

5) वाघ, सिंहासारखे मांसभक्षक प्राणी विषुववृत्तीय प्रदेशांत जास्त आढळतात.

उत्तर :

हे विधान चूक आहे.

दुरुस्त विधान – वाघ, सिंहासारखे मांसभक्षक प्राणी मोसमी प्रदेशात व गवताळ प्रदेशात जास्त आढळतात.

प्रश्न. 2. भौगोलिक कारणे द्या.

1) मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेतीव्यवसाय करतात.

उत्तर :

कारण – i) शेतीस अनुकूल असे हवामान या प्रदेशात आहे.

ii) नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठरावीक ऋतूत पाऊस पडतो.

iii) स्वच्छ सूर्यप्रकाश व शेतीस योग्य मृदा या प्रदेशात आहे. तसेच हा प्रदेश लहान लहान असंख्य खेड्यांनी बनलेला आहे त्यामुळे शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. म्हणून मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात.

2) विषुववृत्तीय वनातील वृक्ष उंच वाढतात.

उत्तर :

कारण – i) वनस्पतीच्या वाढीला पोषक असा घडणारा पाऊस (सरासरी 2000 ते 5000 मिमी) विषुववृत्तीय भागात पडतो.

ii) या प्रदेशात सूर्याची लंबरूप किरणे पडतात त्यामुळे या वृक्षांना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळतो.

iii) जास्त उष्णतात व वर्षभर पाऊस तसेच उष्ण व दमट हवामान या सर्व अनुकूल घटकांमुळे विषुववृत्तीय वनातील वृक्ष उंच वाढतात.

3) टुंड्रॉ प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते.

उत्तर :

कारण – i) टुंड्रॉ प्रदेशात सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी असते.

ii) जमीन दीर्घकाळ गोठलेल्या स्थितीत असते.

iii) उन्हाळ्यात काही आठवड्यांच्या कालावधीत येथे वनस्पती जीवन फुलते. तसेच अल्पकाळ उन्हाळा व दीर्घकाळ हिवाळा असा ऋतू असतो.

iv) हवामानाची ही स्थिती वनस्पतींच्या वाढीला पोषक नसते. म्हणून टुंड्रॉ प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते.

प्रश्न. 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) तैगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षवृत्तांदरम्यान आहे ?

उत्तर :

तैगा प्रदेशाचा विस्तार सुमारे 55° उत्तर ते 65° उत्तर या अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे.

2) सुदान प्रदेशातील कोणतेही तीन तृणभक्षक प्राणी सांगा. त्यांच्या स्वसंरक्षणासाठी निसर्गाने कोणती व्यवस्था केली आहे ?

उत्तर :

अ) सुदान प्रदेशातील तीन तृणभक्षक प्राणी : जिराफ, झेब्रा, कांगारु

ब) स्वसंरक्षणासाठी निसर्गाने केलेली व्यवस्था : सुदान प्रदेशातील तृणभक्षक प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिले आहेत. मांसभक्षक प्राण्यांनी शिकारीसाठी हल्ला केला असता, तृणभक्षक प्राण्यांना त्यांच्या चपळ पायांनी मांसभक्षक प्राण्यांपासून अत्यंत वेगात दूर पळणे शक्य होते व त्यामुळे त्यांना स्वत:च्या जीवाचे रक्षण करता येते.

3) मोसमी प्रदेशांखाली दिलेली वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तर :

मोसमी प्रदेशांखाली दिलेली महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

i) हवामानाशी संबंधित वैशिष्ट्ये : मोसमी प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे २७° से. ते ३२° से असते. हिवाळ्यातील तापमान सुमारे १५° से. ते २४° से असते. मोसमी प्रदेशात नेर्ऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठरायीक ऋतूत पाऊस पडतो.

ii) नैसर्गिक वनस्पतींशी संबंधित वैशिष्ट्ये : मोसमी प्रदेशात पानझडी व निमसदाहरित वने आढळतात. या प्रदेशात पावसाच्या वितरणानुसार वनस्पती प्रकार दिसून येतात.

iii) मानवी जीवनाशी संबंधित वैशिष्ट्ये : मोसमी प्रदेशात अनेक लहान लहान असंख्य खेडी आढळतात. या प्रदेशातील लोकांच्या अन्नात व पोशाखात विविधता आढळते. या प्रदेशातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.

प्रश्न. 4. जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील नैसर्गिक प्रदेश दाखवा. सूची तयार करा.

1) कोलोरॅडो वाळवंट

2) डाऊन्स गवताळ प्रदेश

3) भूमध्य सागरी हवामान

4) ब्रिटिश कोलंबिया

5) ग्रीनलँडचा लोकवस्ती असलेला भाग

उत्तर :

Leave a Comment