दुखणं बोटभर स्वाध्याय

दुखणं बोटभर स्वाध्याय

दुखणं बोटभर स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी

प्रश्न. 1. चार – पाच वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली ? दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले ?

उत्तर :

कुठला तरी कडक गूळ बत्त्यानं ठेचताना आणि त्याचवेळी गप्पा करत असताना एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वर्मी बसला. तो घाव वर्मी बसला याचं मर्मज्ञान तिला उशिराच झालं. घाव बसताना वेदना होऊन तिनं बोट तोंडात घातलं. पण ‘तू डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं ?’ म्हणून इतरांनी आश्चर्यानं बोटं तोंडात घातली. वायफळ चर्चा सुरू झाल्या. यामुळं दुखऱ्या बोटासकट हात कपाळाचा लावायची वेळ तिच्यावर आली.

आ) ठसठसणाऱ्या बोटाचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे ?

उत्तर :

सुरुवातीला बोट ठसठसायला लागल्यावर तिला ‘मलम मलिए काम पे चलिए’ या जाहिरातीची आठवण आली. तिने बोटाला मलम लावले. पण ते कामासाठी वळले नाही. कारण त्याला राग आला असणार. म्हणून ते मानी माणसाप्रमाणे ताठले. मग तिने बोट गरम पाण्याने शेकून पाहिले. पण त्यानं ‘मोडेन पण वाकणार नाही’ असा मराठी बाणा दाखवला. ते रागाने फुगून बसले. म्हणून तिनं तेलमालीश केलं. पण ‘वो टस से मस नहीं हुआ |’ या शब्दांत लेखिकेने ठसठसणाऱ्या बोटाचे वर्णन केले आहे.

इ) बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला ?

उत्तर :

बोटाला लागल्यामुळे डॉक्टरांनी स्ट्रॅपिंग केले. म्हणजे आजूबाजूची दोन बोटं ताणून बांधून तो हात तिच्या गळ्यात अडकवला. त्यामुळे तिला उजव्या हाताने काम करणे अशक्य झाले. ती कामावर रजा टाकून घरी बसली. डाव्या हातानं कामं सुरू केली. पण शेवटी डावा हात डावाच निघाला. विंचरणं, पकडणं, ढवळणं, शिवणं, काहीही नीट जमेना. ती आपली नुसतीच कळवळायची. बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर असा परिणाम झाला.

प्रश्न. 2. का ते लिहा.

अ) लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली.

उत्तर :

बोटावर तीन महिने चाललेला खर्च, वेळ, वायफळ चर्चा यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली.

आ) लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली.

उत्तर :

लेखिकेने बोटाला मलम लावले, बोट गरम पाण्याने शेकले, तेलमालीश केले. पण काहीच उपयोग झाला नाही. म्हणून भाच्याचा उपदेश ऐकून लेखिका डॉक्टरकडे जाण्यास तयार झाली.

इ) दवाखान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात गोळा आला.

उत्तर :

दवाखान्यात खूप गर्दी होती. कुणाचा पाय प्लास्टरमध्ये, कुणी कुबड्याधारी, कुणाचे हात स्वतःच्या गळ्यात असे एकएकजण अलौकिक अवस्थेत लेखिकेने पाहिले. म्हणून तिच्या पोटात गोळा आला.

ई) दवाखान्यातून लेखिका जड अंत:करणाने घरी परतली.

उत्तर :

लेखिकेच्या बोटाचे डॉक्टरांनी स्ट्रॅपिंग केले. म्हणजे दुखापत झालेल्या बोटासोबत आजूबाजूची दोन बोटंही ताणून बांधून वर हातही गळ्यात अडकवला. त्यामुळे जड हाताने आणि पर्स हलकी झाल्यामुळे लेखिका जड अंत:करणाने घरी परतली.

उ) लेखिकेला आता बोटाचे महत्त्व समजले आहे.

उत्तर :

लेखिकेच्या बोटाचे दुखणे हत्तीच्या पावलाने आले आणि मुंगीच्या पावलाने हळूहळू कमी होऊ लागले. पण अजूनही ती बोटं मोडू शकत नाही. राग आला तरी मूठ त्वेषानं आवळू शकत नाही. बोटं आपला हात दाखवत राहतेच. म्हणून आपल्याकडे ‘प्रभाते करदर्शनम्’ करण्याची प्रथा का पडली असावी, हे तिला समजून चुकले आहे आणि आता बोटाचे महत्त्वही समजले आहे.

प्रश्न. 3. तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली, तर तुम्ही त्याला कशी मदत कराल ?

उत्तर :

वर्गमित्राला झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची असेल तर त्याला दवाखान्यात नेण्यास मदत करू. दुखापत गंभीर स्वरूपाची नसेल तर त्याला एकटे न राहू देता सतत विनोद करून हसवत राहू की जेणे करून त्याला वेदनांचे विस्मरण होईल.

प्रश्न. 4. पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत आलेल्या घटना क्रमवार लिहा.

उत्तर :

बोटाला दुखापत झाल्यावर लेखिकेने मलम लावले. पण त्यामुळे फायदा न झाल्याने ते गरम पाण्याने शेकले. त्याचाही उपयोग न झाल्याने तेलमालीश केले. त्याचाही परिणाम न झाल्याने ती दवाखान्यात गेली. डॉक्टरांनी स्ट्रॅपिंग केले. त्यामुळे कामावर रजा टाकून घरी बसली. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या खाल्या. चेंडू वळण्याचा व्यायाम केला. हळूहळू बोट बरे होत गेले आणि रजा संपवून ती कामावर गेली. बोटाला दुखापत होण्यापासून तो बोट बरे होईपर्यंत अशा घटना क्रमवार घडल्या.

प्रश्न. 5. दुखापत झालेले बोट तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून दहा-बारा ओळी लिहा.

उत्तर :

दुखापत झालेले बोट माझ्याशी बोलू लागले तर ते म्हणेल, “मला तुम्ही क्षुल्लक समजता. बोटभर हा शब्द तुम्ही क्षुल्लक या अर्थाने वापरता. म्हणून आम्ही क्षुल्लक नाही हे मला दाखवून द्यायचे. मला घाव लागला आणि मी चिडलो. लेखिकेनं मला मलम लावलं. माणसांची ही रीतच आहे की दुसऱ्याला क्षुल्लक समजून आधी घाव घालयचे आणि ते स्वतःच्याच अंगाशी आल्यावर त्यावर मलमपट्टी करायची. माणसाला हा स्वभाव मी जाणून होतो. म्हणून त्या मलमाचा मी माझ्यावर काहीच परिणाम होऊ दिला नाही. मी मानी स्वभावाचा आहे. मग तिनं मला गरम पाण्यानं शेकलं. पण मी ‘मोडेन पण वाकणार नाही’ या बाणेदार वृत्तीचा असल्यामुळे आणखी फुगलो, आणखी सुजलो. मग तिनं तेलमालीश करून मला मस्का लावला. लेकिन मै टस से मस नही हुआ | पुढे ती दवाखान्यात काय गेली, पर्स काय रिकामी केली, कामावर रजा टाकून घरी काय बसली. तशी तिला अद्दल घडवल्यावरच पुन्हा पूर्ववत झालो.

प्रश्न. 6. तुम्हांला ठेच लागून जखम झाली तर……. काय कराल ते लिहा.

उत्तर :

आम्हांला ठेच लागली तर आम्ही जोराने ओरडून सांगू, ‘माझ्या मागून येणाऱ्यांनो शहाणे व्हा. या दगडानं ठेच लागते.’ पण काही लोक ठेच लागूनही शहाणे होत नाहीत, हेही मला माहीत आहे. म्हणून मागून येणाऱ्याला मी सांगेन, “ह्या दगडानं ठेच लागते. हा दगडाच उचलून रस्त्यावरून बाजूला फेका.’ मग मी लंगडत लंगडत घरी जाईन. हॉस्पिटलमध्ये जाणार नाही. घरी आईच माझ्या पायाला काहीतरी लावून देईल. तिला असे बरेच उपचार ठाऊक आहेत. नंतर हळूहळू बरा होईल. चालताना नीट पाहून चालावे, हा धडा मी यापासून शिकेन आणि तसा वागेन.

खेळूया शब्दांशी

अ) खालील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा.

अ) वहिनी –

उत्तर :

वहिनी – भावजयी

आ) कथा –

उत्तर :

कथा – कहाणी

इ) आघात –

उत्तर :

आघात – घाव

ई) ललाट –

उत्तर :

ललाट – कपाळ

उ) त्रास –

उत्तर :

त्रास – हैराण

ऊ) सकाळ –

उत्तर :

सकाळ – प्रभात

ए) नवल –

उत्तर :

नवल – आश्चर्य

ऐ) तोरा –

उत्तर :

तोरा – ताठा

ओ) हात –

उत्तर :

हात – कर

आ) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

अ) गरम X

उत्तर :

गरम X थंड

आ) उजवा X

उत्तर :

उजवा X डावा

इ) घट्ट X

उत्तर :

घट्ट X सैल

ई) दुर्लक्ष X

उत्तर :

दुर्लक्ष Xअवधान

इ) वाक्यांत उपयोग करा.

अ) वायफळ चर्चा –

उत्तर :

दिपाला मोलकरणीशी वायफळ चर्चा करण्यातच मजा वाटते.

आ) ठसठसणे –

उत्तर :

ठेच लागलेले माझे बोट रात्रभर ठसठसत होते.

इ) बाळबोध –

उत्तर :

मुलांच्या कविता साधारणपणे बाळबोध स्वरूपाच्या असतात.

ई) जड अंत:करण –

उत्तर :

रामला भडाग्नी दिव्यावर आम्ही जड अंत:करणाने निघालो.

उ) बट्ट्याबोळ –

उत्तर :

अचानक पाऊस आल्यामुळे कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ झाला.

ऊ) हत्तीच्या पावलांनी येणे –

उत्तर :

वेदना हत्तींच्या पावलांनी येतात.

ए) मुंगीच्या पावलांनी जाणे –

उत्तर :

बहुधा आजार मुंगीच्या पावलांनी जातो.

ऐ) जायबंदी –

उत्तर :

युद्धात अनेक सैनिक जायबंदी होतात.

ई) ‘हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड’ यासारखे यमक जुळवून खालील वाक्ये लिहा.

अ) त्याचा खिसा गरम, …………….

उत्तर :

त्याचा खिसा गरम, म्हणून सारे नरम.

आ) मोडेन पण वाकणार नाही, …………….

उत्तर :

मोडेन पण वाकणार नाही, मरेन पण पळणार नाही.

इ) बोटभर दुखणं, ………………..

उत्तर :

बोटभर दुखणं, हातभर सुई खुपसणं

ई) मनावरचा उतरला ताण, ………….

उत्तर :

मनावरचा उतरला ताण, आली चांगली जाण.

उ) ‘हाडबिड’ यासारखे अवयवांवर आधारित जोडशब्द लिहा.

उत्तर :

डोकेबिके, मांड्याबिंड्या, डोळेबिळे, कानबिन, हातबित, खांदेबिंदे

ऊ) गप्प, हुप्प, टम्म यांसारखी जोडाक्षरे लिहा.

उत्तर :

घप्प, थप्प, दत्त, धप्प, सुन्न, भिन्न, फुस्स, हट्ट

ए) आकृतीत दिल्याप्रमाणे पुढे दिलेल्या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा.

अ) मात्र

आ) बत्ता

इ) पळ

ई) गर्दी

उ) साडी

उत्तर :

ऐ) ‘बोट’ याप्रमाणे ‘हात’ व ‘पोट’ यांवर आधारित वाक्प्रचार व म्हणी लिहा.

उत्तर :

ओ) हात व हस्त हे एकच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दांत हात लपलेले आहेत. ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या.

हातोडा, हातकंकण, हातकडी, हस्तपेक्ष, हस्तकला, हातमोजे, हस्तरेषा, हस्ताक्षर, हातखंडा, हस्तलिखित, हस्तांदोलन, हस्तगत.

उत्तर :

हात – हातोडा – ठोकण्याचे एक अवजार, हातकंकण – हातात घालावयाचे कंकण, हातकडी – शृंखला, हातमोजे – हातात घालावयाचे मोजे, हस्तकला – हाताने निर्मिलेली कला, हातखंडा – नैपुण्य

हस्त – हस्तरेषा – हातावरील रेषा, हस्ताक्षर – हाताने लिहिलेले अक्षर, हस्तलिखित – हाताने लिहिलेले, हस्तांदोलन – हात मिळवून हलवणे, हस्तगत – मिळवणे, हस्तक्षेप – मध्ये लुडबूड

शोध घेऊया

अ) या पाठातील विनोदी वाक्ये शोधून लिहा.

उत्तर :

i) आता पोटात गेलेल्या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट हे कसं काय समजत असावं.

ii) कळ लागल्यामुळे आणि बोटं वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळवळायची.

iii) आणखी थोड्या गोळ्यांची फैर झडली.

आ) पाठातील बोट या शब्दासाठी आलेली विशेषणे खालील आकृतीत लिहा.

उत्तर :

इ) हत्तीच्या पावलांनी येणे, मुंगीच्या पावलांनी जाणे यांसारख्या म्हणी शोधा.

उत्तर :

i) चोरपावलांनी येणे, शिरजोर होऊन जाणे.

ii) माहेरी आली चालत चालत, सासरी गेली वाजतगाजत.

पुढील वाक्यांतील क्रियापदे समर्पक की अकर्मक ते ओळखा व रिकाम्या जागेत लिहा.

1) आई भाकरी करते.

उत्तर :

सकर्मक

2) गणेश रस्त्यात पडला.

उत्तर :

अकर्मक

3) उद्या दिवाळी आहे.

उत्तर :

सकर्मक

4) अनुराधा पत्र लिहिते.

उत्तर :

सकर्मक

5) सुरेखाचे डोके दुखते.

उत्तर :

सकर्मक

6) गाई झाडाखाली बसल्या.

उत्तर :

अकर्मक

Leave a Comment