थोडं आ भारनियमन करूया स्वाध्याय
थोडं आ भारनियमन करूया स्वाध्याय इयत्ता नववी मराठी
प्रश्न. 1. काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा.
अ) आदर मनात तुडुंब भरून असल्यास …………….
उत्तर :
आदर मनात तुडुंब भरून असल्यास तो कृतीत सहजा सहजी उतरतो.
आ) खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास…………….
उत्तर :
खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास उभयपक्षी अवघडलेपणा येतो.
इ) मित्र – मैत्रिणीने आभार मानल्यास……………….
उत्तर :
मित्र – मैत्रिणीने आभार मानल्यास प्रत्युत्तर म्हणून आपल्या पाठीत एक सणसणीत धपका मिळतो.
ई) लेखकाच्या मते ‘आ’ भारनियमन केल्यास …………
उत्तर :
लेखकाच्या मते ‘आ’ भारनियमन केल्यास काही सुधारणा करता आली तर बघू.
प्रश्न. 2. पाठातील उदाहरणे शोधा.
शब्दांशिवाय मानलेले आभार | स्पर्शाने | कटाक्षाने |
उत्तर :
शब्दांशिवाय मानलेले आभार | स्पर्शाने | कटाक्षाने |
शब्दांशिवाय मानलेले आभार | i) ऑपरेशनच्या गुंगीमधून नुकता बाहेर येणारा रुग्ण डॉक्टरांचा हात धरतो. ii) परीक्षेत भलामोठा पराक्रम गाजवून आलेला विद्यार्थी गुरूंच्या पाया पडतो. तेव्हा ते त्याच्या पाठीवर थरथरत्या हाताने थोपटल्यासारखे करतात. | i) खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांशी आभर मानतात उभयपक्षी अवघडलेपणा येतो. ii) एखादा कटाक्ष हाच आभराचं काम करून जातो. |
प्रश्न. 3. चूक की बरोबर ते ओळखा.
अ) आभार आणि अभिनंदन या शब्दांत माणसं अनेकदा गल्लत करतात.
उत्तर :
बरोबर
आ) भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते.
उत्तर :
चूक
इ) मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो.
उत्तर :
बरोबर
ई) आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे.
उत्तर :
बरोबर
प्रश्न. 4. कारणे लिहा.
उत्तर :
प्रश्न. 5. पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये शोधा.
उत्तर :
i) तसे आमचे जुने आकाशवाणीवालेही बऱ्यांपैकी आभारबाज होतेच.
ii) सूत्र संचालकांना नटवणाऱ्याचे आभार नटल्यामुळे ते सुंदरच दिसत होते. असं मानणाऱ्यांचे आभार.
iii) शस्त्रक्रियेची दाबून फी घेणाऱ्या आपल्या पोटातला हवा तोच (म्हणजे खरातर, नको तो) अवयव कापून काढला आणि वर चाकू, सूरी, कात्री खुणेसाठी आपल्या पोटात मागे ठेवली नाही तर त्याच आठवणीने आभार मानायला नकोत ?
iv) प्लंबर, इलेक्ट्रिशियन ही मंडळी सांगितलेल्या वेळीच घरी कामाला आली आणि त्यांनी जुनं काम करताना नवीन काम निर्माण करून ठेवलं नाही, तर त्याबद्दल त्यांची आरती ओवाळायला नको ?
v) इस्त्रीवाल्याने दिलेल्या तारखेला कपडे दिले, तर त्यांना घसघशीत पुष्पहार घालायला नको ? इ.
प्रश्न. 6. खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा.
1) कॅप्शन –
उत्तर :
कॅप्शन – शीर्षक
2) टेन्शन –
उत्तर :
टेन्शन – ताण
3) आर्किटेक्ट –
उत्तर :
आर्किटेक्ट – वास्तुविद्याविशारद
4) ऑपरेशन –
उत्तर:
ऑपरेशन – शस्त्रक्रिया
प्रश्न. 7. खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
1) सुसंस्कृतपणाचा कडेलोट
उत्तर :
सुसंस्कृतपणाचा अगदी शेवटचा उच्चांक
2) घाऊक आभार
उत्तर :
एकदमच सर्वाचे सर्व गोष्टीबद्दल आभार
प्रश्न. 8. स्वमत
अ) ‘आभार मानणे’, या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा.
उत्तर :
अगदी क्षुल्लक गोष्टीकरिता ऊठसूठ कोणाचे ही आभार मानणे हा आभराचा अतिरेक अयोग्य असला अरी योग्य माणसाचे योग्य कारणाकरिता आभार मानणे हा शिष्टाचार चांगला व योग्य आहे. अपरिचितानेही एखाद्याला माणुसकी म्हणून आर्थिक मदत करणे, डब्यात बसायला जागा नसतानाही तरुणाने उठून उभे राहून प्रौढाला बसायला जागा करून देणे,. इ. गोष्टींचे आभार मानायलाच हवेत.
आ) पाठाच्या शीर्षकातून तुम्हांला समजलेला विनोद तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
‘भारनियमन’ म्हणजे काही काळाकरिता वीजपुरवठा खंडित करणे. वीज अखंड पुरवली जाते. विजेच्या बचतीकरिता भारनियमन केले जाते. तसेच आज कोणत्याही क्षुल्लक गोष्टीकरिता आभार व्यक्त केले जातात. म्हणून आभाराचेही नियमन व्हायला हवे. ‘आभाराचे नियमन’ ही गोष्टच विनोद निर्माण करण्याची आहे.