मले बाजाराला जायाचं बाई स्वाध्याय
मले बाजाराला जायाचं बाई स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी
प्रश्न. 1. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अ) बाजाराला जायचे नाही असे बाई का म्हणतात ?
उत्तर :
बाजाराला जायचे म्हणजे अनेक वस्तू खरेदी कराव्या लगतात. दुकानदार त्या वस्तू प्लॅस्टिकच्या कॅरिबॅगमध्ये देतात. आपण त्या वस्तू घरी काढतो व कॅरिबॅग फेकून देतो. त्या कॅरिबॅग गटारीत अडकतात. त्यामुळे नाल्या तुंबतात आणि गटारातले पाणी रस्त्यात येते. म्हणून बाजाराला जायचे नाही असे बाई म्हणते.
आ) कॅरिबॅग इतरत्र फेकून दिल्याने काय घडते ?
उत्तर :
कॅरिबॅग इतरत्र फेकून दिल्याने जनावरे त्या चाऱ्यागत चघळतात. या कॅरिबॅग त्यांच्या पोटात जातात. त्यामुळे त्यांचे मरण ओढवते.
इ) बाईच्या हरणीचे मरण का ओढवले ?
उत्तर :
बाईच्या हरणीचे प्लॅस्टिकच्या कॅरिबॅग चाऱ्यागत चघळल्या. त्या तिच्या पोटात गेल्या. म्हणून तिचे मरण ओढवले.
प्रश्न. 2. असे का घडले ?
अ) काळी माय ओसाड झाली.
उत्तर :
जमीन नांगरली. प्लॅस्टिकची जाळी वरती आली. त्यामुळे शेतात पीक येणार तरी कसे ? म्हणून प्लॅस्टिकने काळी माय ओसाड झाली.
आ) सरकारने आदेश काढून संदेश दिला.
उत्तर :
प्लॅस्टिक खाल्ल्याने जनावरांचे प्राण जातात. म्हणून सरकारने प्लॅस्टिक वापरू नका. असा आदेश काढला आणि त्यातून ‘सजीवांना वाचवूया’ असा संदेश दिला.
इ) समुद्रकिनाऱ्यावर जलचर मरून पडले.
उत्तर :
प्लॅस्टिक समुद्रकिनाऱ्यावर फेकले गेले. ते तेथील कासवांनी खाल्ले. दोन हजार कासवे मरून पडली. म्हणजे प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर जलचर मरून पडले.
ई) बाई बाजाराला जायला तयार झाल्या.
उत्तर :
आपण प्लॅस्टिक पिशवी वापरायची नाही. कापडाची आणि कागदाचीच पिशवी वापरायची असे लोकांनी ठरवली. म्हणून बाई बाजारात जायला तयार झाल्या.
प्रश्न. 3. कोण, कोणास व का म्हणाले ?
अ) ‘सांग रे बाबा सांग. मले आठवत नाय. पेपरात आलंय तरी काय ?’
उत्तर :
तिसरा पहिल्याला म्हणाला. ‘प्लॅस्टिक वापरू नका, आपण सजीवांना वाचवूया’ असा सरकारनं काढलेला आदेश पेपरातून छापून आलेला संदेश तुम्ही वाचला असणारच असे पहिला म्हणाला. तेव्हा त्यावर तिसरा ‘सांग ते बाबा सांग. मले आठवत नाय. पेपरात आलंय तरी काय ?’ असे म्हणाला.
आ) ‘प्लॅस्टिकची जाळी वरती आली.’
उत्तर :
बाई तिसऱ्याला म्हणाली. बाईने जेव्हा सांगितले की आपली काळी माय ओसाड होत आहे तेव्हा तिसऱ्याने तिला प्रश्न विचारला, ‘कशी काय ?’ त्यावर बाईने दिलेले हे उत्तर आहे की जमीन नांगरल्यावर प्लॅस्टिकची जाळी वरती आली.
प्रश्न. 4. कोणकोणत्या प्लॅस्टिक वस्तूंचा पुन्हा वापर करता येईल ? याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्याची यादि तयार करा.
उत्तर :
पुन्हा वापर करता येईल अशा प्लॅस्टिक वस्तू कितीतरी आहेत. त्यातील दहाबारा वस्तू अशा –
i) पुन्हा पुन्हा रिफिल टाकता येईल. असा पेन
ii) फाईल कव्हर
iii) प्लॅस्टिकचे धान्य भरवयाचे पोते.
iv) प्लॅस्टिकची सुतळी
v) प्लॅस्टिकचे जाड ग्लास
vi) प्लॅस्टिकचे चमचे
vii) हळदी, कुंकू, इत्यादीसाठी डबे
viii) मोहरी, जिरे इ. ठेवण्यासाठी डबे.
ix) लहान मुलांची खेळणी
x) शोभेसाठी प्लॅस्टिकची फुले मळती की धुता येतात व पुन्हा वापरता येतात इ.
प्रश्न. 5. तुम्ही किराणा दुकानात गेले असताना कापडी पिशवी घेऊन न येणाऱ्या काकांनी दुकानदाराला प्लॅस्टिकची पिशवी मागितल्यानंतर तुम्ही, काका व दुकानदार यांच्यातील संवाद लिहा.
उत्तर :
काका – अहो, तुम्ही वस्तू तर दिल्या. पण मी त्या नेऊ कशात ? एखादी प्लॅस्टिक पिशवी द्या.
दुकानदार – आम्ही आमच्या दुकानात प्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवत नाही. कारण सरकारचे तसे आदेश आहेत.
काका – तुमचं म्हणणं आहे बरोबर. पण मी हे सामान नेऊ कसं ? एखादी कापडी पिशवी असेल तर द्या ना !
दुकानदार – ही घ्या कापडी पिशवी.
काका – धन्यवाद. पुढच्या खेपेला आणून देतो.
प्रश्न. 6. ओला कचरा व सुका कचरा यांमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो. याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्यांची यादी तयार करा.
उत्तर :
ओला कचरा – विटलेले, आंबलेले अन्न, उष्टे व खरकटे अन्न, सडलेल्या भाज्या व पालेभाजी, सडलेली फळे, मांसाहारातील हाडे इ.
सुका कचरा – शाई संपलेल्या रिफिल, काचेचे तुकडे, फाडलेले कागद, फाडलेल्या चिंध्या, फाटलेले कपडे, तुटलेल्या प्लॅस्टिक बॅगा, समारंभातील ‘यूज अँड थ्रोचे’ प्लॅस्टिकचे पेले व वाट्या, कापलेले केस, औषधाच्या रिकाम्या बाटल्या, तुटलेले चाकू, उपयोगात येऊन टाकणारे मोबाईल, रिकाम्या अन्य बाटल्या इ.
प्रश्न. 7. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतील याची कल्पना करा व लिहा.
उत्तर :
प्लॅस्टिक पिशव्याचा वापर बंद केल्याने पहिला फायदा म्हणजे जनावरांचे प्राण वाचतील. त्याचप्रमाणे जलजरांचेही प्राण वाचतील. भूमी अधिक सुपीक होईल. ‘युज अँड थ्रो’ ही वृत्ती कमी होईल. दुकानदाराने दिलेल्या प्लॅस्टिक पिशवीचा खर्च पर्यायाने ग्राहकांनाच द्यावा लागतो. हा खर्चही कमी होईल.
प्रश्न. 8. शाळा-शाळांमधून कचरामुक्त अभियान हा उपक्रम राबवला गेला. प्लॅस्टिकचा कचरा गोळा करताना तुम्ही कोणकोणत्या वस्तू उचलल्या ते लिहा.
उत्तर :
शाळेतील प्लॅस्टिकचा प्लॅस्टिकचा कचरा उचलताना आम्ही शाई संपलेल्या रिफिल, मधल्या सुटीत खाण्यासाठी मुलांनी आणलेले प्लॅस्टिकच्या पुड्यातून खाद्यपदार्थाचे पुडे आणि पाण्यासाठी आणलेल्या प्लॅस्टिकच्या छोट्या बाटल्या किंवा रिकाम्या ब्रिसलरीज ह्या वस्तू आम्ही उचलल्या.
खेळूया शब्दांशी
अ) खालील शब्द प्रमाणभाषेत लिहा.
1) न्हाई
उत्तर :
न्हाई – नाही
2) सौंसाराला
उत्तर :
सौंसाराला – संसाराला
3) म्हंजी
उत्तर :
म्हंजी – म्हणजे
4) समद्या
उत्तर :
समद्या – सगळ्या
5) म्हन्ते
उत्तर :
म्हन्ते – म्हणते
6) माजी
उत्तर :
माजी – माझी
7) त्येच्यासाठी
उत्तर :
त्येच्यासाठी – त्याच्यासाठी
8) डोल्यातून
उत्तर :
डोल्यातून – डोळ्यांतून
9) यवढंच
उत्तर :
यवढंच – एवढंच
10) हाय
उत्तर :
हाय – आहे
11) व्हय
उत्तर :
व्हय – होय
12) त्यो
उत्तर :
त्यो – तो
आ) खालील वाक्य वाचा.
माझी आजी अंगठाबहाद्दर आहे. अंगठाबहाद्दर म्हणजे अशिक्षित. तसे खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
1) अकलेचा कांदा – मूर्ख मनुष्य
उत्तर :
वा. उ. – स्मिता बिलकूलच अकलेचा कांदा आहे.
2) उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचा सल्ला देणारा.
उत्तर :
वा. उ. – मोहन निव्वळ उंटावरचा शहाणा आहे.
3) उंबराचे फूल – क्वचित भेटणारी व्यक्ती.
उत्तर :
वा. उ. – मंत्री झाल्यापासून प्रल्हाद म्हणजे उंबराचे फूल झाला आहे.
4) एरंडाचे गुऱ्हाळ – कंटाळवाणे भाषण करणे.
उत्तर :
वा. उ. – अरुण कोणतीही गोष्ट सांगताना खूप एरंडाचे गुऱ्हाळ लावतो.
5) कळीचा नारद – भांडणे लावणारा.
उत्तर :
वा. उ. – राहूलशी बोलताना आम्ही जपून बोलतो कारण तो कळीचा नारद आहे.
6) गळ्यातला ताईत – अतिशय प्रिय.
उत्तर :
वा. उ. – राम श्रीकांतच्या गळ्यातला ताईत आहे.
7) जमदग्नी – अतिशय रागीट मनुष्य
उत्तर :
वा. उ. – आमचा दादा नुसता जमदग्नी आहे.
8) झाकले माणिक – साधा पण गुणी मनुष्य
उत्तर :
वा. उ. – नील म्हणजे झाकले माणिक आहे.
9) दीड शहाणा – मूर्ख
उत्तर :
वा. उ. – दिलीप निव्वळ दीड शहाणा आहे.
10) लंकेची पार्वती – अंगावर दागिने नसलेली स्त्री.
उत्तर :
वा. उ. – कर्मवीर भाऊराव पाटलांची पत्नी आता लंकेची पार्वती बनली होती.
खालील तक्ता पूर्ण करा.
अ. क्र. | साधा वर्तमानकाळ | अपूर्ण वर्तमानकाळ | पूर्ण वर्तमानकाळ |
---|---|---|---|
1) | …………… | आजी भाजी विकत आहे. | …………… |
2) | …………… | …………… | सोनाराने दागिना घडवला आहे. |
3) | आज पाऊस आला. | …………… | …………… |
4) | …………… | अजय सहलीला जात आहे. | …………… |
5) | आई बाळाला भात भरवते. | …………… | …………… |
उत्तर :
अ. क्र. | साधा वर्तमानकाळ | अपूर्ण वर्तमानकाळ | पूर्ण वर्तमानकाळ |
---|---|---|---|
1) | आजी भाजी विकते. | आजी भाजी विकत आहे. | आजीने भाजी विकली आहे. |
2) | सोनार दागिना घडवतो. | सोनार दागिना घडवत आहे. | सोनाराने दागिना घडवला आहे. |
3) | आज पाऊस आला. | आज पाऊस येत आहे. | आज पाऊस आला आहे. |
4) | अजय सहलीला जातो. | अजय सहलीला जात आहे. | अजय सहलीला गेला आहे. |
5) | आई बाळाला भात भरवते. | आई बाळाला भात भरवत आहे. | आईने बाळाला भात भरविला आहे. |