मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये स्वाध्याय
मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये स्वाध्याय इयत्ता सहावी इतिहास
1. सांगा पाहू.
1) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे.
उत्तर :
कुशाण
2) कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर.
उत्तर :
कनिष्कपूर
3) वीणावादनात प्रवीण असलेला राजा.
उत्तर :
समुद्रगुप्त
4) कामरूप म्हणजेच.
उत्तर :
प्राचीन आसाम
2. पाठातील नकाशाचे निरीक्षण करून गुप्तांच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांच्या नावांची यादी करा.
उत्तर :
गुप्तांच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांची नावे खालील प्रमाणे आहेत.
i) दिल्ली
ii) मगध
iii) पटना
iv) सांची
v) पाटलीपुत्र
vi) भडोच
vii) प्रयागराज
viii) सोपारा
ix) वलभी
x) चंपा
3. चर्चा करा व लिहा.
1) सम्राट कनिष्क
उत्तर :
i) मध्य आशियातून भारतात येऊन कुशाण टोळ्यांनी भारतात राज्य स्थापन केले. राजा कनिष्क त्या त्यांपैकी एक.
ii) कनिष्काने भारताच्या पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत साम्राज्याचा विस्तार केला होता.
iii) कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. त्याच्याच काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती.
iv) कनिष्काने सोन्याची आणि तांब्याची नाणी पाडली होती.
2) मेहरौली येथील लोहस्तंभ
उत्तर :
i) दुसऱ्या चंद्रगुप्ताने दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा केला आहे.
ii) तो सुमारे दीड हजार वर्षाहूनही अधिक जुना आहे, आजही तो गंजलेला नाही.
iii) यावरून प्राचीन भारतात तंत्रज्ञान किती प्रगत होते, हे सिद्ध होते.
iv) या लोहस्तंभावर एक लेख कोरलेला आहे. त्यावर चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे, त्यावरून तो लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे, असे मानले जाते.
4. पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावांची यादी करा.
उत्तर :
i) रत्नावली – हर्षवर्धन
ii) राजतरंगिणी – कल्हण
iii) हर्षचरित – बाणभट्ट
iv) मिलिंदपन्ह – मिनॅडर
v) बुद्धचरित व वज्रसूचि – अश्वघोष
5. गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे यांचा तुलनात्मक तक्ता पुढील मुद्द्यांच्या आधारे तयार करा.
मुद्दे | गुप्त राजघराणे | वर्धन राजघराणे |
---|---|---|
संस्थापक | ||
राज्यविस्तार | ||
कार्य |
उत्तर :
मुद्दे | गुप्त राजघराणे | वर्धन राजघराणे |
---|---|---|
संस्थापक | श्रीगुप्त | प्रभाकरवर्धन |
राज्यविस्तार | आरामपासून पंजाबपर्यंत तसेच तमिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश जिंकला होता. माळवा, गुजरात व सौराष्ट्रही जिंकून घेतले. | दिल्लीजवळ थानेसर येथे स्थापना, सामाज्याचा विस्तार नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता. |
कार्य | समुद्रगुप्ताने विविध प्रतिमा असलेली नाणी काढली होती. | व्यापराची भरभराट झाली. इतर धर्माना उदार आश्रय दिला. |
6. पुढील शब्दकोडे सोडवा.
उभे शब्द
2. …………. याच्या पराक्रमाचे वर्णन प्रयाग येथील स्तंभलेखामध्ये आढळते.
3. मेहरौली लोहस्तंभावर …………. नावाच्या राजाचा उल्लेख आढळतो.
5. पुष्यवर्मन याने …………… चे राज्य स्थापन केले.
7. ………….. याच्या दरबारात बाणभट्ट हा राजकवी होता.
8. इंडोग्रीक राजांमधील प्रसिद्ध राजा ……………
आडवे शब्द
1. …………….. याने गुप्तांचे साम्राज्य वायव्येकडे वाढवले.
4. हर्षवर्धनाचे एक संस्कृत नाटक ………….
6. गुप्त राजघराण्याचा संस्थापक ………….
9. …………. हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी झाला.
10. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आलेला बौद्ध भिक्खू ……………
11. कनिष्कच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य ……………
उत्तर :